आपल्या देशातील फार कमी लोकांना शेअर बाजार समजून घ्यायचा आहे. याचे कारण आहे की, लोकांमध्ये शेअर बाजाराबद्दल खूप गैसमज आहे. काही लोक शेअर बाजाराला जुगाराशी जोडतात. तर काही लोकांना शेअर बाजार हा एक कठीण विषय वाटतो.

आज प्रत्येकजण पैसे कमवण्याचे मार्ग शोधतो. जीवनात पैशाचे महत्त्व कोणाला माहित नाही? जगात कोणाला पैसे कमवायचे नाहीत? प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे.

जगात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत, काही लोक नोकरी करून पैसे कमवतात तर काही लोक व्यवसाय करून पैसे कमवतात.

परंतु शेअर मार्केट मध्ये पैसे कमावणे म्हणजे जुगार समजणारे लोकांसाठी हे आर्टिकल खूप महत्वाची आहे..! या आर्टिकल मधून त्यांचे बरेचशे गैसमज दूर होणार आहेत. तसेच ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय? हे समजून घ्यायचे आहे. त्यांना हे आर्टिकल एक वरदानच ठरणार आहे. चला तर मग सविस्तर शेअर बाजाराची माहिती घेऊया..!

bse sensex

Share Market In Marathi

Share Market In Marathi

शेअर मार्केट म्हणजे काय? – what is share market in marathi

शेअर मार्केट एक असा बाजार आहे. जिथे विविध व्यक्ती, संस्था आणि कॉर्पोरेशनद्वारे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात. हे शेअर्स वेगवेगळ्या कंपन्यांचे असतात, जे स्टॉक एक्सचेंजमध्ये वेगवेगळ्या एक्सचेंजवर नोंदलेले असतात. शेअर मार्केट ला अजून स्टॉक मार्केट म्हणून देखील ओळखतात. या दोन गोष्टी मधील फरक आपण पुढे बघणार आहोतच.

खरेदी -विक्रीला सामान्य भाषेत ट्रेडिंग (व्यापार) असेही म्हणतात. “शेअर” हा शब्द कोणत्याही एका कंपनीचा किंवा फर्मचा वाटा दर्शवण्यासाठी वापरला जातो आणि बाजारपेठ ही अशी जागा आहे जिथे खरेदी, विक्री किंवा व्यवहार होतात.

हे वाचलंत का? –
* क्रिप्टो करेंसी म्हणजे काय?
* गुंतवणूक कुठे व कशी करावी?

शेअर मार्केट चे अस्तित्व का आहे ? – share market information in marathi

एखादी छोटी कंपनी ला खूप मोठं व्हायचे असेल किव्हा आपला विस्तार वाढवायचा असेल तेव्हा कंपनी स्वतःला शेअर मार्केट मध्ये register करतात त्याला IPO (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) असे म्हणतात ज्यामुळे तुम्ही त्या कंपनी चे शेअर विकत घेऊ शकता ज्या कंपनी चे जितके शेअर तुमच्या कडे असेल तेवढे तुम्ही त्या कंपनी चे एक प्रकारचे पार्टनरच (भागीदार) असतात

तुमची घेतलेल्या शेअर मुळे त्या कंपनी चा विस्तार करू शकतात तसेच त्यांच्या कंपनी मध्ये तितकी भागीदारी असल्याकारणाने त्या कंपनी ला होणार फायदा तसेच नुकसार या मध्ये पण तुमची भागीदार असणार.


आयपीओ म्हणजे काय? – What is IPO

कंपनी आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारानं कडून पैसे गोळा करतात, आणि गुंतवणूकदारांना कंपनीमध्ये विशिष्ट हिस्सा मिळतो. आयपीओद्वारे हे स्टॉक वाटप प्राथमिक बाजारात (प्रायमरी मार्केट) केले जाते.

महत्वाची सूचना –

जर तुम्हाला शेअर बाजाराच्या मूलभूत गोष्टी समजून घ्यायच्या असतील, तर तुम्हाला तुमचे बचत खाते व्यवस्थापित करण्यापासून सुरुवात करावी लागेल.

कारण, शेअर बाजारात नफा आणि तोटा या दोन्ही गोष्टी समाविष्ट आहेत, एखाद्याला आपले कष्टाचे पैसे कसे व्यवस्थापित करावे हे माहित असणे गरजेचे आहे. जर तुम्ही शेअर बाजारात प्रवेश करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की शेअर बाजाराचे काही निश्चित नियम जोखमीवर अवलंबून असतात.

तसेच, गुंतवणुकीचे उद्दिष्ट, परतावा क्षमता, जोखमीची, बाजारातील समज, दलालावरील अवलंबित्वाची पातळी यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. याव्यतिरिक्त, तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीशी संबंधित अस्थिरता समजून घेणे आवश्यक आहे. ज्याला आपण इंग्रजीमध्ये (Volatility) असे म्हणतो.

उदाहरणार्थ, शेअर बाजार रिअल इस्टेट,एफडी, सोन्यातील गुंतवणूक इत्यादीपेक्षा जास्त वोलेटाइल/अस्थिर आहे. हे क्रिप्टोकरन्सी किंवा तेल आणि गॅस ड्रिलिंगपेक्षा कमी अस्थिर आहे.

(सूचना – आज काल मुलांमध्ये नवीन ट्रेंड आला आहे कि, शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून श्रीमंत व्हायचय. यामागचे कारण कि, नवीन आलेल्या शेअर मार्केट संबंधित वेब सिरींजेस. घरापासून शिक्षणासाठी बाहेर आलेले कॉलेज तसेच शाळकरी विद्यार्थी आपले मेस, रूम भाडे, तसेच कॉलेज फी हि शेअर मार्केट मध्ये लावून असा विचार करतात कि त्यांचे पैसे दुप्पट होईल आणि त्यांची पैश्याची अडचण भागेल परंतु शेअर मार्केट चे क्नॉलेज नसल्याकारणाने ते आपले पैसे बुडवतात आणि नंतर त्यांच्यावर उधारी, कर्ज यासारख्या जाळ्यात फसतच जातात.

असे बरेचशे किस्से ऐकायला मिळतात. माझे पर्सनल मत आहे कि, असा प्रकार कृपया करू नये..! सध्या शिक्षणात लक्ष द्या आणि शेअर मार्केट च अभ्यास चालू ठेवा. जेव्हा तुमच्या कडे गुंतवणुकी साठी काही पैसे जमा होतील व तसेच मार्केट बद्दल क्नॉलेज आलेले असेल, तेव्हा निश्चित शेअर बाजारात निवेश करा.

हि सूचना आर्टिकल संपल्यावर खाली असायला होती. परंतु बरेचशे लोक आर्टिकल पूर्ण वाचत नाहीत. त्यामुळे हि महत्वाची सूचना मी खास करून आर्टिकल सुरु झाल्याबरोबर लिहिली. आत्ता तुम्ही हे आर्टिकल सोडून जरी गेलेत तरी आम्ही आणि तुम्ही खूप सर मिळवले असे समजू.)


शेअर मार्केट माहित असणे का गरजेचे आहे?

शेअर बाजार हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या गतीला एक कल देतो. म्हणून, जरी तुम्ही शेअर बाजारात व्यापार करत नसाल, पण देशाची आर्थिक व्यवस्था समजून घेण्यासाठी, शेअर बाजाराची माहिती असणे खूप आवश्यक आहे.

शेअर बाजार हे एक प्रचंड बाजार आहे जिथे शेअर्स, कमोडिटी, करन्सी, इत्यादी विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे.

भारतामध्ये शेअर्स कसे खरेदी करायचे आणि किती शेअर बाजार आहेत हे फार कमी लोकांना माहीत आहे. काळजी करू नका..! तुम्ही योग्य ते आर्टिकल वाचत आहे. यामध्ये तुमचे शेअर मार्केट बद्दलचे सर्व गैरसमज दूर होणार आहेत. शेअर मार्केट बद्दल समजून घेण्याआधी शेअर मार्केट च्या इतिहासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया..!


शेअर बाजार चा इतिहास – History of stock exchange in India

भारतातील शेअर बाजाराची सुरुवात 18 व्या शतकाच्या आसपास झाली. जेव्हा काही व्यापाऱ्यांनी मुंबईच्या टाऊन हॉलसमोर वटवृक्षाखाली व्यापार सुरू केला. या काही व्यापाऱ्यांनी आधी कापसाचा व्यापार सुरू केला होता भारतातील पहिले संघटित स्टॉक एक्सचेंज 1875 मध्ये मुंबई येथे सुरू झाली आणि ते शेअर बाजार आशियातील सर्वात जुने असल्याचे सांगतात.

1894 मध्ये अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज तेथील कापड गिरण्यांच्या शेअर्समध्ये व्यवहार करण्यासाठी सुरू करण्यात आले. कलकत्ता स्टॉक एक्सचेंज 1908 मध्ये लागवड आणि जूट मिलच्या शेअर्सला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आला.

त्यानंतर 1920 मध्ये मद्रास स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यात आले. सध्या देशात 24 स्टॉक एक्स्चेंज आहेत, त्यापैकी 21 क्षेत्रीय आहेत जे वाटप केलेल्या क्षेत्रासह आहेत. सुधारणांच्या युगात स्थापन केलेल्या इतर दोन, म्हणजे, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) आणि ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया (OICEI) यांना राष्ट्रनिहाय व्यापार करण्याचा अधिकार आहे.

ते अहमदाबाद, वडोदरा, बेंगलोर, भुवनेश्वर, मुंबई, कोलकाता, कोची, कोईम्बतूर, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, जयपूर ‘कानपूर, लुधियाना, चेन्नई मंगलोर, मेरठ, पाटणा, पुणे, राजकोट येथे आहेत.

स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापन त्यांच्या प्रशासकीय मंडळे आणि कार्यकारी प्रमुखांद्वारे केले जाते. त्यांच्या नियमन आणि नियंत्रणाशी संबंधित धोरणे वित्त मंत्रालयाने ठरवतात.

सिक्युरिटीज उद्योग आणि स्टॉक एक्सचेंजेसचा सुव्यवस्थित विकास आणि नियमन करण्यासाठी सरकारने एप्रिल 1988 मध्ये भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सेबी) Securities and Exchange Board of India (SEBI) ची स्थापना केली.


शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट मध्ये काय फरक आहे?

अनेक गुंतवणूकदारांना असे वाटते की शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट समान आहेत. मुळात फारसा फरक नसला तरी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट मध्ये मूलभूत फरक नाही. या दोन्ही संज्ञा एकाच बाजाराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरल्या जातात. यामध्ये फरक फक्त इतकाच कि जिथे शेअर मार्केट हे कंपनीच्या एका शेअरचे संख्या दाखवण्यासाठी वापरली जाते. तर स्टॉक हे एक पेक्ष्या जास्त कंपनीच्या शेअर ची संख्या दाखवण्यासाठी वापरली जाते.

 • एक कंपनी चा शेअर = शेअर
 • अनेक कंपनीचे शेअर = स्टॉक

बुल आणि बेयर मार्केट म्हणजे काय?

बुल म्हणजे बैल आणि बेयर म्हणजे अस्वल.

शेअर मार्केटचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मार्केट ट्रेंड समजून घेणे. बाजारातील तेजी किंवा मंदीचा कल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. व्यापाऱ्याला शेअर्स कधी खरेदी करायचे तसेच शेअर्स कधी विकायचे याचेही ज्ञान असावे लागते

तथापि, ट्रेंड माइक्रो आणि मॅक्रोइकॉनॉमिक्स, उद्योग बातम्या, कॉर्पोरेट हालचाली इत्यादीसह अनेक अंतर्गत आणि बाह्य घटकांवर अवलंबून आहे. जेव्हा बाजारत तेजी असते किंवा चढउतार होतो, तेव्हा त्याला बुल मार्केट किंवा सामान्यतः, त्याला बुलिश मार्केट असे म्हणतात.

त्याचप्रमाणे, जर शेअर बाजार मंदीच्या प्रवृत्तीमध्ये असेल तर त्याला बेयर मार्केट म्हणून ओळखले जाते.

बुलिश मार्केट आणि बेअरिश मार्केट म्हणजे काय हे लक्षात ठेवायला कठीण जात असेल तर एक सोप्पी टेकनिक आहे जी खालील प्रमाणे आहे.

बुलिश म्हणजे बैल. बैल हा कोणावर हल्ला करतांना त्याचा शिंगाचा वापर करतो. तो स्वतःच्या शिंगाने दुसऱ्या ला वर उचलतो. म्हणजेच खालून वर उचलतो. तेव्हा समजायचे कि मार्केट वर जात आहे, म्हणजे सोप्प्या भाषेत मार्केट हे बुलिश आहे.

तसेच बेअरिश म्हणजे अस्वल. अस्वल हि कोणावर हल्ला करतांना त्याच्या पंजाचा वापर करतात. म्हणजे पंजा वरून खाली मारतात. तेव्हा समजायचे कि मार्केट खाली जात आहे, म्हणजे सोप्प्या भाषेत मार्केट हे बेअरिश आहे.


शेअर बाजाराचे प्रकार – Types of share market

शेअर बाजारात दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बाजार आहेत:

प्रायमरी शेअर बाजार

जेव्हा एखाद्या कंपनीला कोणत्याही एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध (रजिस्टर) केले जात नाही आणि जनतेकडून पैसे गोळा करायचे असतात, तेव्हा ते आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) घेऊन येतात. त्यालाच प्रायमरी शेअर मार्केट असे म्हणतात.

सेकंडरी शेअर बाजार

जेव्हा आपण शेअर बाजारातील सामान्य व्यापाराबद्दल बोलतो, जिथे व्यापारी एकमेकांकडून स्टॉक खरेदी करतात आणि विकतात, तेव्हा या प्रकारचा बाजार म्हणजे सेकंडरी शेअर बाजार. सेकंडरी बाजारात सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सची किंमत नियंत्रित केली जाते. (आपण एकमेकांन कडून शेअर घेतो त्यालाच सोप्प्या भाषेत सेकंडरी मार्केट म्हणतात.)


स्टॉक मार्केट एक्सचेंज कुठले आहेत ?

गुंतवणूकदारांसाठी भिन्न गुंतवणूक करिता आणि व्यापार पर्याय प्रदान करणारे भिन्न स्टॉक मार्केट एक्सचेंज आहेत. त्यापैकी काही खाली दर्शवलेले आहेत:

 • एनएसई निफ्टी (NSE Nifty – 50) – National Stock Exchange

एनएसई किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज भारतातील सर्वात मोठे एक्सचेंज आहे. एनएसई हे 1992 मध्ये ते समाविष्ट करण्यात आले होते आणि प्रत्यक्षात ते भारतातील पहिले एक्सचेंज होते.

एनएसई मध्ये एकूण 1696 कंपन्या रजिस्टर आहेत. परंतु टॉप 50 कंपन्या प्रामुख्याने व्यापार आणि ऑर्डर प्लेसमेंटसाठी वापरली जातात.

इंडेक्स निफ्टी 50 एनएसई अंतर्गत सर्वात प्रमुख इंडेक्स पैकी एक आहे. एनएसईच्या आर्थिक आकाराचे 1.5 ट्रिलियन डॉलर जवळ आहे, जे जगातील टॉप 10 एक्सचेंजमध्ये एनएसई समावेश होते.

आपण एनएसई सूचीबद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असल्यास, इक्विटी ट्रेडिंग व्यतिरिक्त, आपण कमोडिटी, करेंसी, डेरिव्हेटिव्ह्ज सारख्या इतर विभागांमध्ये व्यापार करू शकता.

 • बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex – 30) – Bombay Stock Exchange

बीएसई किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जगातील सर्वात जुन्या स्टॉक एक्सचेंजपैकी एक आहे आणि खरं तर पहिला आशियाई स्टॉक एक्सचेंज आहे.

1955 मध्ये ते सुरू झाले होते आणि नंतर त्याला 1957 मध्ये भारत सरकारकडून मान्यता मिळाली. बीएसई मध्ये एकूणच, 5749 कंपन्या या विनिमयात सूचीबद्ध आहेत आणि या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये या एक्सचेंजवर व्यापार करतात.

या 5000+ सूचीबद्ध कंपन्यांपैकी, सेन्सेक्स निर्देशांक एक घटक म्हणून वापरला जातो जो बाजारातील मूवमेंट ला दर्शवतो. बीएसई मध्ये मॉनिटरसाठी एकूण 30 कंपन्यांचा वापर होतो.


स्टॉक मार्केट कसे शिकायचे?

शेअर मार्केट मध्ये पैसे निवेश करण्यापूर्वी, आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की तोच शेअर निवडायचा ज्याबद्दल तुम्ही माहिती गोळा केलेले आहे. म्हणजेच तुम्हाला थोडक्यात त्या शेअर बद्दल माहिती असायला हवं कि हा शेअर वर आपण निर्भर राहू शकतो का?

मला तुम्हाला असे सांगायचे आहे कि शेअर मार्केट मध्ये फक्त फायदाच होत नाहीतर सोबतच नुकसान देखील होते. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकीची समज, धोरण आणि धैर्य खूप महत्वाचे आहे. जर आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या तर ते आपल्याला चांगले परतावा ( रिटर्न्स) देतात तसेच आपले पैसे बुडण्या पासून वाचतात

स्टॉक मार्केटमध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, जसे की:

 • आपले फाइनेंशियल गोल्स लक्षात ठेवा.
 • स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या पद्धती समजून घ्या.
 • आपल्याकडे जोखीम घेण्याची क्षमता जेवढी असेल तेवढेच निवेश करा.
 • ज्याला शेअर मार्केट चे क्नॉलेज आहे त्याच्याकडून सल्ला घ्या
 • शेअर मार्केट संबंधित बातम्या बघा तसेच पुस्तके वाचा
 • you tube वर असे बरेचशे चॅनेल आहे जे शेअर मार्केट बद्दल माहिती देतात ते बघा ( मी पर्सनली एक चॅनेल चे नाव तुम्हाला सांगू इच्छितो जी कि मी स्वतः पण बघतो – Asset Yogi

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी?

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आधी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डीमॅट खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत ज्यामध्ये पॅन कार्ड एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, त्याशिवाय आपण पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही.

डीमॅट खाते उघडल्यानंतर, स्वतःसाठी स्टॉक ब्रोकर निवडा. लक्षात ठेवा प्रत्येक स्टॉक ब्रोकर वेगवेगळ्या सेवा देतात. म्हणून, स्टॉकब्रोकर बद्दल पूर्ण माहिती घेतल्यानंतरच योग्य स्टॉक ब्रोकर निवडा.
उदा – Zerodha, Sharekhan, Angel Broking, Upstox etc

गुंतवणूक करण्यासाठी, आधी ठरवा तुम्हाला कोणत्या विभागात किती काळ गुंतवणूक करावी लागेल. एवढेच नाही तर तुम्हाला भांडवल आणि गुंतवणुकीची जोखीम लक्षात ठेवण्याची गरज आहे. एकदा आपण शेअर बाजारात प्रवेश केल्यानंतर, आपल्याला हे देखील सुनिश्चित करणे आवश्यक आहे की शेअर कधी खरेदी करावे आणि कधी विकावे.

ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस आणि टारगेट प्राइस चे नियम पाळा. यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी होते.


शेअर बाजार कधी वाढतो आणि कधी पडतो?

शेअर बाजारात वाढ आणि घट होण्यामागील मुख्य कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा.

 • मागणी आणि पुरवठा (Demand and Supply)
 1. जर मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त वाढली तर किंमतीत वाढ होते.
 2. तसेच जर मागणी पेक्षा पुरवठा वाढला तर किंमतीत घट होते.

जर तुम्ही शेअर मार्केट अभ्यास काळजीपूर्वक केला तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. शेअर बाजारात ऑनलाईन शेअर्स खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी सर्वात जास्त लक्षात ठेवायच्या हे देखील तुम्ही समजून घेतले आहे. जर तुम्ही मराठी मधील शेअर मार्केट टिप्स नीट पाळल्या तर तुम्हाला नक्की फायदा होईल.

मला आशा आहे की तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय (Share Market In Marathi) आणि शेअर्स कसे खरेदी करावे हे समजले असेल?
काही अडचणी असल्यास आम्हाला नक्की कंमेंट करा.

 • Share Market Opening Time – 09:15 hrs
 • Share Market Closing Time – 15:30 hrs

शेअर मार्केट बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

Q.1 – शेअर मार्केट अकाउंट म्हणजे काय?
Ans –
शेअर्सची खरेदी किंवा विक्री फक्त शेअर मार्केट अकाउंट म्हणजेच डीमॅट खात्याद्वारे केली जाते. खरेदी केलेले शेअर्स फक्त डिमॅट खात्यात ठेवले जातात. त्यालाच शेअर मार्केट अकाउंट असे म्हणतात.

Q.2 – शेअर मार्केट अकाउंट कसे उघडायचे?
Ans –
स्टॉक ब्रोकिंग वेबसाइट किंवा अॅपवर ऑनलाइन फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती भरली जाते त्यासोबतच आवश्यक कागदपत्रे अपलोड केली जातात, जसे कि, पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड, बँक अकाउंट इत्यादी. ई-व्हेरिफिकेशन, झाल्यानंतर शेअर मार्केट अकाउंट म्हणजेच डीमॅट खाते उघडले जाते.

Q.3 – शेअर मार्केट किती वाजता उघडतो?
Ans –
शेअर मार्केट सकाळी 9 वाजता उघडतो आणि ट्रेडिंग सकाळी 9:15 वाजता सुरू होते.

Q.4 – ट्रेडिंग म्हणजे काय?
Ans –
शेअर मार्केट चालू झाल्यानंतर शेअर विकत घेणे व ते विकणे यालाच ट्रेडिंग असे म्हणतात.

Q.5 – शेअर मार्केट किती वाजता बंद होते?
Ans –
शेअर मार्केट दुपारी 03:30 वाजता बंद होते.

Q.6 – शेअर मार्केट मध्ये पैसे कसे गुंतवतात?
Ans –
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी डिमॅट खात्याच्या वॉलेटमध्ये पैसे ठेवले जातात, ज्यामधून शेअर्स खरेदी केले जातात.

Q.7 – शेअर मार्केट कोणत्या दिवशी बंद असतो?
Ans –
शेअर बाजार शनिवार आणि रविवारी बंद असतो, तसेच राष्ट्रीय सुट्ट्या असल्यास वर्षभरात जवळपास 14-15 शेअर मार्केट बंद असतो.

– सागर राऊत


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *