अंतराळवीरांची नावे व फोटो

Astronaut information in Marathi

अंतराळवीर म्हणजेच एस्ट्रोनॉट्स अवकाशात टॉयलेटचा वापर कसा करतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एस्ट्रोनॉट्स अवकाशात टॉयलेटचा वापर कसा करतात याबद्दल माहिती नसेल, तर या आर्टिकल च्या माध्यमातून आपण समजून घेऊया.!

नमस्कार मित्रानो, माहिती लेक मध्ये आपले स्वागत आहे.

अंतराळाचे जग हे खूप वेगळे आहे. हे जग दुरून जितके चित्तथरारक दिसते, तितकेच त्याचा प्रवासही तितकाच कठीण आहे. झिरो ग्रॅव्हिटी मुळे एस्ट्रोनॉट्स ला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या संबंधित अनेक व्हिडिओ आणि फोटो तुम्ही पाहिले असतील. एस्ट्रोनॉट्स चे शरीर अवकाशात सतत तरंगत राहतात. खाण्यापासून ते झोपेपर्यंत सर्व काम अगदी त्यांना तरंगतच करावे लागतात.

पण असा तरंगताना एस्ट्रोनॉट्स टॉयलेटचा वापर कसा करतात? याचा कधी विचार केला आहे का? त्याकरिता आपण अॅलन शेपर्डची कथा बघूया.!

चंद्रावर पोहोचण्यापूर्वी अनेक प्रयत्न करण्यात आले. अनेक प्रयत्नांनंतर, नील आर्म स्टॉर्म हे चंद्रावर पोहचू शकले. हे तर आपल्याला माहिती असेलच परंतु 1961 मध्ये अॅलन शेपर्ड हे अंतराळात प्रवास करणारे पहिले प्रवासी होते. तेव्हा तिथे राहण्याची मर्यादा फारच कमी होती.

साधारण 15 मिनिटे झाली होती. अशा परिस्थितीत अॅलन शेपर्डला तयार करून त्या मार्गाने पाठवण्यात आले. त्याला कमी फायबरचे अन्न खायला दिले गेले. मात्र या प्रवासात त्याला शौचालयास जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.

त्यामुळे त्याने लघवी आली असता मिशन कंट्रोलची परवानगी मागायला सुरुवात केली, त्यानंतर त्याचा स्पेस सूट ओला झाला. त्यामुळे तेथे सेन्सॉरशी संबंधित समस्याही निर्माण झाल्या होत्या.

परंतु ती परिस्तिथी बघता आज स्पेस स्टेशन टॉयलेट ची सुविधा आहे. 2000 मध्ये, डिझाइन केलेले शौचालय बांधले गेले. ते पुरुषांसाठी बनवले होते. याचा वापर करताना महिलांना खूप त्रास व्हायचा. याशिवाय ते स्वच्छ ठेवणेही अवघड होते. या सर्व गोष्टींमुळे, नासाने 2018 मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून एस्ट्रोनॉट्स साठी एक नवीन आणि वापरण्यास सोईस्कर टॉयलेट बनवले.


टॉयलेट कसे वापरावे?

ही टॉयलेट्स हैंडहेल्ड आणि फुटहोल्ड साठी आहेत. यामुळे एस्ट्रोनॉट्स यांना त्रास होत नाही. या टॉयलेट मध्ये एस्ट्रोनॉट्स बसू शकतात, तसेच उभे राहू शकतात. पृथ्वीवर वापरल्या जाणार्‍या शौचालयांप्रमाणेच एस्ट्रोनॉट्स या शौचालयांचा वापर करतात. यामध्येही झाकण उचलून बसावे लागते. ही टॉयलेट सीट तुमच्या घरापेक्षा लहान असते.


टॉयलेट कसे काम करते?

हे टॉयलेट व्हॅक्यूमसारखे काम करते. तो तुमचा कचरा हवेतून टाकीत मध्ये वाहून नेतो. ते दर दहा दिवसांनी बदलले जाते. या टाक्या एअर टाईट कंटेनर आहेत. टाकी भरल्यानंतर ती कार्गो शिप मध्ये भरली जाते. अंतराळ स्थानकावर नेऊन पृथ्वीच्या वरच्या वातावरणात ते जाळले जाते.

कधीकधी शौचास पृथ्वीवर आणून अभ्यास केला गेला. अंतराळात पाणी ठेवणे हे फार कठीण आहे. ते खूप भारी आहे. म्हणूनच एस्ट्रोनॉट्स हे लघवीला रीसायकल करून त्याचा वापर करतात.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *