‘राहा’ माझ्यासाठी सर्वात मोठी ब्लॉकबस्टर आहे’, मुलगी आणि पती रणबीर कपूरबद्दल आलिया भट्ट म्हणाली.!

Alia Bhatt Talks About Daughter And Husband :- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) तिची मुलगी राहा आणि पती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बद्दल बोलली आहे. या दोघांबद्दल आलिया भट्ट काय म्हणाली ते जाणून घेऊया..!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला 10 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत झालेला आहे आणि तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर एक खास ओळख देखील निर्माण केली आहे.

आलियाने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हीट चित्रपट दिले आहेत. त्यामधील च एक म्हणजे, ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या चित्रपटात आलिया भट्टने उत्कृष्ट अभिनय केला होता.

या अवॉर्ड फंक्शनमध्ये आलिया भट्टने तिची मुलगी ‘राहा’ बद्दल सांगितले आणि तिला एक मोठी ब्लॉकबस्टर असे म्हटले. तसेच सोबतच आलिया ने पती रणबीर कपूरचेही कौतुक केले.

आलिया रणबीर चे कौतुक करताना म्हटले की, ‘मी भाग्यवान आहे, की मला रणबीर कपूरसारखा जोडीदार मिळाला. मला वाटेल तेव्हा मी कामावर जाऊ शकते. मला वाटेल तेव्हा मी कामातून ब्रेक घेऊ शकते, आज मी इथे तुमच्या समोर बोलत आहे, तेव्हा रणबीर कपूर मुलगी राहा सोबत घरी आहे आणि तिची काळजी घेत आहे.

आलिया भट्ट मुलीला म्हणाली ब्लॉकबस्टर

‘न्यूज18’ ने दिलेल्या वृत्तानुसार, आलिया भट्ट म्हणाली, ‘माझ्यासाठी सर्वात मोठी ब्लॉकबस्टर माझी मुलगी आहे, जी वर्षाच्या शेवटी माझ्या आयुष्यात आली. आई होण्यापेक्षा जगात कोणतीही गोष्ट जास्त आनंद देऊ शकत नाही, असे मला वाटते. आता रोजच्या जीवनातही मी माझे प्रत्येक काम आनंदाने पूर्ण करते.


हे वाचलंत का ? –

Leave a Comment