thibak-sinchan-yojna-krushi-dainik

ठिबक सिंचन योजना अनुदान 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो.., सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना या योजने मुळे आपले उत्पन्न वाढणार आहे. चला तर पाहूया ही कोणती योजना आहे.

शेतकरी मित्रांनो आपल्या करिता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत याआधी जे अल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या साठी 55 टक्के अनुदान होते आणि सर्वसाधारण साठी 45 टक्के अनुदान होते.

त्या नंतर शासनाद्वारे ऑगस्ट 2021 मध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णया नंतर जे अल्पभूधारक शेतकरी होते, त्यांना अनुदान वाढून 80 टक्के करण्यात आले आणि सर्वसाधारण साठी हे अनुदान 75 टक्के करण्यात आले. हे अनुदान या लेखात खाली दिलेल्या जिल्ह्यासाठी उपलब्ध असणार आहे.

ठिबक सिंचन म्हणजे काय?

ज्या भागात पाण्याची कमतरता आहे. त्यांना पिकांना पाणी द्यायला खूप त्रास होतो. अश्या दुष्काळी भागासाठी हि योजना खूप फायद्याची आहे.

ठिबक सिंचन या पद्धतीत झाडाच्या एकदम खोडा ला लागून जी याची नळी दिलेली राहते. ती ठेवली जाते व या नळी मधून झाडाच्या मुळांना थेंब थेंब पाणी दिले जाते. त्यामुळे पाणी अतिशय कमी लागते व पाण्याची बचत होते. या पद्धती मध्ये जमिनीत पाणी रीसण्याचा वेग खूप कमी असतो.

योजनेचा लाभ कोण घेवू शकतो?

जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, नवीन ठिबक सिंचन योजने नुसार शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान मिळणार, तसेच जे शेतकरी सर्वसामान्य आहेत त्यांना 75 टक्के देण्यात येईल.

शेतकऱ्याची काय पात्रता लागेल?

शेतकरी मित्रांनो या योजने मध्ये 80 टक्के व 75 टक्के ठिबक सिंचन अनुदान घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील ते माहिती पाहूया.

मित्रांनो ज्या शेतकऱ्यान जवळ 5 हेक्टर शेत आहे, ते सर्व शेतकरी मित्र या योजनेत पात्र आहेत.

या योजने करिता लागणारी कागदपत्रे

1) तुमचे नवीन वीज बिल
2) आठ अ
3) सात बारा उतारा
4) तुम्ही जो संच खरेदी केला आहे त्याचे बिल.
5) समती पत्र

  • तुम्ही जर एस-सी किंवा एसटी जात वर्ग मधील असाल तर जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही जर 2016 -17 मध्ये या योजनेचा तुमच्या सर्वे नंबर वर लाभ घेतला असेल. तर पुढील 10 वर्ष या योजनेचा परत लाभ घेवू शकत नाही. आणि तुम्ही 2017-18 या वर्षा मध्ये लाभ घेतला असेल, तर तुम्ही 7 वर्ष या योजनेचा लाभ घेवू शकत नाही.
  • या योजने साठी अर्ज करण्याआधी तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे, म्हणजेच बोर किंवा विहीर व लाईट असणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला योजने साठी नवीन वीज बिल जोडावे लागेल.
  • मंजुरी मिळाल्यानंतर कृषी सिंचन संच हा अधिकृत विक्रेत्या जवळून खरेदी करा व आपल्या शेतात बसून घ्या व त्याच्या पावत्या ह्या एक महिन्या मधे अपलोड करा.

कोणते जिल्हे याकरिता पात्र आहेत?

  • या योजने मध्ये आत्महत्या ग्रस्त 14 जिल्हे 3 नक्सलग्रस्त जिल्हे अशे पूर्ण 17 जिल्हे आहेत.
  • आणि उर्वरित महाराष्ट्रातील 244 तालुक्या मध्ये मुख्यमंत्री शाश्वत योजना कार्य करत होती.
  • या योजने मध्ये महाराष्ट्रातील बाकी 106 तालुके टाकले आहेत. अशी माहिती दादाजी भुसे यांनी दिली.

हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Schemes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *