उद्योग आधार बद्दल संपूर्ण मराठीत माहिती.!

udyog aadhar / udyog aadhar registration

udhyog-aadhar

उद्योग आधार माहिती मराठी

उद्योग आधार म्हणजे काय? (Udyog Aadhar in Marathi)

आपला देश हा विकसनशील देश आहे, त्याचा विकास हा झपाट्याने होत आहे. त्याच करीता आपले सरकार रोज नवीन योजना तयार करीत आहे व त्या राबवत आहे. त्याच प्रकारे एक योजना आहे. ‘उद्योग आधार योजना

उद्योग आधार या योजने मध्ये तुम्ही तुमच्या लघु उद्योग किंवा मध्यम लघु उद्योग चे रजिस्ट्रेशन करून सरकार च्या उद्योगाणसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेऊ शकता. ज्यांनी नुकताच आपला व्यवसाय चालू केला आहे; ते अगदी सोप्या पद्धतीने यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात.

कोणताही नवीन उद्योजक एका प्रश्नाचे उत्तर शोधतो की, उद्योग आधार काय आहे? तुम्ही जर याच प्रश्नच उत्तर शोधत असाल, तर तुम्ही योग्य जागी आले आहात. चला तर मग बघूया उद्योग आधार काय आहे.

उद्योग आधार हे काही खूप मोठी गोष्ट नाही. हे फक्त जस तुम्हाला ओळखण्यासाठी सरकार ने आधार कार्ड नंबर दिला आहे. त्याच प्रकारे उद्योगांना ओळखण्यासाठी उद्योग आधार नंबर दिला आहे. जो कि 12 अंकी आहे.

हे वाचलंत का? –
* गॅस सिलेंडर संपूर्ण माहिती आणि आजचे भाव
* रेशन कार्ड धान्य वाटप माहिती

जो त्यांचा उद्योगाचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणून ओळखला जातो. या योजने अंतर्गत उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून सरकार कडून काही सब्सिडी दिली जाते.उद्योग आधार ही योजना चालू करण्यामागे सरकार चा उद्देश असा आहे; की छोटे मध्यम स्वरूपाचे जे व्यवसाय आहे त्यांना काही अर्थिक मदत करून मोठे करणे.

उद्योग आधार च्या आधी उद्योजकांना व्यवसाय रजिस्ट्रेशन साठी खूप किचकट प्रक्रिये मधून जावं लागतं असे. ज्यामुळे उद्योजकांना मानसिक ताण येत होता. या प्रक्रियेला वेळ सुद्धा खूप लागत असल्याने काही उद्योग रजिस्ट्रेशन करणे टाळायचे. कारण याकरिता खूप कागदपत्रे जोडावे लागत असे.


उद्योग आधार योजनेचे फायदे

उद्योग आधार फायदे

1) सरकार पासून होणारी मदत

यामध्ये रजिस्टर असलेल्या व्यवसायांना सरकार खूप प्रकारची मदत करते. मदतीचे स्वरूप म्हणजे तुमच्या उद्योगाला सरकार सब्सिडी देईल. या मदतीमुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा करण्यात मदत होईल.

2) कर्ज घेण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही

आपण आपल्या रजिस्ट्रेशन फॉर्म ने बँक मध्ये चालू खात खूप सहज रित्या उघडू शकतो. ज्यामुळे आपल्या खात्यावर असलेल्या व्यवहारावर कोणत्याही अडचण न येता कर्ज काढू शकतो. ना कुणाच्या शाश्वती ची गरज ना प्रॉपर्टी चे कागद जमा करायची काळजी.


उद्योग आधार रजिस्ट्रेशन घर बसल्या करू शकतो का?

सरकार ने याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपुर्ण ऑनलाइन केलेली आहे. तुम्हाला उद्योग आधार च रजिस्ट्रेशन करायला कोणत्याच ऑफिस मध्ये जायचं काम नाही. तुम्ही यावर अगदी घरी बसून रजिस्ट्रेशन करू शकता. ज्यामुळे तुमचा वेळ सुद्धा वाचेल व कुणाला पैसे द्यायची गरज पण भासणार नाही.


उद्योग आधार रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला कोणते कागदपत्र लागतात?

  • तुम्हाला उद्योग आधार मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या जवळ आधार कार्ड असणे गरजेचे आहे व त्याला मोबाईल नंबर जोडलेला असावा.
  • आधार कार्ड सोबतच काही आणखी कागद तुम्हाला जोडावे लागतील. तुमचा पत्ता, त्याचे प्रमाणपत्र आणि तुम्ही ज्या जागेवर व्यवसाय करत आहे, तेथला पत्ता देने गरजेचे आहे.
  • जर तुम्ही सामान्य वर्गामधून येत असाल, तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र इथे जोडावे लागेल. ज्यामुळे तुमच्यासाठी असलेल्या योजना तुम्हाला मिळतील.
  • इथं तुम्हाला तुमच्या बँक ची माहीती द्यायची आहे. यासाठी बँक खात्याची आवश्यकता असेल जे तुम्हाला नॅशनल बँके मधून काढायचे आहे. कारण या खात्या मध्ये तुम्हाला मिळणारी सब्सिडी जमा होईल.

उद्योग आधारसाठी लागणारे इतर कागदपत्रे

1) पॅन कार्ड (Pan Card)
2) आधार कार्ड (Aadhar Card)
3) ड्राइविंग लाइसेंस (driving license)
4) वोटर आईड़ी (Voter Id)
5) राशन कार्ड (Ration card)
6) पासपोर्ट (Passport)


उद्योग आधार रजिस्ट्रेशन कसे करावे ? (Udyog Aadhar registration)

उद्योग आधार रजिस्ट्रेशन (Aadhaar Udyog official website)

1) सर्वात आधी भारत सरकारच्या MSME मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळा वर जा अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन इथं तुमचा आधार नंबर टाका सोबतच तिथं तुम्हाला तुमचे नाव लिहायचे आहे.

2) लक्षात असू द्या की तिथं आपल्याला आधार कार्ड वर जस नाव आहे, तसाच लिहायचं आहे. तुमच्या आधार कार्ड वर नाव चुकीचे असेल, तर आधी ते दुरुस्त करून घ्या.

3) तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. याकरिता तुम्हाला आधार कार्ड ची पावती वरील इनरोलमेंट id द्यावी लागेल.

4) यानंतर तुमच्या आधार कार्ड च्या व्हेरिफिकेशन साठी तुम्ही जो नंबर आधार ला जोडला आहे. त्यावर एक पासवर्ड येईल या नंतर तुमची रजिस्ट्रेशन प्रॉसेस चालू होईल.

5) नंतर तुम्हाला आणखी माहिती भरायची आहे. जसे तुम्ही पुरुष आहे की महिला, तुमच्या कंपनी चा प्रकार ही सर्व माहिती भरायची आहे. रजिस्ट्रेशन च्या शेवटच्या टप्प्यात आल्या नंतर.

6) आता शेवटच्या टप्प्यात तुम्हाला कंपनी ची संपूर्ण माहिती द्यायची आहे. जसे की तुम्ही कंपनी मध्ये कोणत्या मशीन वापरणार आहे, कोणते उपकरण वापरण्यात येणारी आहे, तुम्ही कर्मचारी किती ठेवणार आहे… इत्यादी.

7) तुमची जर आधी कंपनी असेल व तुम्ही तीच रजिस्ट्रेशन करून उद्योग आधार नंबर घेऊन ठेवला, असेल तर त्याची सुद्धा माहिती यात भरावी लागेल. नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता.

8) या सर्व माहिती नंतर एक गूगल चा मेल id तयार करून घ्या कारण या फॉर्म मध्ये तुम्हाला mail id द्यावी लागेल सोबतच तुमच्या बॅंकेची माहिती भरावी लागेल. त्या नंतरच तुम्हाला सरकार कडून UAM नंबर मिळेल जो कि तुमच्या कंपनी रजिस्ट्रेशन चे प्रमाण राहील.


UAM काय आहे?

उद्योग आधार मेमोरेडम ही एक अशी प्रक्रिया आहे ज्या प्रक्रिये मूळे तुम्ही उद्योग आधार मध्ये रजिस्ट्रेशन फक्त एक फॉर्म भरून करू शकता जी भारत सरकारच्या MSME मांत्रालया द्वारें चालवली जाते.


उद्योग आधार मेमोरेंडम संख्येचे व्हेरिफिकेशन

यासाठी तुम्हाला दिलेल्या लिंक वर जायचं आहे. अधिकृत संकेतस्थळ क्लिक केल्यावर एक नवीन पेज तुमच्या समोर उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे.

नंतर खाली एक फोटो दिसेल ज्याला तो कोड तुम्हाला तिथंच बाजूने भरायचा आहे. यानंतर व्हेरिफाई या वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला आणखी एक नवीन पेज दिसेल. जे तुमच्या उद्योग आधार च्या रजिस्ट्रेशनला व्हेरिफाय करेल.


उद्योग आधार ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे?

या करिता अगदी सोपी पध्दत आहे. अधिकृत संकेतस्थळ वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा या नंतर एक पेज उघडेल त्यावर तुमचा आधार कार्ड नंबर आणि उद्योग आधार कार्ड नंबर टाकावा लागतो. त्या नंतर तुम्ही त्याची प्रिंट आऊट काढू शकता.


उद्योग आधार बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

Q.1- उद्योग आधार ला किती फी लागते?

Ans- उद्योग आधार ला शून्य रजिस्ट्रेशन फि आहे. याच रजिस्ट्रेशन तुम्ही एकही पैसे खर्च न करता करू शकता.

Q.2- उद्योग आधारसाठी कोणती योग्यता पाहिजे?

Ans- याची सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही या मध्ये रजिस्ट्रेशन तेव्हाच करू शकता जर तुमचा व्यवसाय आज चालू असेल तुम्ही भविष्यात चालू करणार असलेल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन इथं करू शकत नाही. याच सोबत तुम्ही भारताचे नागरिक असणे महत्त्वाचे आहे. या मध्ये लघु उद्योग, मध्यम उद्योग च रजिस्ट्रेशन करू शकतात. ज्यामध्ये उद्योगाच्या सीमा मनुफॅक्टअरिंग कंपनी साठी 10 करोड तर सर्विस कँपनी साठी 5 करोड ठेवलेली आहे.

Q.3- लघु उद्योगासाठी कर्ज कुठून घावे?

Ans- भारत सरकार द्वारे भारतीय विकास बँक SIDBI नि सूष्म आणि लघु उद्योग CGTMSE च्या साठी गारंटी फंड ट्रस्ट ची स्थापना केली आहे.

या योजने अंतर्गत तूमच्या व्यवसाय साठी लागणाऱ्या मशीन साठी 25 लाख ते 5 करोड पर्यंत कर्ज मिळते. लघु उद्योगाची एक चांगली गोष्ट ही आहे की याला कमी गुंतवणूक करून चालू करता येते. आपण या लेख मध्ये उद्योग आधार कसे रजिस्ट्रेशन करायचं हे बघितले, त्यानंतर आपण त्याचे फायदे बघितले, तसेच लघु उद्योजकांना सरकार कशा प्रकारे मदत करीत आहे हे बघितले.

हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!


  • धिरज तायडे

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment