‘जरा हटके जरा बचके’ मध्ये विकी-सारा धमाल करणार! या दिवशी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार.!

jara hatke zara bachke

‘जरा हटके जरा बचके’ मध्ये विकी-सारा धमाल करणार!

विकी कौशल आणि सारा खानच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘जरा हटके जरा बचके’ आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार हे विकी कौशलने सांगितले आहे.

Vicky Kaushal And Sara Ali Khan Movie : बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार्स विकी कौशल आणि सारा अली खान एका चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी सेनेमा हॉल मध्ये रिलीज होणार आहे. सारा खान आणि विकी कौशल हे पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

आता विकी कौशलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचे टाइटल सांगितले आहे आणि त्यासोबतच या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे.

विकी कौशल आणि सारा अली खानच्या या चित्रपटाचे नाव ‘जरा हटके जरा बचके’ असे असणार. आणि या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आहे ते बघूया.

विक्की कौशल ने सोसिअल मीडिया वर पोस्ट शेअर केली

विकी कौशलने रविवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक क्लिक शेअर केली. या क्लिपमध्ये ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातील विकी कौशल आणि सारा अली खानचे पोस्टर्स दिसत आहेत. विकी कौशलने त्यासोबत लिहिले आहे, कि,

‘रोमँटिक? किंवा ड्रामेटिक? आमची कथा कशी निघेल असे तुम्हाला वाटते? जरा हटके जरा बचकेचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे. अशा प्रकारे चित्रपटाचा ट्रेलर15 मे रोजी म्हणजेच सोमवारी प्रदर्शित होणार आहे.

लक्ष्मण उत्रेकर दिग्दर्शित विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट 2 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘जवान’ 2 जूनला रिलीज पुढे ढकलला आणि विकी कौशलने ती तारीख घेतली

विशेष म्हणजे याआधी 2 जूनला शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट रिलीज होणार होता. ‘जवान’ हा मूवी 7 सप्टेंबरला सेनेमा हॉल मध्ये रिलीज होणार आहे.

ज्याप्रमाणे शाहरुख खानने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, त्याचप्रमाणे विकी कौशल आणि सारा अली खान यांनी त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाची 2 जून ही तारीख फिक्स केली.

वर्क फ्रंट, बद्दल बोलले तर विकी कौशलकडे ‘जरा हटके जरा बचके’, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’, ‘सॅम बहादूर’ सारखे चित्रपट आणि आनंद तिवारी चा एक चित्रपट आहे.

त्याचबरोबर सारा अली खान ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘ए वतन मेरे वतन’, ‘मर्डर मुबारक’ चित्रपट आणि जगन शक्तीच्या चित्रपटात दिसणार आहे.


हे वाचलंत का ? –

Leave a Comment