Causes of Cardiac Arrest in Children

Causes of Cardiac Arrest in Children : कोरोना नंतर लोकांमध्ये हार्ट अटॅक चे प्रमाण खूप वाढले आहे. केवळ वयस्करच नाही, तर लहान लहान मुलांना देखील हि समस्या उद्भवत आहे. हृदय विकाराचा धोका तेव्हा उद्भवतो, जेव्हा हृदय शरीराच्या इतर भागांना योग्य प्रकारे रक्तपुरवठा करणे थांबवते. अशा स्थितीला कार्डियाक अरेस्ट असे म्हणतात.

ज्यामध्ये व्यक्तीचा तात्काळ मृत्यू होतो. अशी परिस्थिती तुमच्या मुलांसोबत कधीही येऊ नये, त्याकरिता जाणून घ्या त्याबद्दलची कारणे, ज्यामुळे अशा प्रकारची समस्या उद्भवू शकणार नाही.

मुलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची कारणे

1) मुलांना दुखापत होणे

अनेक वेळा लहान मुलांच्या छातीत दुखापत झाल्याने हृदयावर परिणाम होतो, त्यामुळे शरीराला होणारा रक्तपुरवठा बंद होतो. त्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अनेक वेळा नवजात बाळाचा झोपेत मृत्यू होतो.

2) हृदयावर दबाव येऊ शकतो

हेल्थ एक्स्पर्ट च्या मते, जन्मापासूनच नवजात बाळाला ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारख्या आजारांचा धोका असेल, तर पालकांनी सावध व्हायला हवे. अशा परिस्थितीत मुलांमध्ये अचानक संसर्ग वाढल्याने हृदयावर दबाव येतो. ज्यामुळे कार्डिअॅक अरेस्ट होतो.

3) जन्मजात आजार असणे

काही मुलांच्या हृदयात जन्मापासून काही दोष असतात. अशा मुलांना श्वसनाचे आजार होतात. या स्थितीला जन्मजात हृदय दोष असे म्हणतात. हृदयातील या ब्लॉकेजमुळे, रक्ताचा पुरवठा योग्यरित्या होऊ शकत नाही, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्टचा धोका वाढतो.

हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे?

जर तुमच्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर सर्वप्रथम सीपीआर द्या आणि त्याचे दोन्ही तळवे छातीवर ठेवून त्याला सरळ जमिनीवर झोपवा. यासोबतच, रुग्णवाहिका बोलवा आणि त्याला लवकरात लवकर रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करा. यासोबतच मोठ्याने ओरडून मुलाशी बोलण्याचा प्रयत्न करा.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Health

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *