disadvantages of drinking lemon water daily

Disadvantages of lemon water

लिंबू पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी आणि इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी लिंबू पाणी खूप फायदेशीर आहे. मात्र लिंबू पाण्याचे योग्य सेवन केले नाही तर ते फायद्याऐवजी नुकसानच करू शकते.

नमस्कार मित्रानो, माहिती लेक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. लिंबू पाणी पिणे हे शरीरासाठी फायदेशीर आहे हे तर आपल्याला माहिती असेलच परंतु या आर्टिकल च्या माध्यमातून आपण समजून घेऊया, कि लिंबू पाणी पिणे हे शरीरासाठी तितकेच नुकसान दायक ठरू शकते.

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते, त्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पेय मानले जाते. आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाणारे हेच लिंबू पाणी आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकते आणि ते रिकाम्या पोटी पिण्याचे काय तोटे आहेत. ते जाणून घेऊया.!

1) दातांसाठी हानिकारक

रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने दातांचे नुकसान होऊ शकते. याचे कारण कि, लिंबूमध्ये एसिडिक गुणधर्म असतात, ज्यामुळे दातांच्या इनेमल ला नुकसान होऊ शकते.

2) लघवी चा त्रास

लिंबू पाणी हे लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही लिंबू पाणी रिकाम्या पोटी जास्त प्यायले, तर तुम्हाला लघवीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने तुम्हाला वारंवार लघवीला जाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

3) डिहाइड्रेशन

सकाळी काहीही न खाता लिंबूपाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. लिंबूमध्ये एस्कॉर्बिक अॅसिड जास्त प्रमाणात आढळते, अशावेळी ते किडनीमध्ये यूरिनचे प्रोडक्शन वाढवण्याचे काम करते. म्हणूनच लिंबू पाणी हे संतुलित प्यावे.

4) हाडांचे नुकसान

रिकाम्या पोटी लिंबूपाणी प्यायल्याने हाडांचे नुकसान होते. त्यामुळे हाडांमध्ये असलेले तेल कमी होऊ लागते, तसेच हाडे कमकुवत होतात आणि त्यामुळे फ्रॅक्चरही होऊ शकतो.

या गोष्टी लक्षात ठेवा.!

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. वजन कमी करण्यासाठी लोक सकाळी याचे सेवन करतात, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लिंबूपाणी पिऊ नका. याशिवाय लिंबूपाणी प्यायल्यानंतर लगेच कोणत्याही प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ खाऊ नका.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Health

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *