Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील झरी गावामधील एक शेतकऱ्याने आपल्या ४ एकर शेतामध्ये तणनाशक फवारणी केली. त्यानंतर तण सकट सोयाबीन जळून जाण्याची घटना घडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झालेले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी बुधवारी शेतात जाऊन शेतीचा पंचनामा केला.
शेतकरी प्रताप रामचंद्र पाटील राहणार झरी, शेत सर्वे क्रमांक ११५ मध्ये त्यांची ४ एकर शेती आहे. त्या शेतकऱ्याने तूर आणि सोयाबीन ची शेती केलेली आहे. सतत होणाऱ्या पाऊसामुळे सर्व शेतकऱ्यांना एकच अडचण निर्माण झालेली आहे, ती म्हणजे शेतात खूप प्रमाणात तण तयार होणे.
अश्यातच शेतकरी प्रताप यांनी आपल्या शेतामध्ये फवारणी करण्या करिता, केळगाव येथी कृषीकेंद्रातून तण नाशक औषध आणून ते पाण्यामध्ये मिसळून, आपल्या शेतात फवारणी केली होती. तेव्हा तण सकट सोयाबीन देखील जळून गेलेले आहे.
त्यानंतर त्यांनी शेताचा पंचनामा करावा, अशी कृषी विभागाकडे मागणी केली. त्यानंतर तालुक्याचे कृषी अधिकारी ए. पी. शेळके आणि पंचायत समिती कृषी अधिकारी कुटवाड यांनी शेताचा पंचनामा केला.
शेतकरी प्रताप यांच्या मुलाच्या म्हणण्यानुसार तण नाशक औषध हे बोगस होते. त्यामुळे हा प्रकार घडला.
सूचना – शेतकऱ्यांनी थोडं सावध राहा.! बोगस बियाणे, बोगस औषधी मार्केट मध्ये याची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. औषधी अथवा बियाणे घेतांना कृषी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्या.!
हे वाचलंत का ? –