full information about gst

gst.

GST in marathi

जीएसटी म्हणजे काय? (GST information in marathi)

आज आपण GST बद्दल ची माहिती घेणार आहोत, ज्याला आपन GOODS AND SERVICE TAX (वस्तू व सेवा कर ) असे म्हणतो.

GST हि एक कर प्रणाली आहे जी आपल्या देशात १ जुलै २०१७ मध्ये लागू करण्यात आली. या कर प्रणाली चे नाव आहे. GST (गुड्स अँड सर्विस टॅक्स) हे दोन्ही प्रकारच्या BUSINESS वर लागू होते.

जगातील जवळपास १६० देशान मध्ये GST टॅक्स प्रणाली आहे. आपल्या देशातील अप्रत्यक्ष कर रचनेत बदल करण्यासाठी GST लागू करणे, हे खूप आवश्यक मानले जाते.

GST च्या नियमानुसार वेगवेगळ्या वस्तू व सर्विस वर वेगवेगळ्या प्रकारचा कर लागतो. त्याचे दर भारत सरकारनी आधीच ठरवुन दिलेले आहेत परंतु या दरात वेळे प्रमाणे बदल होत राहतो.

आपल्या देशातील जुनी कर प्रणाली होती ती खूप गुंतागुंतीची व कीचकट मानली जात असे त्या मध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांद्वारे कर घेतला जात असे. त्यामुळे भारतात वेगवेगळ्या प्रकारचे खूप कर निर्माण झाले होते.

व्यापाऱ्यांना कर चुकवतांना खूप अडचणी यायच्या. वस्तू आणि सेवा कर GST मुळे यासर्व समस्यांचे समाधान मिळाले आहे .GST लागू झाल्यामुळे सरकार आणि व्यापारी दोघांना याचा फायदा झाला आहे. GST लागू करण्यामागील उद्देश हे पुढील फायदे घेण्यासाठी झाले आहे.

GST बद्दल माहिती (GST meaning in marathi)

१) करांचा बोझा कमी झाला.

वस्तू आणि सेवा कर मुळे अधिकाधिक अप्रत्यक्ष जे कर होते ते बंद करण्यात आले. व फक्त GST हा एकमेक कर ठेवण्यात आला यामुळे करांचा जो बोझा कमी झाला.

२) वस्तू आणि सेवा यांच्या किंमती कमी झाल्या.

आपली जी आधीची अप्रत्यक्ष कर प्रणाली होती. त्यामध्ये बदल करून जे वेगवेगळ्या प्रकारचे कर होते ते बंद केल्यामुळे आता वस्तू आणि सेवा यावर कर कमी लागत असल्यामुळे आधीच्या तुलनेत आता वस्तू आणि सेवा यांचा किमती कमी झाल्या दिसत आहे.

३) सरकारच्या उत्पन्नात वाढ झाली.

या कर प्रणालीमुळे कर चोरी कमी झाली आहे. कर चोरी कमी झाल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांना पण फायदा झाला आहे. त्याच सोबत टॅक्स प्रणाली पण सोपी आणि सरळ झाली आहे, यामुळे अधिकाधिक लोक कर भरत आहे.

सरकारच्या कर उत्पन्नात वाढ झाल्यामुळे देशाची प्रगती करण्यासाठी पण सरकार जवळ पैसा वाढला आहे.

४) उपयोग करणाऱ्यावर कर.

GST हे वस्तू किंवा सेवेचा उपयोग करणाऱ्याला द्यावी लागते.आणि या कराच्या वसुली ची जबाबदारी मात्र त्या वस्तू किंवा सर्विस देणाऱ्या वर दिली आहे. म्हणजेच एखादा दुकानदार तुम्हाला जेव्हा कोणते सामान विकेल तर त्यात GST हि वेगळी लिहिली राहते.

म्हणजे तुम्हाला त्या वस्तूच्या किमतीत GST ची जी कींमत असेल ती किंमत मिळून पैसे द्यावे लागतात. जर तुम्ही मोबाईल घेतला तर त्याच्या पावती वर सर्विस टॅक्स वेगळा लिहला राहतो.

पण आधी सर्विस टॅक्स सोडून तुम्ही विकत घेतलेल्या प्रॉडक्ट वर नेमके किती प्रकारचे टॅक्स लागले आहे हे तुम्हाला माहित नसायचे. पण आता तुम्हाला लवकरच समजून जाते कि या प्रॉडक्ट वर किती टॅक्स लागला आहे.

५) टॅक्स वर टॅक्स भरा लागत नाही.

आधीच्या कर प्रणाली मधे खुप वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लागत होते. कधीकधी टॅक्स वर टॅक्स लागत असे. कारण काही वस्तू आणि सेवा ह्या एकाच कॅटेगरी मध्ये येत होत्या.

आता तस नाही होत कारण गस्त हि शेवटी ग्राहकाला द्यायची आहे. जर कुणी मधात ती भरली तर त्याचे पैसे हे टॅक्स क्रेडिट सिस्टिम ने वापस येऊन जातात .

६) टॅक्स रेट राज्य सरकार ला ठरवता येत नाही.

आधीच्या कर प्रणाली मधे राज्य सरकार त्यांच्या राज्यात विकल्या जाणाऱ्या कोणत्या पण प्रोडक्ट वर मनात येईल तेवढा टॅक्स लावत असे. आणि त्याचे रेट पण आपले नुसार ठेवत असे. आता अस करता येत नाही.

GST च्या नियमानुसार टॅक्स चे कोणते पण रेट ठरवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी GST कौन्सिल तयार केली आहे. ज्याचे प्रमुख हे वित्तमंत्री आहेत. आणि राज्याचे वित्तमंत्री हे त्याचे सदस्य आहेत.

  • धीरज तायडे

हे वाचलंत का? –

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *