फ्रीलांसिंग म्हणजे काय? फ्रीलांसिंग मधून पैसे कसे कमवायचे?

Freelancing

आपल्या देशात, खेडेगावात आणि शहरांमध्ये स्किल आणि टॅलेंट ला भरपूर प्रोत्साहन दिले जाते. प्रत्येक क्षेत्रात लोकांना त्यांच्या स्किल साठी पैसा दिला जातो.

आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, जे आपल्या नोकरीत समाधानी नसतात, सकाळी उठून कामावर जातात, थकून घरी येतात, अस्वस्थ होतात, बॉसकडून टोमणे ऐकतात, लोकांना हे आवडत नाही.पण सर्वांसाठी एक उपाय आहे. या समस्या तुम्ही Freelancing च्या माध्यमातून सोडवू शकता.

जर तुम्ही तुमच्या नोकरीवर नाराज असाल आणि तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे असतील, तर फ्रीलान्सिंग हा तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे, तुम्ही फ्रीलान्सिंग करून घरी बसून चांगले पैसे कमवू शकता.

या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत कि,

१) फ्रीलान्सिंग म्हणजे काय?
२) फ्रीलांसर म्हणजे काय
३) फ्रीलान्सिंगची सुरुवात कशी करावी?
४) फ्रीलान्सिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे?
५) फ्रीलांसिंग करून तुम्ही किती पैसे कमवू शकता?

या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत, चला तर सुरु करूया.!

हे वाचलंत का? –
* ॲमेझॉन वर आपले प्रॉडक्ट कसे विकायचे? 
* ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग

फ्रीलान्सिंग म्हणजे काय? (freelancing meaning in marathi)

फ्रीलान्सिंगचा सरळ अर्थ असा आहे, की आपण काही skill च्या बदल्यात पैसे कमावणे. तुमच्याकडे वेब डिझायनिंग, कंटेंट रायटिंग, फोटोशॉप, थीम एडिटिंग, मार्केटिंग यासारखे कोणतेही चांगले स्किल असल्यास, या सर्व स्किलसाठी तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळतील.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला कंटेंट रायटिंग माहित असेल, तर तुम्ही कंटेंट लिहून तुमच्या क्लायंटला द्याल, तर समजून घ्या कि, तुम्ही फ्रीलान्सिंग करत आहात. फ्रीलान्सिंग तुम्हाला तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या कामानुसार पैसे देते.

तुम्ही नोकरी करता तेव्हा 8 ते 10 तास काम केल्यावर तुम्हाला महिन्यानुसार पैसे मिळतात, पण जर तुम्ही फ्रीलान्सिंग म्हणून काम केलेत, तर तुम्हाला हवे तेव्हा काम करता येते. म्हणजेच तुम्हाला वेळेचे काही बंधन नसणार.

फ्रीलान्सिंग करणारी व्यक्ती कोणत्याही कंपनीसाठी काम करत नाही, तो स्वत:चे क्लायंट शोधून काम करतो.


फ्रीलांसर म्हणजे काय? (freelancer meaning in marathi)

कोणत्याही कंपनीत सामील न होता. आपले कौशल्य (skill) विकून पैसे कमावणाऱ्या, व्यक्तीला फ्रीलान्सर म्हणतात.

ज्या व्यक्तीकडे एखादे स्किल आणि टॅलेंट असेल, तर तो ते स्किल आणि टॅलेंट दुसऱ्यासाठी वापरत असेल, आणि त्याबदल्यात समोरची व्यक्ती त्याला पैसे देते असेल तर त्याला आपण फ्रीलान्सिंग असे म्हणतो.

तुम्हाला फक्त चांगल्या स्किल ची गरज आहे. जसे की तुम्ही तज्ञ बनून भरपूर पैसे कमवू शकता.


Freelancing मधून पैसे कसे कमवायचे?

फ्रीलान्सिंगमध्ये अशी अनेक कौशल्ये आहेत. ज्यामुळे तुम्ही सहजपणे पैसे कमवू शकता जसे कि –

१) प्रोग्रामिंग आणि टेक, तुम्ही हे काम आरामात घरी बसून करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर लागेल.

२) त्यानंतर येते भाषांतर (ट्रान्सलेटर) आणि लेखनाचे काम, जर तुम्हाला लिहायला आवडत असेल आणि तुमचे व्याकरण आणि भाषा कौशल्ये चांगली असतील, तर तुम्ही हे काम सहज करू शकता.

३) डिजिटल मार्केटिंग ही एक अशी गोष्ट आहे. ज्याला बाजारात खूप मागणी आहे, जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकलात. तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.

फ्रीलान्सिंग म्हणून तुम्ही अनेक कामे करू शकता. जसे कि –

• Photoshop
• Video And Animation
• Graphics And Design
• Web Developer/Coding
• SEO
• Music And Audio
• Consulting Work
• Data Entry
• Content Writing

फ्रीलांसर म्हणून या सर्व गोष्टी करून तुम्ही पैसे कमवू शकता. यापैकी कोणतेही कौशल्य शिकण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल, परंतु पुढे जाऊन ते तुम्हाला खूप मदत करेल. आता ही नोकरी कशी आणि कुठून शोधायची ते आम्ही तुम्हाला सांगतो.


फ्रीलान्सिंग जॉब कसा करावा?

तुम्हाला सांगितले की फ्रीलांसर ही अशी व्यक्ती आहे. जी आपले कौशल्य विकून पैसे कमवते.

त्यामुळे प्रश्न पडतो, की फ्रीलान्स जॉब कसा करायचा? सर्वप्रथम तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल, की तुमच्याकडे कोणते कौशल्य आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही फ्रीलान्सिंग सुरू करू शकता.

असे स्किल जे तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत करू शकता. जे तुम्हाला करायला आनंद मिळतो आणि तुम्ही ते काम फुकटातही करू शकता.

जेव्हा तुम्हाला एखादे स्किल मिळते किंवा तुम्ही एखादे स्किल शिकणार असाल, तेव्हा तुम्हाला आवडेल असे स्किल शिका. आणि जेव्हा तुम्हाला तुमची स्किल समजतात, तेव्हा तुम्ही ती तुमची आवड देखील बनवू शकता. तुमचे स्किल सुधारण्यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा सराव करू शकता.

जेव्हा तुम्ही क्लायंटला उत्तम दर्जाचे काम द्याल, तेव्हा तुम्ही तुमचे नेटवर्कही सहजपणे वाढवू शकता. आता तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे, की तुम्हाला फ्रीलान्सिंग करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तुम्हाला ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे. ते तुमच्या कामावर अवलंबून आहे.

पण फ्रीलान्सिंगसाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसे की –

● लॅपटॉप किंवा कॉम्पुटर जर तुम्ही टेकनॉलॉजि संबंधित कोणतेही काम करत असाल, तर तुमच्या जवळ कॉम्पुटर किंवा लॅपटॉप असणे अनिवार्य आहे.
● तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुमचे इंटरनेट कनेक्शन मजबूत असले पाहिजे. जेणेकरून तुम्हाला काम करताना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
● ई-मेल अकाउंट असणे खूप महत्वाचे आहे. ज्यावर तुमचे महत्वाचे मेल येतील आणि तुमचे प्रोजेक्ट देखील तुम्हाला मेल केले जातील.
● तसेच बँक खाते असणे खूप महत्वाचे आहे. जे कि सर्वांकडे असतंच कारण ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे, त्यामुळे व्यवहार करण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. आणि तुमचे Paypal, Paytm, Gpay हे सर्व अॅप्सशी जोडलेले असले पाहिजेत ज्याच्या मदतीने तुम्ही पैसे मिळवू शकता.


फ्रीलांसर म्हणून कसे काम करावे?

जेव्हा तुम्ही कोणतेही कौशल्य शिकलात किंवा तुम्हाला एखादे कौशल्य माहित असेल, तेव्हा आता प्रश्न पडतो, की फ्रीलान्सर म्हणून कुठे काम करायचे. तर पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये चालत स्वतःचा नेटवर्क लोकांपर्यंत वाढवावा.

तुम्हाला तुमचे स्वतःचे क्लायंट मिळू लागतील आणि मग तुम्ही त्यांच्यासाठी सहज काम करू शकाल. आजकाल अशा अनेक वेबसाइट्स आहेत. जिथे तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता. या वेबसाइट्सवर तुम्हाला काम अगदी सहज मिळू शकते.

फ्रीलान्स लेखक आणि क्लायंट दोघेही या वेबसाइटवर नोंदणी करतात. क्लायंट या वेबसाइट्सवर त्यांचे काम प्रकाशित करतात आणि नंतर कुठेतरी सर्व फ्रीलांसर त्या कामासाठी अर्ज करतात. आणि ज्यांचे प्रोफाइल कलाईन्ट ला आवडले, त्यांना तो अनुभव म्हणून काम देतो.

ओळख, किंमत आणि काम हे ग्राहकांचे प्राधान्य आहे, जर तुम्ही या तीन भागांमध्ये बसलात तर ते तुम्हाला काम देतील. आणि तुम्हाला दिलेले काम पूर्ण करताच. तुम्हाला त्या कामाचे पैसे सहज मिळतात.

तुमची प्रोफाइल चांगली असेल, तर सर्व क्लायंट तुम्हाला स्वतः कामावर घेतील. आता बघूया फ्रीलांसरचे काम शोधण्यासाठी तुम्ही कोणत्या वेबसाइटवर अर्ज करू शकता.


फ्रीलांसिंग वेबसाइट लिस्ट

1) Freelancer
2) Fiverr
3) Upwork
4) Guru
5) Peopleperhour
6) Toptal
7) Envato
8) Simplyhired
9) 99designs
10) Craigslist

वरील दिलेल्या वेबसाईट लिंक वर क्लिक करून तुम्ही वेबसाईट चेक करू शकता. आशा करतो हि माहिती तुम्हाला नक्की आवळली असेलच, परत भेटूया एका नवीन माहिती सोबत धन्यवाद..!


  • सागर राऊत

हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻