दातांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या घरगुती उपाय.!

दातांसाठी घरगुती उपाय

How To Maintain Oral Health : जेव्हा दातांच्या काळजीचा विचार येतो. त्यावेळेला डेंटिस्ट वर अवलंबून राहण्यापेक्षा घरी दात स्वच्छ करणे तुमच्यासाठी सोपे आहे. अनेकदा आपल्याच निष्काळजीपणामुळे दात किडणे, हिरड्या दुखणे आणि श्वासाची दुर्गंधी येते. तुमच्या रोजच्या काही सवयी बदलल्या तर दात स्वच्छ ठेवणे खूपच सोपे जाईल.

आजच्या आर्टिकल मध्ये आपण तेच बघणार आहोत, चला तर जाणून घेऊया, तुम्ही तुमचे दात कसे निरोगी ठेऊ शकता.

दात कसे स्वच्छ ठेवावे?

१) दिवसातून दोनदा ब्रश करा.!

जर तुम्हाला दात नेहमी चमकदार आणि निरोगी देवायचे असतील तर, त्यांची साफसफाई करणे खूप महत्वाचे आहे, बरेचसे दातांचे एक्सपर्ट्स शिफारस करतात की सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ब्रश किंवा टूथब्रशने दात स्वच्छ करा, असे केल्याने बॅक्टेरिया जमा होत नाहीत.

२) काही खाल्ल्यानंतर कुल्ला करावा.!

खाल्ल्यानंतर, अन्न आपल्या दातांना चिकटून राहते, जे बाहेर काढणे फार महत्वाचे आहे, अन्यथा त्यामध्ये जंतू जमा होऊ लागतात आणि ते दात किडण्यास कारणीभूत ठरू शकतात. हे टाळण्यासाठी, जेव्हाही तुम्ही काही खाता. तेव्हा तुम्ही तुमचे पाण्याने कुल्ला करणे महत्वाचे आहे.

३) डेंटल फ्लॉस वापरा.!

तुम्हाला बर्‍याचदा असे जाणवत असेल की जेवल्यानंतर फळे, भाज्या किंवा मांसाचे तंतू दातांमध्ये अडकतात, जे काहीवेळा दात घासूनही बाहेर पडत नाहीत. यासाठी तुम्ही डेंटल फ्लॉस वापरा. हा धाग्याने बनलेला असतो, जो दोन दातांच्या मध्ये जातो आणि घाण सहज काढून टाकतो.

४) या गोष्टी टाळा.!

आपल्याच वाईट सवयींमुळे दात कमजोर किंवा घाण होतात, यासाठी तुम्हाला काही सवयी टाळाव्या लागतील. जसे की सोडा पेय पिणे, दारू पिणे, धूम्रपान करणे, खूप गोड खाणे, तंबाखू आणि पान. या सर्व गोष्टींमुळे आरोग्याचे जास्त नुकसान होते. म्हणून या वस्तू शकतो टाळण्याचा प्रयन्त करा.!


हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻