Small Business Ideas: जर तुमच्याकडे एखादी छानशी व्यवसाय आयडिया असेल, जी लोकांच्या काही अडचणी सोडवते, तर तो व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. त्या व्यवसायाच्या आयडिया मधून तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही एक अशी बिझनेस आयडिया आणली आहे.

जी तुम्ही नोकरी सोबतच पार्ट टाइम मध्ये अगदी कमी भांडवलात सुरु करू शकता आणि दरमहा चांगले पैसे कमवू शकता. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुद्धा सुरू करू शकता.

जर तुम्हाला थोडी सजावट कशी करायची हे माहित असेल, तर तुम्ही गिफ्ट बास्केट बनवण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि रिकाम्या वेळेत घरी बसून महिन्याभरात चांगली कमाई करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 5,000 रुपये लागतील.

जर आपण पाहिलं तर, आज बहुतेक लोक खास प्रसंगी जसे कि साखर पुडा, लग्न, वाढदिवस च्या दिवशी आपल्या ओळखीच्या लोकांना गिफ्ट बास्केट देतात. या व्यवसायाची सर्वात खास गोष्ट म्हणजे लोक अजिबात घिस घिस करत नाहीत.व्यवसाय अगदी सोपा आहे.

गिफ्ट बास्केट बनवण्यासाठी तुम्हाला बाजारातून काही बास्केट आणि गिफ्ट खरेदी कराव्या लागतात आणि गिफ्ट या बास्केट मध्ये पॅक कराव्या लागतात, फक्त बास्केट चांगली सजवून ती लोकांना द्यावी लागेल. आजच्या काळात गिफ्ट बास्केट व्यवसायाला बाजारात मोठी मागणी आहे. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरी अगदी सहज सुरु करू शकता. एंगेजमेंट, लग्न, वाढदिवस अशा अनेक खास प्रसंगी गिफ्ट बास्केटना मागणी असते.

चांगल्या कंपन्यांनीही या व्यवसायात प्रवेश केला आहे. परंतु स्थानिक बाजारपेठेत तुम्ही तो चांगल्या प्रकारे चालवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू खरेदी कराव्या लागतील, ज्याची किंमत सुमारे 5 हजार रुपये असेल. जसे की सजावटीचे साहित्य, लोकल आर्ट एंड क्राफ्ट वस्तू , ज्वेलरी के पिस्स, स्टिकर्स, पॅकेजिंग साहित्य, फॅब्रिकचे तुकडे, कात्री, पातळ वायर, वायर कटर, पेपर श्रेडर, मार्कर पेन, कार्टन स्टेपलर, कलरिंग टेप आणि गोंद इ.

हे सर्व सामान तुम्ही तुमच्या स्थानिक बाजारातून खरेदी करू शकता. आशा करतो कि हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, अश्याच माहिती साठी माहिती लेक या वेबसाईट ला अवश्य भेट द्या.!


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *