हवे असणारे लोक, जीवनात उरत नाही! (कविता)

आयुष्यावर कविता

आयुष्यावर कविता | Marathi Kavita Text


आज काल जीवनात काय सुरू आहे,
ते कळत नाही.!

हवे असणारे लोक काही,
जीवनात उरत नाही.!

कितीही केला जगण्याचा अट्टहास पण,
देव काही जगू देत नाही.!

आयुष्य भर लोक जगण्यासाठी धावपळ करतात पण,
सारत्याशेवटी काही घेऊन जात नाही.!

सर्व असतात, इच्छा पूर्ण करण्याच्या ध्यासात पण,
काहींच्या इच्छा पूर्ण होत नाही.!

अनेक गोष्टी असतात, मनात बोलन्याजोग्या पण
हे मन बोलू देत नाही.!

म्हणतात, काही लोक की प्रयत्न करा, यश नक्की मिळेल पण,
कितीही प्रयत्न केले, तरी यश काही मिळत नाही.!

ते म्हणतात, ना की अशक्य ही शक्य होते पण,
आपल्याला हवं असणार हे अशक्यच राहत
ते पूर्ण होत नाही.!

होतात काही गोष्टी पूर्ण/शक्य पण
तेव्हा वेळ ती राहत नाही.!

अनेक लोक भेटतात, जीवनात ते त्यांचे अनुभव सांगतात पण,
सारत्याशेवटी सांगतात की, आम्हाला पण काही गोष्टी साध्य
करता आल्या नाही.!

कितीही झाला मनाला त्रास तरी या जीवनात
सरत्या शेवटी कोणीच काही घेऊन जात नाही.!

(हि कविता माझ्या आजी, आजोबाच्या आठवणीत..! त्यांच्या आत्म्यांना शांती मिळो.!)


  • रितिका तायडे

हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment