पालक खाण्याचे फायदे आणि नुकसान |Spinach in Marathi

पालक खाण्याचे फायदे आणि नुकसान

Spinach in Marathi

भारतात पालकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यालाच इंग्रजी मध्ये स्पिनेच (Spinach) या नावाने ओळखले जाते. पालकाचे शास्त्रीय नाव स्पिनासिया ओलेरेसिया (Spinacia oleracea) असे आहे.

माहिती लेक च्या या लेखात आम्ही तुम्हाला पालक खाण्याचे फायदे, पालकातील पौष्टिक घटक आणि पालकाचे तोटे याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती देणार आहोत, जे तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतील.

Spinach meaning in Marathi


पालकातील पौष्टिक घटक

पौष्टिक घटकप्रति 100 ग्रॅम
1) पानी (Water)91.40 ग्रॅम
2) ऊर्जा (Energy)23 kcal
3) प्रथिने (Protein)2.86 ग्रॅम
4) लिपिड (चरबी) – lipids (fats)0.39 ग्रॅम
5) कर्बोदके (Carbohydrates)3.63 ग्रॅम
6) फायबर (Fiber)2.2 ग्रॅम
7) साखर (Sugar)0.42 ग्रॅम
8) कॅल्शियम (Calcium)99 मिग्रॅ
9) लोह (Iron)2.71 मिग्रॅ
10) मॅग्नेशियम (Magnesium)79 मिग्रॅ
11) फॉस्फरस (Phosphorus)49 मिग्रॅ
12) पोटॅशियम (Potassium)558 मिग्रॅ
13) सोडियम (sodium)79 मिग्रॅ
14) झिंक (Zinc)0.53 मिग्रॅ
15) व्हिटॅमिन बी-60.195 मिग्रॅ
16) व्हिटॅमिन ई2.03 मिग्रॅ
17) व्हिटॅमिन ए469 μg
18) व्हिटॅमिन सी28.1 मिग्रॅ
19) थायमिन (Thiamine)0.078 मिग्रॅ

पालकाचे फायदे

1) डोळ्यांच्या आरोग्यासाठी

डोळ्यांच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठीही पालकाचे फायदे आहेत. खरं तर, दृष्टी निरोगी ठेवण्यासाठी, गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या खाण्याचा डॉक्टर नेहमी सल्ला देतात, त्यापैकी एक पालक आहे.

पालकामध्ये व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी हे पौष्टिक घटक आढळतात, ज्यामुळे मुख्यतः डोळ्यामध्ये होणारा मॅक्युलर डिजेनेरेशन (डोळ्यांचे आजार) होण्याचा धोका कमी होतो.

याशिवाय ल्यूटिन (Lutein) आणि जियाजैंथिन (Zeaxanthin) नावाची संयुगे पालकामध्ये आढळतात. ल्यूटिन आणि जियाजैंथिन चे सेवन हे अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याचे कार्य करते, जे मॅक्युला (रेटिनाच्या मध्यभागी असलेला केंद्र बिंदू) पिगमेंट डेनसिटी सुधारण्यात मुख भूमिका बजावू शकतात.

2) वजन कमी करण्यासाठी

जर तुम्हीही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल, तर पालकाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पालकामध्ये वजन कमी करण्याशी संबंधित गुणधर्म असल्यामुळे हे शक्य होऊ शकते.

तसे बघतले असता, वजन कमी करण्यासाठी, तुम्ही कमी प्रमाणात कॅलरी युक्त खाणे सर्वात महत्वाचे असते. पालक हा कमी कॅलरी असलेला खाद्यपदार्थ आहे, त्याचा आहारात समावेश करून तुम्ही तुमचे वाढते वजन नियंत्रित करू शकता.

तसेच एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, असे आढळून आले आहे, की निरोगी वजन मेन्टेन करण्यासाठी पालकाचे सेवन देखील केले जाऊ शकते.

3) हाडांच्या आरोग्यासाठी

हाडे निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम हे सर्वात महत्वाचे पोषक तत्व आहे, जे कि पालकांमध्ये 99 मिग्रॅ आहे. जे हाडांची निर्मिती आणि त्यांच्या विकासास मदत करते तसेच त्यांना मजबूत करते.

पालकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के आढळतात, त्यामुळे हाडांचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात पालकाचा समावेश करू शकता.

4) कर्करोग मध्ये फायदेशीर

पालकाचा वापर कर्करोगावरही फायदेशीर ठरतो. खरं तर, पालक बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन-सी समृद्ध आहे आणि हे दोन्ही पोषक कर्करोगाच्या पेशी विकसित होण्यापासून संरक्षण देऊ शकतात.

याशिवाय, ते अँटीऑक्सिडंटप्रमाणे फ्री-रॅडिकल्स आणि कार्सिनोजेन्स (एक असा पदार्थ ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो) रोखू शकतात.

5) हृदयविकाराचा धोका

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी तुम्ही पालकाचे सेवन देखील करू शकता. पालकाची गणना नायट्रेट पोषक असलेल्या भाज्यांमध्ये केली जाते, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा धोका कमी होतो.

6) रक्तदाब कमी करण्यासाठी

पालक खाणे हे रक्तदाबाचा धोका कमी करू शकतात. पालकामध्ये नायट्रेट आढळते. नायट्रेट उयक्त पालक रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तसेच, पालक खाण्याचा फायदा हृदयाच्या आरोग्यासाठी देखील होऊ शकतो.

7) निरोगी स्नायू ठेवण्याकरिता

पालक शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते, कारण पालकामध्ये लोह आढळतो. तज्ज्ञांनी केलेल्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार असे आढळून आले आहे, की पालकामध्ये असलेले लोह स्नायूंना निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.

8) गर्भधारणेदरम्यान पालकाचे फायदे

गरोदरपणात आईला सकस आहाराची गरज असते आणि आरोग्यदायी पदार्थांच्या यादीत पालकाचाही समावेश आहे. खरं तर, फोलेट हे गर्भधारणेदरम्यान आईला आवश्यक असलेले पोषक तत्व आहे, ज्यामुळे बाळामध्ये न्यूरल ट्यूब दोषांचा धोका कमी होतो.

पुरेशा प्रमाणात फोलेटची पूर्तता करण्यासाठी पालकाचे सेवन केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, गर्भधारणेमध्ये अशक्तपणा टाळण्यासाठी आईला लोह, स्तनपान करताना बाळासाठी कॅल्शियम आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायबर यासारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते.

ही पोषकतत्त्वे पालकामध्ये आढळतात आणि या पोषकतत्त्वांची गरज पालकाच्या सेवनाने भागवता येते.

9) अशक्तपणाचा कमी करण्यासाठी

गर्भधारणेदरम्यान अॅनिमियाचा म्हणजेच शरीरात लाल रक्तपेशींचा अभाव असणे हे सर्वाधिक धोकादायक असते. लोहाच्या कमतरतेमुळे ही स्थिती उद्भवू शकते.

अॅनिमियाचा धोका कमी करण्यासाठी लोहाची मुबलक प्रमाणात गरज असते, जी कि पालकातून पूर्ण करता येते.

10) रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

रोगमुक्त राहण्यासाठी, मजबूत प्रतिकारशक्ती असणे खूप महत्वाचे आहे. पालकामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात आढळते आणि व्हिटॅमिन-ई रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करू शकते. म्हणून आपल्या आहारात पालकांचा समावेश आवश्यक आहे.


पालक खाण्याची योग्य पद्धत

 • पालकाची भाजी बनवून खाऊ शकता.
 • पालक हिरव्या कोशिंबीर मध्ये टाकून खाऊ शकता.
 • पालकाचा रस बनवून पिऊ शकता.
 • मसूर बरोबर शिजवलेला पालक खाऊ शकता.
 • पालकाचे पराठे बनवून खाऊ शकता.
 • पालक पनीर भाजी बनवून देखील खाऊ शकता.

पालक खाण्याचे नुकसान

पालक खाण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही देखील आहेत. पालक खाण्याचे फायदे आपण जाणून घेतल्यानंतर जाणून घेऊया त्याचे तोटे-

 • पालकमध्ये भरपूर कॅल्शियम असते आणि कॅल्शियमचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकार होऊ शकतो.
 • पालक यामध्ये फायबरचे प्रमाण असते, ज्यामुळे तुम्हाला पोट फुगणे, सूज येण्याची समस्या असू शकते.
 • पालकातील बीटा-कॅरोटीन जे कि फळे आणि भाज्यांमध्ये आढळणारे अ जीवनसत्व आहे. हे धुम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये कर्करोगाचा धोका वाढवू शकते.
 • पालक पोटॅशियमने समृद्ध आहे आणि पोटॅशियमच्या जास्त प्रमाणामुळे उलट्या आणि अतिसार होऊ शकतो.
 • ज्या लोकांना किडनीशी संबंधित आजार आहेत, त्यांनी पालकाचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांना ऑक्सलेट आणि पोटॅशियमने भरपूर असलेले पालक टाळण्याचा सल्ला दिला जातो.

 • संदर्भ –

📢 महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला पालक खाण्याचे फायदे आणि नुकसान बद्दल माहिती देणे असल्याकारणाने पालक खाण्याचा वापर आरोग्याच्या हेतूने करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊


 • सागर राऊत
Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment