थोर व्यक्तींचे मराठी सुविचार।Quotes in marathi

जीवनात भरपूर अडचणी येतात. कधी-कधी त्यावेळेस आपण खचून जातो. परंतु ती घचून जाण्याची वेळ नसून स्वतःला सावरण्याची असते.

त्याच खचलेल्या परिस्तिथीतुन बाहेर काढण्यासाठी एक मदतीचा हात हवा असतो. जसा, अर्जुनाला कृष्णाचा होता.
वाईट परिस्तिथी कशी पण असो, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा नक्कीच असतो.

अश्या परिस्तिथीत तुम्हाला एक मदतीचा हात हवा असतो. हाच हात कधी मित्र बनून येतो, तर कधी परिवार, तर कधी पुस्तक म्हणून…. असाच एक मित्र म्हणजे थोर व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकांचे सुविचार….

सुविचार वाचून आपल्याला एक अंधारात जसा प्रकाशाचे किरण दिसावे, तसे असते. तर बघूया अश्याच थोर व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकांचे मराठी सुविचार

quotes in marathi। marathi suvichar

quotes-in-marathi

” उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका…”
– स्वामी विवेकानंद

” अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.”
– स्वामी विवेकानंद

” एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.”
– स्वामी विवेकानंद

” सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.”
– स्वामी विवेकानंद

” शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.”
– स्वामी विवेकानंद

” शक्ती जीवन आहे, तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे, तर द्वेष मृत्यू आहे.”
– स्वामी विवेकानंद

” जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.”
– स्वामी विवेकानंद

” असं कधीच म्हणू नका की, मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.”
– स्वामी विवेकानंद

” मन आणि मेंदूच्या युद्धात नेहमी मनाचंच ऐका.”
– स्वामी विवेकानंद

” जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या.”
– स्वामी विवेकानंद

” जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे.”
– स्वामी विवेकानंद

” जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल, तर त्याचं मूल्य आहे. नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे.
त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे.”

– स्वामी विवेकानंद

” जो अग्नी आपल्याला उब देतो, तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही.”
– स्वामी विवेकानंद

” कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा.
जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.”

– स्वामी विवेकानंद

” विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या.”
– स्वामी विवेकानंद

” स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.”
– स्वामी विवेकानंद

” आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे.”
– स्वामी विवेकानंद

” घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.”
– स्वामी विवेकानंद

” चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते, त्याला कोणीच हरवू शकत नाही.”
– स्वामी विवेकानंद

” स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील.”
– स्वामी विवेकानंद

suvichar marathi । 100 suvichar in marathi

suvichar-marathi

” सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका.
एक दिवस असा येइल की, तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल.”

-बिल गेट्स

” जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही.
स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा.
स्वतःला सिध्द करा.”

-बिल गेट्स

” टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते.
खऱ्या आयुष्यात आराम नसतो,
असते,
ते फक्त काम आणि काम.”

-बिल गेट्स

” कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका.
एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही,
त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.”

-बिल गेट्स

” आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते,
त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत.
तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.”

-बिल गेट्स

” मोठ्या विजयासाठी मोठे रिक्स (Risk) घ्यावे लागतात.”
-बिल गेट्स

” आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील,
कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.”

-बिल गेट्स

” तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल, तर कमीत कमी असे बनवा की, ते चांगले दिसेल.”
-बिल गेट्स

” आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.”
-बिल गेट्स

” मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन.
कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील.”

-बिल गेट्स

” तुमच्या असंतुष्ट ग्राहकांकडूनच तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळते.”
-बिल गेट्स

” माझा असा विश्वास आहे की, जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले
तर
लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.”

-बिल गेट्स

” स्वतःची तुलना जगात कोना सोबत करू नका,
जर तुम्ही असं केलंत, तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय.”

-बिल गेट्स

suvichar in marathi । suvichar in marathi images

suvichar-in-marathi-images

” आपली सर्वात मोठी दुर्बलता हार मानण्यातच आहे. यशस्वी करण्याचा निश्चित मार्ग म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करणे.”
– थॉमस एडिसन

” शोध लावण्यासाठी आपल्याला चांगली कल्पनाशक्ती आणि कचर्‍याचे ढीग असणे आवश्यक आहे.”
– थॉमस एडिसन

” मी तिथून सिरुवात करतो, जेथून दुसरा सोडून गेला होता.”
– थॉमस एडिसन

” हार मानणे ही आपली सर्वात मोठी कमजोरी आहे. यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणे.”
– थॉमस एडिसन

” व्यस्त असणे म्हणजे नेहमी कामात असणे असे होत नाही.”
– थॉमस एडिसन

” मला एक पूर्ण समाधानी व्यक्ती दाखवा आणि मी तुम्हाला एक अयशस्वी व्यक्ती दाखवतो.”
– थॉमस एडिसन

marathi status on life। latest marathi suvichar

marathi-status-on-life

” जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल, तर तुम्हला दुसरे कोणी तरी
त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामला ठेवेल.”

– धीरूभाई अंबानी

” मला ‘नाही’ हा शब्द
ऐकू येत नाही.”

– धीरूभाई अंबानी

” आपले स्वप्न विशाल असायला हवेत.
आपले महत्त्वाकांक्षा उंच असायला हवे.
आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी.
आपले प्रयत्न मोठे असायला हवे.
रिलायंस आणि भारत साठी हेच तर माझे स्वप्न आहे.”

– धीरूभाई अंबानी

” युवानां एक चांगले वातावरण द्या.
त्यांना प्रेरित करा. त्याना लागेल ती मदत करा.
त्यांच्यात एक आपार उर्जा चे श्रोत आहे. ते करून दाखवतील.”
– धीरूभाई अंबानी

” जेव्हा आपण एखादे स्वप्न पाहू शकता तेव्हा आपण ते प्रत्यक्षात आणू शकता.”
– धीरूभाई अंबानी

” कठीण परिस्तिथी मध्ये देखील. ध्येयाला चिकटून राहा.
अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.”

– धीरूभाई अंबानी

” जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राला दगड माराल
तर तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत
कधीच पोहचू शकणार नाही
त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा.”
– धीरूभाई अंबानी

” भारतीयांची सर्वात मोठी समस्या हीच आहे की
ते मोठं विचार करायचे विसरून गेले आहेत.”

– धीरूभाई अंबानी

” मोठा विचार करा, वेगवान विचार करा आणि विचार करा कारण विचार करण्यावर कोणाची एकाधिकार नाही.”
– धीरूभाई अंबानी

” जर तुमचा जन्म गरिबीत झाला असेल तर त्यात तुमची काहीही चूक नाही पण जर तुमचा मृत्यू गरिबीत झाला तर ती तुमची चूक आहे.”
– धीरूभाई अंबानी

” भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांच्यातील आमचा संबंध आणि विश्वास हा एक घटक आहे जो आपल्या विकासाचा पाया आहे.”
– धीरूभाई अंबानी

” कोणताही काम करण्यासाठी मला नेहमी पुढे जायचे आहे, रस्ता तयार केला जात नसला तरीही, मी स्वत: ला या कामात सर्वात पुढे ठेवू इच्छित आहे.”
– धीरूभाई अंबानी

” मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करू इच्छितो, कारण माझी निवृत्ती हे एकमेव ठिकाण आणि स्मशानभूमी आहे.” – धीरूभाई अंबानी

” आपल्याकडे सर्वात मोठे सकारात्मक आव्हान का नाही, परंतु जर आपल्याकडे आशा, आत्मविश्वास आणि दृढ विश्वास असेल तर आपण सर्वात मोठे आव्हान उभे करू शकता आणि शेवटी विजय आपलाच असेल.”
– धीरूभाई अंबानी

life quotes in marathi । inspirational quotes in marathi

inspirational-quotes-in-marathi

” संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी नव्हता.”
– सुभाषचंद्र बोस

” तडजोड ही खूपच अपवित्र गोष्ट आहे.”
– सुभाषचंद्र बोस

” व्यर्थ गोष्टींमध्ये कधीही वेळ घालवू नका.”
– सुभाषचंद्र बोस

” कर्माचं बंधन तोडणं, हे खूपच कठीण काम आहे.”
– सुभाषचंद्र बोस

” कष्टांचं निसंशय एक आंतरिक नैतिक मूल्य असतं.”
– सुभाषचंद्र बोस

” मी जीवनाच्या अनिश्चिततेने कधीही घाबरलो नाही.”
– सुभाषचंद्र बोस

” तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे.”
– सुभाषचंद्र बोस

” आपल्या कॉलेज जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असताना मी अनुभवलं की, जीवनाचा काहीतरी अर्थ आणि उद्देश्य आहे.”
– सुभाषचंद्र बोस

” कधीही अधीर होऊ नका. तसंच कधीही अशी अपेक्षा करू नका की, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते तुम्हाला एक-दोन दिवसातच मिळेल.”
– सुभाषचंद्र बोस

“ मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरटकलो, तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही.”
– सुभाषचंद्र बोस

“ एक व्यक्ती एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.”
– सुभाषचंद्र बोस

“ माझ्या साऱ्या भावना मृतवत झाल्या आहेत आणि एका भयानक कठोरतेने मला वेढा घातला आहे.”
– सुभाषचंद्र बोस

” श्रद्धेची कमतरता हीच साऱ्या कष्टांचं आणि दुखांचं मूळ असते.”
– सुभाषचंद्र बोस

” जर संघर्षचं नसेल, कोणतंही भय समोर नसेल, तर जीवनातील अर्धा रस संपेल.”
– सुभाषचंद्र बोस

the great marathi quotes। Marathi inspirational quotes on life challenges

the-great-marathi-quotes

” प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.”
– महात्मा ज्योतिबा फुले

” नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.”
– महात्मा ज्योतिबा फुले

” केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे.”
– महात्मा ज्योतिबा फुले

” समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.”
– महात्मा ज्योतिबा फुले

” ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात, काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात.”
– महात्मा ज्योतिबा फुले

” जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील, तर त्यांची जात विचारू नका.”
– महात्मा ज्योतिबा फुले

” विद्वेविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्वेने केले.”
– महात्मा ज्योतिबा फुले

” आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.”
– महात्मा ज्योतिबा फुले

“ कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.”
– महात्मा ज्योतिबा फुले

” जो पर्यंत अन्न आणि वैवाहिक संबंधांवर जातीय संबंध कायम राहतील, तो पर्यंत राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही.”
– महात्मा ज्योतिबा फुले

” देव एक आहे आणि सर्व माणसे ही त्याची मुले आहेत.”
– महात्मा ज्योतिबा फुले

” देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो, तर मग त्या जोड्या एकाच जातीत का असतात ,देव जातीवादी आहे का?”
– महात्मा ज्योतिबा फुले

motivational images marathi। success quotes in marathi

success-quotes-in-marathi

” इतरांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा. तुम्हाला तुमचा ‘स्व’ सापडेल.”
– महात्मा गांधी

” जेव्हा मी निराश होतो. तेव्हा मी स्मरणात आणतो की, संपूर्ण इतिहासात सत्य आणि प्रेमाच्याच मार्गाचा विजय झाला आहे.”
– महात्मा गांधी

” जग बदलायचं असेल, तर आधी स्वत:ला बदला.”
– महात्मा गांधी

” असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असे शिका की, तुम्ही नेहमीसाठी जगणार आहात.”
– महात्मा गांधी

” माझा धर्म सत्य आणि अंहिसेवर आधारीत आहे. सत्य माझा परमेश्वर आणि अंहिसा त्याला प्राप्त करण्याचे साधन.”
– महात्मा गांधी

” पहिले ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, नंतर ते तुमच्याकडे पाहून हसतील आणि नंतर ते तुमच्याशी भांडतील तेव्हा तुम्ही जिंकाल.”
– महात्मा गांधी

” तुम्ही मला साखळदंडात बांधून ठेऊ शकता. यातना देऊ शकता. एवढेच नाही तर, माझे शरीर नष्ट करु शकता; पण तुम्ही माझे विचार कधीच बंदीस्त करुन ठेऊ शकत नाही.”
– महात्मा गांधी

” विश्वास ठेवणे एक गूण आहे, अविश्वास दुर्बलतेची जननी आहे.”
– महात्मा गांधी

” आपल्या योजनेवर विश्वास ठेवणारा एक सूक्ष्म जीव संपूर्ण इतिहास बदलू शकतो.”
– महात्मा गांधी

” केवळ प्रसन्नताच एकमेव अत्तर आहे, जे तुम्ही इतरांवर शिंपडल्यास त्यातील काही थेंब नक्कीच तुमच्यावर पडतील.”
– महात्मा गांधी

Marathi Inspiring Quotes।मराठी प्रेरणादायक सुविचार

Marathi-Inspiring-Quotes

“ सर्वच समजून घेणे म्हणजे सर्व माफ करणे होय.”
– गौतम बुद्ध

“ सगळ्यात काळी रात्र म्हणजे अज्ञानता.”
– गौतम बुद्ध

“ राग कवटाळून धरणे म्हणजे हे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान असते.”
– गौतम बुद्ध

” एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.”
– गौतम बुद्ध

“ आपल्या वयावर आणि पैश्यांवर कधीच घमंड करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक ना एक दिवस संपतातच.”
– गौतम बुद्ध

“ ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.”
– गौतम बुद्ध

” सुख मिळवायचा असा कोणताच रस्ता नाही आहे, त्यापेक्षा खुश राहणे हाच एक रस्ता आहे.”
– गौतम बुद्ध

“ तुम्ही तीच गोष्ट गमावता, ज्या गोष्टीला जास्त बिलगता किंवा चिटकून राहता.”
– गौतम बुद्ध

“ स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.”
– गौतम बुद्ध

“ जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य.”
– गौतम बुद्ध

Motivational quotes in marathi for success।यशासाठी मराठी मध्ये प्रेरक कोट्स

Motivational-quotes-in-marathi-for-success

” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.”
– लोकमान्य टिळक

” महान कार्ये कधीही सोपे नसतात आणि सहज होणारे कार्ये महान नसतात.”
– लोकमान्य टिळक

” जुलूम सहन करणे म्हणजे, सोशिकपणा नव्हे, तो परमार्थही नव्हे, ती फक्त पशुवृत्ती होय.”
– लोकमान्य टिळक

” समोर अंधार असला तरी, त्या पलीकडे उजेड आहे, हे लक्षात ठेवा.”
– लोकमान्य टिळक

” फक्त जेव्हा लोखंड गरम असेल तेव्हाच, त्याच्यावर प्रहार करा आणि तुम्हाला निश्चितच यश मिळेल.”
– लोकमान्य टिळक

” स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन, कारण पुस्तके जिथे असतील. तिथे स्वर्ग निर्माण होते.”
– लोकमान्य टिळक

” मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला, तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही.”
– लोकमान्य टिळक

” परमेश्वर अस्पृश्यता मानत असतील, तर मी परमेश्वरालाच मानणार नाही.”
– लोकमान्य टिळक

” एक वेळ राज्य कमावणे सोपे असते, पण राज्य राखणे कठीण असते.”
– लोकमान्य टिळक

Marathi Quotes collection। मराठी सुविचारसंग्रह

Marathi-Quotes-collection

” शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” तुम्ही किती अंतर चालत गेलात, यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात. हे अधिक महत्वाचे आहे.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” मी अश्या धर्माला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” बुद्धीचा विकास करणे, हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” माणसाला दारिद्र्याची नव्हे, तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये, अशी व्यवस्था करावी.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो, तो नेहमी चांगले कार्य करतो.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” ज्याच्या अंगी धैर्य नाही, तो पुढारी होऊ शकत नाही.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” जीवन लांब नाही, तर महान असायला हवे.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” पती पत्नी एकमेकांचे चांगले मित्र असणे आवश्यक आहे.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” एक सुरक्षित सेना सुरक्षित सीमेपेक्षा कधीही योग्य.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” जर मला असं समजेल की, संविधानाचा दुरुउपयोग होतोय, तर सर्वात आधी त्याला मी जाळेल.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहूनच करावा.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार।Marathi Suvichar Sangrah

Marathi-Suvichar-Sangrah

” उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही.”
– वीर सावरकर

” जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही.”
– वीर सावरकर

” कष्ट च तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते.”
– वीर सावरकर

” हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण.”
– वीर सावरकर

” आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी येवो ना येवो . जे आपल्याला करावस् वाटत ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.”
– वीर सावरकर

” यंत्राने बेकारी वाढत नाही तर विषम वाटणीमुळे वाढते.”
– वीर सावरकर

” आपल्या प्रामाणिक पणाचा उपयोग होईल पण केव्हा? तर दुसऱ्यास प्रामाणिक बनवण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच!”
– वीर सावरकर

” अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले, तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन!”
– वीर सावरकर

” स्वतः जगणे व राष्ट्र जगविणे, हे आपले कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय.”
– वीर सावरकर


हे वाचलंत का? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻