Farmer Selling Tomatoes : महिपाल रेड्डी राहणार तेलंगाना, हा व्यक्ती आपल्या २० एकर शेती मध्ये भात पिकवायचा.

प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नाची चव वाढवणारा टोमॅटो चे भाव सध्या खूप वाढलेले आहे. हे तर आपण जाणूनच असाल, गरिबांना टोमॅटो परवडणार नाही याचे चिन्न सर्वत्र दिसतच आहे. याच परिस्थितीचा फायदा घेऊन काही शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेऊन नशीबच पालटलेले आहे. त्यातीलच एक शेतकऱ्याचे उदाहरण म्हणजेच, महिपाल रेड्डी.

हा शेतकरी टोमॅटो विकून करोडपती झाला. काही दिवसापासून आपण बातम्या ऐकतो कि टोमॅटो चे दर गगनाला भिडलेले आहेत. याच दरम्यान बरेचसे नेटकरी टोमॉटो वर कंमेंट पास करतांना आपल्याला इंस्टाग्राम वर दिसतात.

या टोमॅटो ची किंमत वेग वेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. काही ठिकाणी ११० ते १२० रुपये प्रति किलो आहे. यामध्ये या शेतकऱ्याचा फायदा झालेला आहे.

टोमॅटो पिकवून शेतकरी करोडपती

तेलंगणा राज्यातील मेडक जिल्हातील शेतकऱ्याने आपल्या शेतात टोमॅटोचे पीक विकून तब्बल २ कोटीची कमाई केलेली आहे. महिपाल रेड्डी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हा शेतकरी आपल्या २० एकराच्या शेतामध्ये आधी भाताची शेती करायचा, परंतु त्यांनी या वेळेला टोमॅटो पिकवण्याचा निर्णय घेऊन, जसे स्वतःचे भविष्याचं निर्माण केलेलं आहे.

२० एकराच्या शेतीतून १५ दिवसांत बदलले नशीब

महिपाल रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सध्या शेतीमध्ये १ कोटी रुपयाचा माल शिल्लक आहे. तसेच त्यांनी ८० एकर शेती लागवडीकरिता घेतलेली आहे. (लागवडी करिता शेत घेणे, म्हणजे शेत भाड्याने घेणे) त्यातील ६० एकर इतक्या जमिनीवर भात पिकवला, असून बाकी शेतीमध्ये इतर पीक घेतलेले आहे. सततच्या चालू असलेल्या पाउसामुळं सर्व शेतकऱ्यांना चिंता होत आहे.

महिपाल रेड्डी पुढे म्हणतात, मी आधी भाताचीच शेती करायचो, परंतु बरेचदा मला त्या पिकापासून नुकसान झालेले आहे. म्हणूनच या वेळेला मी टोमॅटो लावण्याचा निर्णय घेतला.

महिपाल रेड्डी हे एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोची पेरणी करतात आणि जूनच्या शेवटी ते पीक काढतात. रेड्डी हे शेतामध्ये ठिबक सिंचन आणि स्टॅकिंग पद्धत वापरतात. त्यांना २८ किलो कॅरेट ला २६०० ते २७०० रुपये इतका भाव मिळालेले आहे.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *