Friendship quotes in marathi

मैत्री-स्टेटस

मैत्री स्टेटस मराठी।Maitri quotes in marathi

  • मैत्री स्टेटस

funny friendship status in marathi

“मैत्रीला विसरणे ही जर तुमची कमजोरी असेल, तर तुम्ही जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती आहात.”

“खरे मित्र हवेतील ऑक्सिजन सारखे असतात, दिसत नाही पण त्यांच्याशिवाय जीवन जगता येत नाही.”

“व्यवसायातील मैत्री ठीक आहे. पण मैत्रीत कधीच व्यवसाय असू नये.”

“जोपर्यंत आपण चुकीच्या मार्गावर जात नाही. तोपर्यंत आपला चांगला मित्र आपल्याला कधीच अडवत नाही.”

“जर तुमच्याजवळ मित्रांशिवाय काहीच नसेल तर, तुम्ही खूप श्रीमंत आहात.”

“जसे बागेत गुलाब, चेहऱ्यावर आनंद आणि भाजीत मीठ आवश्यक असते, तसेच आयुष्यात मित्र आवश्यक असतातच.”

“मित्र ते नाहीत जे तुम्हाला दारू, गुटखा, सिगारेट चे व्यसन लावतील. तर ते जे तुमच्या सोबत ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधार देतात, संकटात तुमची साथ देतील. तुम्हाला खळखळून हसवतील.”

“मित्र आणि चांगले विचार तुम्हाला तिथं घेऊन जाऊ शकतात जिथं तुम्हाला पैसे नाही नेऊ शकत.”

“जो आपल्याला जसा आहे तसा स्वीकारतो तो खरा मित्र.”

“मित्र काय असतो? श्वासासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन असतो.”

“खरा जिवलग मित्र तो असतो, जो तुमच्यासोबत तेव्हा असतो जेव्हा त्याला कुठं दुसऱ्या ठिकाणी असायला हवं.”

“खऱ्या मैत्रीसाठी दररोज भेटण्याची व बोलण्याची गरज नसते, कारण खरे मित्र हे कधीच हृदयापासून दूर गेलेले नसतात.”

“खरे मित्र हे चांदण्यासारखे असतात, तुम्ही त्यांना सदैव पाहू शकत नाही, पण तिथेच असतात. अंधारात साथ द्यायला.”

“तू पण! असं जेव्हा कोणी विचारतो तेव्हा मैत्रीची सुरुवात होते.”

“अंधारात सोबतीला असणारे आणि उजेडात न दिसणारे मित्र असतात.”

“तो मित्र चांगला असतो जो आपल्याला दररोज वेळ देतो पण त्यापेक्षा चांगला मित्र तो असतो जो आपल्याला गरज असेल तेव्हा वेळ देतो.”

“खरे मित्र हे आपल्या चुका आपल्यालाच सांगतात.”

“शब्दा पेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते.”

“त्रास फक्त प्रेमामध्येच होतो असं नाही.!
एकदा जिवापाड मैत्री करून बघा प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.”

“लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो.”

“जेव्हा कुणी हात आणि साथ दोन्ही सोडून देतं..!
तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी व्यक्ती म्हणजे मैत्री.”

“मनातलं ओझं कमी करण्याचं, हक्काचं एकचं ठिकाण मैत्री..!”

“मित्राचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःखात असो किंवा सुखात ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही..!”

“चुका होतील आमच्या मैत्रीत पण “विश्वासघात” कधीच होणार नाही.”

“जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी मैत्रीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या राहील…!”

“अडचणीच्या काळात एकट न सोडता आधाराचा हात खांद्यावर ठेवून डोळे
झाकून निभावणार विश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”

“आम्ही एवढे handsome नाही की, आमच्यावर पोरी फिदा होतील.
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर माझे मित्र फिदा आहे.”

“प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं. ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,
ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो.”

“पंख असल्यावर उडायचं कसं? हे विसरल्यावर, जे आपल्याला एक मोठी उंच भरारी घेण्यासाठी मदत करतात ते मित्र असतात.”

“कठीण काळात श्वासासारखा आपल्या सोबत असतो तो खरा मित्र.”

“असा एखादा दिवस असेल जेव्हा आपण सोबत नसू मात्र असा एकही दिवस नसेल जेव्हा आपण एकमेकांच्या मनात नसू.”

“समुद्राच्या लहरीप्रमाणे मित्र येतात आणि जातात पण खरे तेच असतात, जे त्सुनामी आल्यानंतर सोबत राहतात.”

“जर मी ठरवले की मला एकही रिकामटेकड्या लोकांसोबत बोलायचे नाही तर मला मित्रच नसतील.”

“ज्याला चांगले मित्र आहेत तो जीवनात कधीच अयशस्वी नसतो.”

“एकटं उजेडात चालल्या पेक्षा मला मित्रासोबत अंधारात चालायला आवडेल.”

“एकमेकांना समजून सांगणे आणि समजून घेणे म्हणजे मैत्री.”

“संकटात बरेच मित्र साथ देतील, पण जो आपलं यश पचवू शकतो तो खरा मित्र.”

“एकवेळ आपण शत्रूचं बोलणं विसरून जाऊ पण मित्राचं गप्प राहणं कधीच विसरणार नाही.”

“मैत्री ही एखाद्या धाग्या सारखी असते. एकदा तुटली की परत तर जुळते पण त्यामध्ये एक गाठ तयार होते.”

“मित्र गरज म्हणून नाही, तर सवय म्हणून जोडा
कारण गरज संपली जाते. पण “सवयी” कधीच सुटत नाही.”

“ज्याला काही कारण असते ते नातं, तर ज्याला कुठलेही कारण लागत नाही ती मैत्री असते.”

“आमची मैत्री पण अशी आहे तुझं माझे जमेना आणि तुझ्या विना करमेना.”

“दुःख किंवा संकट आल्यावर काही लोकं देवाकडे जातात, काही दारूच्या दुकानाकडे पण मी मित्राकडे जातो.”

“मित्र हे पुस्तकासारखे असायला हवेत, थोडेच पण निवडलेले.”

“मला नाही माहीत की मी एक चांगला मित्र आहे की नाही परंतु मला विश्वास आहे की, मी ज्यांच्या सोबत राहतो ते माझे चांगले मित्र आहेत..!”

“आपल्या शेवटच्या क्षणी आपल्याला हसवणारे मित्र असतात.”

“खरे मित्र शोधून सापडत नाही कारण ते आधीच मिळालेले असतात.”

“आपल्या चेहऱ्यावरचा आनंद ओळखणारे मित्र नसतात तर आपल्या डोळ्यातील अश्रूंच्या मागचं कारण ओळखणारे मित्र असतात.”

“सर्वात सुंदर मैत्री ती असते, ज्यामध्ये मित्र आपली मैत्री न तोडता स्वतःहुन वेगवेगळ्या मार्गानी जातात.”

“सगळ्यात चांगला आरसा हा एखादा जुना मित्र असू शकते.”

“एक खरा मित्र तो असतो, जेव्हा सर्व सोडून जात असतात. तेव्हा तो आपल्याकडे येत असतो.”

“खरा मित्र तो असतो, जो आपण संकटात असताना, म्हणतो की ‘मी’ त्याचा मित्र आहे.”

“आरसा आणि सावली सारखे मित्र हवेत. खरं दाखवून देणारे आणि साथ न सोडणारे.”

“एका वर्षात 50 मित्र बनवणे सोपं आहे पण 50 वर्ष एकासोबतच मैत्री ठेवणे कठीण आहे.”

“मित्र तो नसतो जो तुमचा रस्ता अडवतो, तर तो असतो जो तुमच्यासाठी रस्ता तयार करण्यास मदद करतो.”

“आपण पडल्यावर, पोट भरून हसून झाल्यानंतर, जे आपल्याला उचलतात ते खरे मित्र असतात.”

“तुमच्या आणि तुमच्या खऱ्या मित्रांच्या गोष्टी तुमच्या सर्व मित्रांना माहित असतात.”

“खरे मित्र ही शरीराने दूर होतील ही पण मनाने कधीच दूर जात नसतात.”

marathi quotes on friendship / marathi friendship quotes

जिवलग मित्र स्टेटस मराठी

“जो दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो. त्यालाच चांगले मित्र मिळतात.”

‘वेळ आणि परिस्थितीनुसार गरजा बदलतात मित्र नाही.”

“जे म्हणतात, त्यांनी देव पाहिला नाही. बहुतेक त्याला तुझ्यासारखा मित्र नसेल.”

“मैत्री तीच चांगली जिथं बोलायच्या आधी विचार करावा लागत नाही.”

“मैत्री फायद्यासाठी नाही, तर जीवनात योग्य मार्गावर चालण्यासाठी केली जाते.”

“जो मित्र तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेत असेल तो मित्र नाही शत्रू असते.”

“मैत्री तेव्हाच बनवा, जेव्हा तुम्हांला त्याची गरज नसेल.”

“अंधाराशिवाय उजेड नाही आणि मित्रांशिवाय जीवन नाही.”

“शोधल्यावर तेच लोकं भेटतात जी हरवली आहे. जी बदलली आहेत ती नाही.”

“मित्र एकच असावा, जो आपल्या शब्दावरून नाही, तर डोळ्यावरून आपलं मन ओळखणारा असावा.”

“मित्र म्हणजे आपल्या आईच्या पोटातून जन्म न घेणारे भाऊ-बहीण असतात.”

“कदाचित तुला माहित नसेल, तू माझा सर्वात चांगला मित्र होता, आहेस आणि कायम राहणार.”

“मित्र एक असा चोर असतो जो चेहऱ्यावरून चिंता, मनातून दुःख आणि डोळ्यातून अश्रू चोरून घेतो.”

“चांगले मित्र वाईट वेळेलाही चांगली वेळ बनवू शकतात.”

“तुम्ही विसरलात तरी, मी नाही विसरणार आठवणीने आठवण काढीन.
कारण मैत्री केलीय यार स्पर्धा नाही.”

“जीवनात असे दोस्त जरूर बनवा. जे मनातील दुःख असे ओळखतीन
जसे की मेडिकलवाले डॉक्टर ची handwritting ओळखतात.”

“चांगल्या मैत्रीला वचन व अटी कधीच नसतात, फक्त दोन स्वच्छ मन पाहिजे असतात
एक निभावणार आणि एक समजून घेणारं.”

“देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.”

“Life” मध्ये एक वेळेस “Bf”नसला तरी चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
“Best friend” नक्की हवा.

“जीवनात कितीही मित्र भेटू द्या. पण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरता येत नाही.”

“मैत्री तुझी माझी रोज आठवण न यावी असे होतच नाही, रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात.”

“मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळीजी कधीही रडू देत नाही एक भास जो कधीही दुखावत नाही,
आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही.”

friend status in marathi / best friend quotes in marathi

मैत्री स्टेटस मराठी

“कोण म्हणतं मैत्री बरबाद करते, जर निभावणारे कट्टर असतील ना तर सारी दुनिया सलाम करते.”

“मित्र रुसला तर त्याला समजावता आलं पाहिजे, कारण त्यालाच आपली सर्व गुपितं माहित राहतात.”

“मैत्री जर खरी असेल तर कोळशाला पण हिरा बनवू शकते.”

“खरे मित्र आपल्या चुकाच दाखवत नाहीत, तर त्या दुरुस्त करण्यासाठी मार्ग पण दाखवतात.”

“मैत्रीची कोणतीच किंमत नसते, झाडांना कधी त्याची सावली विकतांना पाहिलं आहे का?”

“कुठलीच गरज नाही म्हणून तर मैत्री आहे. गरज असती तर मैत्री नाही व्यापार झाला असता.”

“मैत्री हे मनाने तयार झालेलं नातं आहे. दररोज भेट नाही झाली तर मैत्री कमी नाही होत.”

“मैत्रीत वजन असते. पण त्याचं ओझं कधीच होत नाही.”

“मैत्री चा पण एक वसुल असते. कधी मनावर घ्यायचं नाही आणि कधीच कुणाचं मन दुखवायचं नाही.”

“गर्दीत मित्र ओळखायला शिका नाही तर संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.”

“माहीत नाही लोकांना चांगले friends कुठून सापडतात मला तर, मला तर सगळे नमुने सापडलेत.”

“दोस्ती एवडी कट्टर पाहिजे की लोकांची बघूनच जळाली पाहिजे.”

“गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी Girlfriend चं असावी.
काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षा पण भारी असते.”

“आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल आणि जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.”

“आमच्या मैत्रीची अशी काही ओळख नाही. पण मला रडताना पाहिलं की तो त्याचं हसणं विसरून जातो.”

“खरा मित्र तोच ज्याला तुम्ही केव्हा पण फोन करू शकता. मनात कुठलाही विचार न करता.”

“मित्र सोबत नसेल तर दिवस पण उनाड आहे.
मित्र सोबत असेल तर रात्र पण भन्नाट आहे.”

“तुम्हाला आवडत नसणारं काम, जर कोणी करत असेल आणि तरीही तुम्ही त्याच्यासोबत असाल तर तो तुमचा मित्र असतो.”

“दुनियातल सर्वात अवघड काम म्हणजे बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.”

“प्रिय मित्रा, तुझी आठवण आली की वाटतं एका दगडावर miss u लिहावं आणि
तो दगड तुझ्या डोक्यात घालावा म्हणजे तुला पण माझी आठवण येईल.”

“हरामी मित्राला सांभाळणं म्हणजे एखादया बॉम्ब ला सांभाळणं..!
म्हणजे आम्ही कधी, कुठे आणि कसा फुटेल याचा नेम नाही..!”

“तुम्ही पिल्यानंतरचे तुमचे इंग्लिश बोलणं जो समजून घेतो
तोच खरा तुमचा Best Friend असतो.”

“रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसतांना हि जी बंधन जुळतात. त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.”

“त्याचा आईला” वाटत “मी सभ्य आहे”
“माझ्या आईला” वाटत “तो सभ्य आहे”
म्हणून आम्ही दोघे “चांगले मित्र” आहे..!

वय कितीही होवो. शेवटच्या श्वासापर्यंत खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं
एकच असतं ते म्हणजे “मैत्री”

मैत्री हसवणारी असावी. मैत्री चीडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी. एक वेळेस ती भांडणारी असावी. पण कधीच बदलणारी नसावी.

marathi friendship sms / best friendship status in marathi

dosti status in marathi attitude

भरपुर भांडून पण जेव्हा एकमेकांसमोर येतो आणि
इक smile मध्ये सगळं ठीक होत तिचं खरी “मैत्री”.

मैत्री म्हणजे थोडं घेणं. मैत्री म्हणजे खूप देणं..!
मैत्री म्हणजे देता देता. समोरच्याच होऊन जाण..!

मैत्री कुणाशीही कधीही होऊ शकते , त्यासाठी वेळ, काळ, जात
याला काहीच महत्व नसते असते ती फक्त निस्वार्थ “मैत्री”.

“श्वासातला श्वास असते मैत्री..! ओठातला घास असते मैत्री..!
कोणीही जवळ नसतांना तुझी साथ असते मैत्री..!”

“एकदा राधाने कृष्णाला विचारले मैत्रीचा काय फायदा आहे.
कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो. तिथे “मैत्री” कधीच नसते.”

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो, रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग “मैत्री”.

“नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात, ति आपोआप गुंफली जातात,
मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात, काही जण हक्काने राज्य, करतात यालाच तर मैत्री म्हणतात..!”

“खरा मित्र कधीच तुम्हाला तुमच्या खऱ्या नावाने कधीच हाक मारत नाही.”

“कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी असेल तर मैत्री निवडा प्रेम नको.”

“माझ्या मैत्रिणीला वाटते मी तिला घाबरतो.
पण ते नाटक असतं खर तर मी तिचा आदर करत असतो..!”

“जेव्हा एखादी मैत्रीण तिच्या मनातल दुःख आपल्यासमोर मांडते. तेव्हा ती आपल्यावर
साक्षात देवासारखा विश्वास ठेवते. प्रयत्न करा तो विश्वास कधीच तुटणार नाही..!!”

“मैत्रीचं नाव काय ठेवू? स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील, मन ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की श्वास ठेवू म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील.”

“मैत्री म्हणजे आपल्या विचारांत सतत कुणी येणं असतं..!
मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला भरभरून प्रेम देणं असत..!”

“मैत्री साजरी करायला एक दिवस पुरेसा नाही संपूर्ण आयुष्य सरले तरी कित्येकाणा मैत्री कळालीच नाही..!”

“वयाचं काहीच देणंघेणं नसतं जिथे विचार जुळतात ना तिथे खरे मैत्री होते.”

“लहानपनी बरं होत,दोन बोटं जोडली की पुन्हा मैत्री व्हायचीच.”

“समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता
याची जाणीव म्हणजे मैत्री..!”

“देवपण न जाणो कोठून कसे नाते जुळवतात, अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो,
ज्यांना कधी ओळखतही नसतो, त्यांना पार जीवाचे जिवलग मित्र बनवतो.”

“सर्वात मोठं जिवन आहे, जिवनांहून मोठं प्रेम आहे, प्रेमाहून मोठी मैत्री आहे, मैत्री हि एक भावना आहे, लक्षात ठेवलं तर आपलं आहे, आणि विसरलात तर स्वप्न आहे..!!”

जगावे असे की, मरणे अवघड होईन..!
हसावे असे की, रडणे अवघड होईल..!
कोणाशी मैत्री करणे सोपे आहे. पण मैत्री टिकवावी अशी की, दुसऱ्याला ती तोडणे अवघड होणे..!


Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *