शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला १२००० रुपये, सविस्तर जाणून घ्या!

PM Kisan Sanman Nidhi Yojana

PM Kisan Sanman Nidhi Yojana : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावी त्याकरिता महाराष्ट्र सरकार बरेचसे योजना राबवतात. तसेच केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नाव नवीन खूप योजना राबवतात जसे कि, केंद्र सरकारची पीएम किसान योजना.

तश्याच प्रकारची एक नवीन योजना आहे. ज्याचे नाव ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना असे आहे. तुम्हाला माहिती असेलच कि, सरकार ‘पीएम किसान सन्मान निधी’ या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सम्मान निधी म्हणून ६००० रुपये देतात. यामध्ये सरकार दर ४ महिन्याच्या फरकाने ३ इंस्टालमेंट मध्ये २०००- २००० हजार शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करतात.

जर तुम्ही एक शेतकरी असाल, किव्हा तुमच्या पारिजानं मध्ये कोणी शेतकरी असेल, तर त्यांना नक्कीच वर्षाला ६००० रुपये मिळत असेल, परंतु थांबा महत्वाचे सांगायचे आहे. याखेरीज तुम्हाला अजून ६००० रुपये मिळती.

म्हणजेच ‘पीएम किसान सन्मान निधी’ ६००० रुपये आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ६००० रुपये असे मिळून तुमच्या वर्षाला १२००० रुपये मिळतील.

महाराष्ट्र सरकारने नमो किसान महा सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अतिरिक्त देण्याची घोषणा झालेली आहे. या अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून 6 हजार रुपये म्हणजेच एकूण 12 हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्यासाठी हि आनंदाची बातमी आहे कारण, इतर राज्यातील शेतकरी याचा लाभ घेता येणार नाही.

या योजनेचा लाभ कसा घेता येईल?

महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पादरम्यान याची घोषणा केली होती, आता राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा दीड कोटी शेतकऱ्यांना होणार असून, महाराष्ट्र सरकारने या योजने करिता 6,900 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे.

या योजने करिता लागणारे कागतपत्रे

१) बँक खात्याचा तपशील
२) आधार कार्ड
३) खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक
४) अर्जदाराने कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक


हे वाचलंत का ? –

Share