Gold Price : सोने-चांदी झाले स्वस्त, दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी बातमी

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत दररोज घसरण पाहायला मिळत आहे. सोन आज देखील स्वस्त झाले आहे. या सोबतच चांदी मध्ये देखील १७०० रुपयाची घसरण दिसत आहे. ग्लोबल मार्केट मध्ये होणाऱ्या सोन्या-चांदीची घसरण चा फरक घरगुती सोन्या-चांदीच्या दरात देखील होत आहे. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भाव हा ६०,००० पर्यंत जाऊन बंद झाला.

सोन्याचा भाव १५० रुपयांनी घसरून ६०,१०० रुपये प्रति १० ग्रॅम वर ​​येऊन बंद झाला. सोन्याचा भाव गेल्या काही दिवसात आधी ६०,२५० रुपये प्रति १० ग्रॅम वर क्लोज झाला होता. तसेच चांदीचा भाव देखील १७०० रुपयांनी घसरून ७५००० रुपये प्रति किलो झाला आहे.

जागतिक बाजारात सोन्याची किंमत कशी होती?

ग्लोबल मार्केट मध्ये सोन्याचा भाव हा १९३५ डॉलर प्रति औंस, तर चांदी चा भाव २३.५५ डॉलर प्रति औंसवर घसरला. याच्या मागचे कारण, सरकारी बॉन्ड मधून उत्पन्न वाढल्यामुळे कॉमेक्समध्ये सोने तीन आठवड्यांच्या घसरणीच्या पातळीवर गेलेले आहे.

घरी बसल्या सोन्याचे भाव तपासा.!

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन च्या मते, तुम्ही घरी बसून सुद्धा सोन्याची किंमत तपासू शकता. ८९५५६६४४३३ वर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता.


हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻