मोबाईल अँप मुळे हॅकिंग SCAM ला बळी पडू नका.!

Mobile App Hacking Scam Marathi

Mobile Hacking : आजकाल प्रत्येक व्यक्तींच्या मोबाईल मध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारखे अँप्स असणे सामान्य आहे. जवळपास प्रत्येक व्यक्ती ही सर्व अॅप्स वापरतोच. परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की जेव्हा तुम्ही गुगलवर एखादी गोष्ट सर्च करता. तेव्हा तुम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर त्यासंबंधित जाहिराती दिसू लागतात. यामागचे कारण काय.? ते या आर्टिकल च्या माध्यमातून समजून घेऊया.!

नमस्कार मित्रानो, माहिती लेक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अनेक यूजर्सच्या मनात एक प्रश्न आलेला असेल की, असे का होते. वास्तविक पाहता असे घडते कारण, टेक कंपन्या अड्स च्या माध्यमातून कमाई करतात आणि हे सर्व अॅप्स तुमच्यावर लक्ष ठेवतात, तुमची कोणतीही अँप वरील ऍक्टिव्हिटी किंवा गुगल वर केलेले सर्च हा ट्रॅक केला जातो.

हे टाळण्यासाठी ही सेटिंग करा.!

तुमच्या अप्स वरील ऍक्टिव्हिटी वर कोणी लक्ष ठेवू नये आणि सोशल मीडियावर तुमची pavicy राखावी असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या फोनमधील अड्स आणि नोटिफिकेशन दाखवणारे सेटिंग बंद करू शकता.

सोशल मीडिया आणि टेक कंपन्या user ला प्रायव्हसी सेटिंग्ज करण्याचा ओपशन देतात.

अॅप इन्स्टॉल करताना काळजी घ्या.!

जेव्हा तुम्ही मोबाईल वर कोणतेही अॅप इन्स्टॉल करता. तेव्हा कॉन्टॅक्टस, फाइल्स, लोकेशन यासारख्या पर्सनल इंफॉर्मेशन मध्ये एक्सेस देण्याची परमिशन मागितली जाते,

अशा परिस्थितीत त्याला परमिशन देऊ नका. असे काही अॅप्स आहेत, जे तुमच्या मोबाईल मधील तुमचे लोकेशन, डेटा, फाइल्स आणि कॉन्टॅक्ट्समध्ये एक्सेस मिळवतात आणि तुमची मोबाईल वरील सर्व ऍक्टिव्हिटी वर लक्ष ठेवतात. याच माध्यमातून ऑनलाईन बँकिंग फ्रोऊंड झालेले आपल्याला ऐकायला मिळतात.

ब्लॉटवेयर म्हणजेच एकप्रकारचा व्हायरस हे अनेक अॅप्समध्ये असतात, जो तुमच्या मोबाईलचा डेटा अॅप डेव्हलपरला ट्रान्सफर करत राहतो. तुम्ही त्यांना परमिशन न दिल्यास, हे अॅप्स तुमच्या डेटामध्ये एक्सेस करू शकत नाहीत.

चुकून परमिशन दिल्यागेली असेल तर, काय करावे?

जर तुम्ही अॅप इन्स्टॉल करताना चुकून परमिशन दिली असेल, तर तुम्ही ते सहज काढू शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन मॅनेज परमिशन्स या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

येथे तुम्ही चेक करू शकता की कोणत्या अॅप्सना डेटा परमिशन मिळाली आहे, त्यानंतर तुम्ही ते बंद करू शकता. या प्रोसेसर नंतर, कोणतेही अॅप तुमच्या मोबाईल वरील लोकेशन तसेच इतर कोणतीही माहिती अॅक्सेस करू शकणार नाही.

काही Google अॅप्स आधीपासूनच Android स्मार्टफोनमध्ये प्री-इंस्टॉल केलेले आहेत, ज्यामध्ये Google Search, YouTube, Facebook इत्यादींचा समावेश आहे, तुम्ही या अॅप्सच्या परमिशन सहज मैनेज करू शकता.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली कंमेंट करून नक्की कळवा.? अश्याच प्रकारच्या माहितीसाठी वाचण्यासाठी माहिती लेक ला परत भेट द्या.! धन्यवाद.


हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻