नारळाचे पाणी पिण्याचे फायदे |naral pani pinyache fayde
नारळ पाणी पिण्याचे फायदे
नारळ पाणी हे आरोग्यासाठी उपयुक्त पेय आहे, विशेषत: कोवळ्या नारळाच्या पाण्याचे अविश्वसनीय फायदे आहेत. नारळ पाणी चवदार आणि उत्साहवर्धक कमी कॅलरीयुक्त नैसर्गिक पेय आहे. त्याचे काही आश्चर्यकारक फायदे आज आपण बघणार आहोत.
त्वचेची चमक वाढवतो (glowing skin)
त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी आपण बरेच काही करू शकता. परंतु त्वचेची काळजी घेताना नारळ पाण्याचे किती फायदे होतात, याची जाणीव अनेकांना नसते. पिण्याच्या पाण्यानंतर शुद्ध मानले जाणारे द्रव असेल, तर ते नारळ पाणी हे आहे.
नारळपाणी हे त्वचेला पाणी शोषण्यास मदत करते. ज्यामुळे आपली त्वचा अधिक तरुण आणि कोमल होते.
नारळ पाणी ऊर्जाचा एक साधन (energy boost)
हा कर्बोदकां (carbohydrate) मध्ये चांगला स्रोत आहे. नारळपाणी आपल्या शरीरातील उर्जा वाढवते.
हे छातीत जळजळ, गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि ऍसिडिटी सारख्या पोटातील समस्या देखील दूर करू शकतो.
इतर कोणत्याही फळांच्या रसांपेक्षा नारळपाणी पिणे हे एक शरीरासाठी चांगली निवड आहे, कारण हे संपूर्णपणे चरबी-मुक्त आणि साखर-मुक्त आहे. तुम्ही नारळपाणी दररोज घेऊ शकता.
शरीराला रीहायड्रेट्स करतो (Re-hydrates the body)
तहान शांत करण्यासाठी हे पेय उत्तम आहे. जास्त घाम किंवा उलट्या झाल्यास नारळ पाणी हे शरीराला रीहायड्रेट करण्यास मदत करतो.
रक्तदाब कमी करतो (Lowers Blood Pressure)
नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असते. नारळपाणी उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतो.
नारळपाणी हे पोटॅशियम सोडियमच्या हानिकारक प्रभावांचे संतुलन साधू शकतो, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोनदा नारळ पाणी प्या तुम्हाला त्याचे फायदे जाणवेल.
हार्ट टॉनिक (Heart Tonic)
नारळाचे पाणी आपल्या हृदयासाठी चांगले आहे. हे ‘बॅड’ कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो आणि उच्च-घनतेचे लिपोप्रोटीन किंवा ‘चांगले’ कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतो. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
रक्त पुरवठा सुधारतो (Improves blood circulation)
नारळ पाण्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते. अशा प्रकारे, रक्तवाहिन्यांमधील आजार , हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करतो.
हँगओव्हरसाठी नारळपाणी योग्य (Cure for hangovers)
जास्त दारू पिल्यानंतर जेव्हा लोक हँग ओव्हर( जास्त दारू पिल्याने डोक दुखणे) तेव्हा नारळपाणी हे हँगओव्हरसाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे.
अल्कोहोल आपल्या शरीराला निर्जलीकरण करते, तर हे नारळ पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरुन काढतोआणि हायड्रेशन वाढवतो.
वजन कमी करतो (Weight Loss)
वजन कमी करण्यासाठी नारळ पाणी एक उत्कृष्ट पेय आहे. नारळपाणी कमी उष्मांक असलेला आणि पचण्यास सोपे जाणार पेय आहे. वजन कमी करण्यासाठी दररोज एक ग्लास नारळपाणी प्या. आणि जास्त प्रमाणात मद्यपान करू नका.
डोकेदुखीला उपयोगी (Treats Headaches)
हायड्रेशन मुळे डोकेदुखी हाऊ शकते. नारळाचे पाणी शरीराला इलेक्ट्रोलाइट्स पुरवतो आणि हायड्रेशनला चालना देतो.
मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यामुळे मायग्रेन होऊ शकते. नारळपाणी मॅग्नेशियममध्ये समृद्ध आहे म्हणून ते मायग्रेन बरे करतो. डॉक्टर च्या मते नारळ पाण्यातील मॅग्नेशियम हे मायग्रेनच्या त्रासाला कमी करण्यास मदत करू शकतो.
अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.
धन्यवाद.!
- सागर राऊत
🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
हे वाचलंत का? –