हॅकिंग कशा प्रकारे केली जाते, ते जाणून घ्या.!

हॅकींग माहिती। hacking mhanje kay ?

hacking-in-marathi-2

Hacking in marathi

हॅकिंग म्हणजे नेमकं काय? हॅकिंग कशी होते..?

चला आज आपण जाणून घेऊ या हॅकिंग म्हणजे नेमक काय आणि हॅकिंग कशी होते.

आज इंटरनेट च्या वाढत्या वापराने आपल्या सुविधा तर वाढवल्या आहेत, पण त्याच सोबत अडचणीत पण वाढ झाली आहे. ती अडचण म्हणजे हॅकिंग.

या हॅकिंग मुळे आज आपला ऑनलाईन असलेला कोणत्याच प्रकारचा डेटा हा सुरक्षित नाही. जेवढा इंटरनेट चा वापर वाढतोय तेवढेच हॅकिंग चे प्रकार व प्रकरण पण वाढतायत.

हॅकिंग कशाला म्हणतात..?

तुमच्या परवानगी शिवाय तुमचा पर्सनल डेटा चोरण्याला हॅकिंग म्हंटले जाते. आणि जी लोक अशी कामे करतात त्यांना हॅकर्स म्हटले जाते. जे जगातून कुठूनही तुमच्या कॉम्पुटर, वेबसाईट किंवा सोशल मिडिया प्रोफाइल ला हॅक करून तुमचा डेटा चोरू शकतात.

हॅकिंग ही दोन प्रकारे केली जाते. एक चांगली आणि दुसरी नुकसान कारक. चांगली हॅकिंग तुमची सुरक्षा मजबूत करते आणि खराब तुमची सुरक्षा तोडून तुम्हाला नुकसान पोहचवऊ शकते.
हॅकर्स चे पण तीन प्रकार पडतात एक व्हाईट हॅट हॅकर्स, ग्रे हॅट हॅकर्स आणि ब्लॅक हॅट हॅकर्स असे तीन प्रकार आहेत.

ब्लॅक हॅट हॅकर्स

हे हॅकर्स चुकीच्या मार्गाने कोणाच्या पण कॉम्पुटर किंवा सोशेल मीडिया प्रोफाइल ला हॅक करतात. आणि त्यातून जी माहिती चोरतात त्या माहितीचा गैरवापर करून त्या संबंधित व्यक्तीला नुकसान करतात.

यामुळे त्यांना काय फायदा होतो? तर ते हॅकर तुमचा डेटा त्यांचा जवळ ठेऊन तुम्हाला ब्लॅक मेल करून पैश्याची मागणी करतात आणि तुमच्या डेटा ची कॉपी करून चुकीचा वापर करतात.

hacking-in-marathi
hacking in marathi

व्हाईट हॅट हॅकर्स किंवा एथिकॅल हॅकर्स

व्हाईट हॅट हॅकर्स ला एथिकॅल हॅकर्स पण म्हटले जाते. एथिकॅल हॅकर्स हॅकिंग करतात. पण हॅकिंग करण्याआधी परवानगी घेतात व नंतर हॅकिंग करतात.

जे तुमच्या सिस्टम ला खराब हॅकर्स पासून वाचवण्यासाठी हॅकिंग अटॅक करून पाहतात की या सिस्टम मध्ये कुठून किंवा कोणत्या प्रकारे हॅकिंग केली जाऊ शकते का? जर तुमचं सिस्टम हॅक होत असेल, तर ते त्याला अजून मजबूत बनवण्यात तुमची मदत करतात.

असे हॅकर्स हे पोलीस, सी बी आय आणि आय बी साठी काम करतात व आपल्या देशाची चुकीच्या हॅकर्स पासून सुरक्षा करतात. आज मार्केट मध्ये एथिकॅल हॅकर्स ची गरज ही वाढत आहे. ही स्कील शिकण्यासाठी कॉर्सेस पण मार्केट मध्ये उपलब्ध आहेत.

ग्रे हॅट हॅकर्स

हे हॅकर्स ते असतात. जे फक्त प्रॅक्टीस साठी हॅकिंग करतात यांचा हॅकिंग करण्यामागे खराब हेतू नसतो. कधी कधी हे हॅकर्स लोकांना आपल्या बद्दल माहिती झाली पाहिजे त्यासाठी पण हॅकिंग अटॅक करतात.
या प्रकारच्या हॅकिंग पण इल्लिगल समजल्या जातात. तुम्ही परवानगी घेतल्या शिवाय कोणता पण हॅकिंग अटक लिगली करू शकत नाही .

– धीरज तायडे


हे वाचलंत का? –


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top