मराठी कथा / marathi love story
marathi love story
विश्वास
“हॅलो…… बोल रोहित काय म्हणतोस?” रोहित चा मोबाइलवर कॉल येताच क्षणाचा पण विलंब न करता आनंद बोलत होता.
रोहित:- काही नाही सहज कॉल केला होता….तू काय करत आहेस सध्या?
आनंद:- मी जेवण करत आहे.
रोहित:- बर मी नंतर कॉल करतो तुला!
आनंद:- अरे नको नको बोल तू झालाच माझं…. बोल काय झालं?
रोहित:- श्रेया चा कॉल आला होता. तिच्या क्लास मधल्या एका मुलाने तिला प्रपोस केला, आणि तो तिला उत्तर मागत आहे?
आनंद:- काय…? या वर तू काय म्हणालास तिला?
रोहित:- मी म्हणालो तिला की त्याला आपल्या बद्दल सर्व सांगून टाक!
आनंद:- मग काय ?
रोहित:-ती म्हणाली की तो माझ्या बद्दल काय विचार करेल आणि तस पण मी त्याला सांगितलं की माझ्या घरी असलं काही चालत नाही. आणि मला पण असलं काही आवडत नाही. त्यावर तो म्हणाला की आपण घरच्यांच्या परमिशन ने लग्न करू….!
आनंद:- मग काय म्हटलं तू…?
रोहित:-आत्ता तो तिला नेहमी तोच एक प्रश्न विचारतो. तिला म्हटलं मी की तू बोलत जाऊ नकोस त्याच्या सोबत तर ती म्हणते की मी हे माझ्या पध्दतीने हँडल करते.
तू टेन्शन नको घेऊस! आता तू सांग आनंद मी टेन्शन नको घेऊ तर काय करू…..? माझं तिच्या वर खूप प्रेम आहे रे….आणि मी तिला त्याच्या बद्दल काही विचारलं की ती टाळाटाळ करते.
ती म्हणते त्याचा विषय परत काडू नकोस……मी तुझी आहे आणि तुझीच राहणार…….!
आनंद:- मग तू कशाला टेन्शन घेतोस,ही काय मोठी गोष्ट नाही. सर्व काही नॉर्मल तर आहे.
रोहित:- काय नॉर्मल…? त्याने काही विचित्र प्रकार केला तर….?
आनंद:- बघ रोहित…..ते कसं असत. तू तिला त्याच्या बद्दल नेहमी विचारणार. आणि तिला तू सांगणार कस वागायचं तर ते चुकीचं आहे. कारण प्रत्येकाला आपला आपला स्वाभिमान असतो.
आणि नेमका तू तोच दुखावणार त्यामूळे काय होईल…जे ती तुला आत्ता सर्व काही सांगते ते ती बंद करेल.
रोहित:- मग मी आता करू तरी काय…..मला या प्रॉब्लेम मुळे झोप पण लागत नाही…..
आनंद:- तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे रोहित…. तुला माहीत आहे का? तुझा तुझ्या प्रेमावर विश्वास नाही. हे प्रेम जे असताना.
एकाच आधारावर टिकतो. तो आहे विश्वास….. तोच जर नसेल तुमच्यात तर तुमचं अवघड आहे.
तीने म्हटलं ना की ती सर्व वेवस्थित करेल …..तू काळजी करू नकोस.! तिचे निर्णय तिला घेऊ देना. आणि हो तसे पण तुम्ही अजून कुठल्या विशेष नात्यात गुंतलेले नाही, तुम्ही फक्त गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहात.
रोहित:- तू जे बोलत आहे, ते पण बरोबर आहे यार…..!
आनंद:- आणि हो एकमेकांचे निर्णय एकमेकांवर लादू नका. फक्त एकमेकांवर विश्वास ठेवा. तू तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर,आणि…………रोहित 5 मिनिट होल्ड कर माझ्या गर्लफ्रेंड चा कॉल ऐतोय…..
रोहित होल्ड वर…….
आनंद:- स्मिता कुठे होतीस तू? कितीवेळ पासून तुला कॉल करतोय…..
तुझा फोन का व्यस्त लागत होता…कोना सोबत बोलत होतीस……
स्मिता :-अरे फ्रेंड सोबत बोलत होती….इतकं चिडायला काय झालं?
आनंद:- नक्की फ्रेंड सोबतच बोलत होतीस ना की……
तिकडून रागात स्मिताने कॉल कट केला…… परत आनंद आणि रोहित कॉल वर….
आनंद:- ह्या मुलीना…….जाऊ दे…..ह तर रोहित आपण कुठं होतो……………..
………………….समाप्त………………….
- सागर राऊत