मधुमेह लक्षणे व उपचार

madhumeh-marathi-mahiti

Diabetes in marathi

अनुक्रमणिका

मधुमेह म्हणजे काय.? – Diabetes information in marathi

मधुमेह हा एक रोग आहे. जो शरीरातील इंसुलिन तयार करण्याच्या किंवा वापरण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. इन्सुलिन हा एक प्रकारचा हार्मोन आहे, जो अन्नाला उर्जेमध्ये रूपांतरित करतो.

इन्सुलिन ही ऊर्जा पेशींमध्ये पोहोचविण्यात मदत करते. म्हणूनच, जेव्हा इन्सुलिन पुरेसे प्रमाणात तयार होत नाही तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.

ग्लूकोज हा आपल्या शरीराचा मुख्य उर्जा स्त्रोत आहे. ग्लूकोज हे आपण खाल्लेल्या कार्बोहायड्रेट पदार्थांमधून येतो, जसे की ब्रेड, पास्ता, तांदूळ, धान्य, फळे,भाजीपाला, दूध आणि दही इत्यादी.

जेव्हा आपण हे पदार्थ चे सेवन करतो, तेव्हा आपल्या रक्तप्रवाहातून शरीराला ग्लूकोज पुरवल्या जातो. नंतर आपल्या पेशी त्या ग्लूकोज चे उर्जेमध्ये रुपांतर करतात.

आपल्या शरीरास इंसुलिन आवश्यक आहे. जर आपल्याला मधुमेह असल्यास, याचा अर्थ असा आहे की, आपल्या शरीरात इन्सुलिन अगदी कमी तयार होते, किंवा अजिबात तयार होत नाही. त्यामुळे आपण शरीरात तयार झालेले ग्लूकोज उर्जामध्ये बदलण्याऐवजी आपल्या रक्तातच राहतो.

आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या उच्च पातळीचा आपल्या शरीरावर अल्प-मुदतीचा आणि दीर्घ-मुदतीचा परिणाम होऊ शकते. ज्यामुळे आपले हृदय, मेंदू, मूत्रपिंड, डोळे आणि पाय यांना संभाव्य नुकसान होऊ शकते.

मधुमेह कशामुळे होतो – Diabetes meaning in marathi

हा आजार पुरुषांमधे स्त्रियांपेक्षा जास्त आहे. मधुमेह बहुधा अनुवंशिक असतो किव्हा जीवनशैली खराब झाल्यामुळे मधुमेह होतो. यात अनुवंशिक मधुमेह हा टाइप-1 मध्ये येतो, तर अनियमित जीवनशैलीमुळे होणारा मधुमेह हा टाइप -2 मधुमेह प्रकारात येतो.

ते लोक पहिल्या श्रेणीत (Type-1) येतात, जर कुटुंबातील पालक, आजी-आजोबांपैकी कोणाला मधुमेह असेल तर कुटुंबातील सदस्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच, जर तुम्ही शारीरिक श्रम, झोपेची कमतरता कमी केली, खाणे अनियमित केले आणि मुख्यतः फास्ट फूड आणि गोड पदार्थांचे सेवन केले तर मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

डायबिटीज चा सर्वात मोठा धोका काय?

(शुगर वाढल्यावर काय होते?)

हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक हा मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक मृत्यू च कारण बनलेलं आहे. मधुमेह ग्रस्त लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका सामान्य माणसाच्या तुलनेत पन्नास पटीने वाढतो.

शरीरात ग्लूकोजचे प्रमाण वाढल्यामुळे हार्मोनल बदल होतात आणि त्यामुळे शरीरातील कोशिकाना नुकसान होतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या आणि नसा दोन्ही प्रभावित होतात.

यामुळे धमनी मधे अडथळा येऊ शकतो किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच मधुमेहाच्या रुग्णांना स्ट्रोकचा धोकाही वाढतो.

जर मधुमेहाचा बराच काळ उपचार केला गेला नाही, तर तो डोळ्यातील रेटिना ला नुकसान पोहचवू शकतो. यामुळे एखाद्या व्यक्तीस कायमचे अंधत्वही मिळू येऊ शकते.

मधुमेह ची लक्षणे कोणती.?

शुगर ची लक्षणे सांगा

1) भूक लागणे आणि थकवा जाणवणे.

आपले शरीर आपण खाल्लेल्या अन्नाचे ग्लूकोजमध्ये रुपांतर करतो. जे आपल्या शरीरातील पेशी उर्जेसाठी वापरतात. परंतु आपल्या पेशींना ग्लूकोज आणण्यासाठी इन्सुलिन आवश्यक असते.

जर आपल्या शरीरात इन्सुलिन पुरेसे प्रमाणात तयार होत नसेल किंवा ते बनले असेल आणि आपले पेशी त्यास प्रतिकार करतात, असल्यास ग्लूकोज पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे आपल्या शरिरात ऊर्जा राहत नाही. ज्यामुळे आपल्याला सामान्य लोकांपेक्षा जास्त भूक लागते आणि आपल्याला थकवा जाणवतो.

२) अत्यधिक लघवी येणे आणि जास्त तहान लागणे.

साधारणत: एखादी व्यक्ती दिवसातून 6-7 वेळा लघवी करते, परंतु तुम्हाला त्यापेक्षा जास्त लघवी करावी लागत असल्यास तुम्हाला मधुमेह होऊ शकतो.

त्याचे कारण असे की, मधुमेहामुळे (डायबिटीज) रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा खूपच जास्त होते. जेव्हा असे झाल्यास शरीर लघवीद्वारे शरीरातून अतिरिक्त साखर काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. परंतु एकदा तुम्ही लघवी केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होत नाही.

म्हणून शरीर अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी मूत्रपिंडांना (मूत्रपिंड म्हणजे किडनी) कामी लावतो. नंतर किडनी रक्ताचे फिल्टरिंग करून वारंवार मूत्र बनवते आणि मधुमेह झालेल्या व्यक्तीला वारंवार लघवी करावी लागते.

लघवीद्वारे शरीरातून जास्तीत जास्त साखर काढून टाकण्यासाठी, आपले शरीर प्रथम रक्ताचे पातळ द्रवात रूपांतर करतो, ज्यासाठी ते शरीरात उपस्थित पाणी याचा वापर करतो. त्यामुळे आपले शरील dehydrated होत. म्हणून मधुमेह असलेल्या व्यक्तीला वारंवार पाणी प्यावे लागते.

3) तोंड कोरडे पडणे/ शरीराला खाज सुटणे

मधुमेह असलेल्या व्यक्तीला वारंवार लघवीला जावे लागते. त्यामुळे लघवी वाटे शरीरातील पाणी हे बाहेर जात. आणि त्यामुळं काही शरीरातील अवयवांना पाण्याची गरज पूर्ण न होण्याच्या कारणाने तोंड कोरडे पडणे तसेच शरीराला खाज सुटणे हा प्रकार होतो.

4) दृष्टि दोष (दृष्टि कमजोर होणे)

आपलं शरीर रक्तातील साखर काढून टाकण्यासाठी रक्ताला पातळ (dilute) करतो, ज्यासाठी तो शरीरातील द्रव (पाणी) वापरतो.

बर्याचदा द्रव द्रवपदार्थाच्या हालचालीमुळे काही द्रव डोळ्यात जातो. त्यामुळे डोळ्याची लेन्स जाते. त्यामूळे लेन्स फुगतो. त्यामुळे लेन्स चा आकार बदलतो. आणि तो योग्यरित्या काम करू शकत नाही.

म्हणून अस्पष्ट दिसायला लागत. बर्याच वेळा लेन्स हे लहान होतात. तेव्हा देखील लेन्स चा आकार बदलून अस्पष्ट दिसायला लागत.

5) अचानक वजन कमी होणे.

अनैसर्गिकपणे आपले वजन कमी होत असल्यास हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते. हे बहुतेक टाईप 1 मधुमेहामध्ये होते, परंतु काहीवेळाला टाईप 2 मध्ये देखील हे लक्षणे पाहण्यास मिळते.

रक्तातील इन्सुलिन अभावमुळे, रक्तातील ग्लुकोज शरीरातील पेशी पर्यंत पोहोचू शकत नाही आणि सेल्स ग्लुकोज ला ऊर्जेत रूपांतर करू शकत नाही, परंतु शरीराला ऊर्जेची गरज तर असणारच. त्यामुळे तो ऊर्जा मिळविण्यासाठी बॉडी ला आणि स्नायूंना बर्न करायला लागतो. त्यामुळं शरीराचे वजन कमी व्हायला लागत.

6) जखम लवकर बारी न होणे.

जर आपल्या एखाद्या जखमेच्या बरे होण्यासाठी सामान्य वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल, तर आपल्याला मधुमेह असू शकतो. खरं तर, मधुमेहामुळे रक्तातील ग्लूकोजची वाढलेली मात्रा हळूहळू आपल्या नसावर परिणाम करू शकते.

ज्यामुळे शरीरात रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नाही. अशा परिस्थितीत, रक्त हे जखमी पर्यंत सुरळीत पोहचत नाही तसेच ऑक्सिजन आणि त्यासह पोषक तत्वांचा पुरवठा देखील खंडित होतो. यामुळे जखम बरी होण्यास आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेतो.

7) मळमळ आणि उलट्या होणे.

जेव्हा शरीराची उर्जा कमी पूर्ण करण्यासाठी शरीराची चरबी (Fat) बर्न करते. तेव्हा ते “केटोन्स”(ketones) देखील तयार करते. केटोन्स हे आपल्या रक्तात धोकादायक पातळीवर जाऊ शकतात, ज्यामुळे आपल्याला पोट अस्वस्थ होऊ शकतो आणि आपल्याला मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

8) हात आणि पाया मध्ये मुंग्या येणे.

जर आपल्याला मधुमेह असेल आणि आपण बर्‍याच काळासाठी त्यावर उपचार केला नाही. तर ते आपल्या नसा खराब करू शकते. हात आणि पाय केवळ या नसाच्या मदतीने सिग्नल पाठवतात. परंतु नसाच्या नुकसानीमुळे सिग्नल योग्य प्रकारे पास होऊ शकत नाहीत आणि आपल्याला हात पायात मुंग्या येतात.

9) हिरड्यांवर सूज येणे.

मधुमेह हा जंतूंचा प्रतिकार करण्याची क्षमता कमकुवत करते, ज्यामुळे आपल्या हिरड्या आणि दात असलेल्या हाडांमध्ये संक्रमणाचा धोका वाढतो. अशावेळी आपले हिरड्या, दात सैल होऊ शकतात किंवा हिरड्यांमध्ये पू किंवा सूज येऊ शकते.

10) बुरशीजन्य (फंगल) संसर्ग होणे.

मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये ग्लुकोज चे प्रमाण खूप जास्त असत. आणि बुरशीजन्य संसर्ग होण्यासाठी ग्लूकोजची आवश्यकता असते.

म्हणून जर आपल्याला पुन्हा पुन्हा फंगल चा संसर्ग होत असेल, तर ते मधुमेहाचे लक्षण देखील असू शकते.

मधुमेह असतांना आहार कोणता घ्यावा.? (मधुमेह आहार तक्ता मराठी)

मधुमेह घरगुती उपाय

मधुमेह-आहार-मराठी.

मधुमेह-आहार-मराठी

पालेभाज्या मध्ये…

जर आपण मधुमेहाच्या आहारामध्ये भाज्यांबद्दल विचार केला, तर आपण टोमॅटो, गाजर, ब्रोकोली, हिरव्या भाज्या आणि मिरचीचा समावेश करावा. या सर्व भाज्या नॉन स्टार्च मानल्या जातात. स्टार्ची भाजीमध्ये आपण कॉर्न, बटाटे आणि हिरव्या वाटाण्यांचा समावेश करा.

फळभाज्या मध्ये…

टरबूज,संत्री, सफरचंद, बेरी, द्राक्षे आणि केळीचा समावेश करावा.

धान्यामध्ये…

दिवसाच्या वेळी धान्यामध्ये कमीतकमी अर्धा धान्य असले पाहिजे. आपण यामध्ये तांदूळ, गहू, ओट्स, बार्ली, कॉर्नमेल आणि क्विनोआ समाविष्ट करू शकता.

प्रथिनेमध्ये…

आपण दही, चीज, शेंगदाणे, अंडी, कोंबडी, मासे, पातळ मांस सारख्या मांसाचे पदार्थ घेऊ शकता.

तेलामध्ये…

आपण सरसों तेल, कॅनोला आणि ऑलिव्ह तेल वापरू शकता.

मधुमेहामध्ये काय खाऊ नये.?

मधुमेहाच्या रुग्णांना साखरेमध्ये काय खाऊ नये हेदेखील माहित असले पाहिजे. हे केवळ मधुमेह असणाऱ्या साठीच नाही तर ज्यांना मधुमेह नाही त्यांना देखील या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

१) अन्नामध्ये जास्त प्रमाणात मीठ खाऊ नये.

२) कोल्ड ड्रिंक जसे की, साखरयुक्त पेयेपासून दूर रहा.

३) जास्त तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका.

४) साखरेचा वापर मर्यादित करा.

५) आईस्क्रीम किंवा कँडीचे सेवन करू नका.

मधुमेह घरगुती उपाय (मधुमेह व्यायाम मराठी)

मधुमेह रूग्णांसाठी व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. हे त्यांना रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यास मदत करू शकते. व्यायामामुळे आपल्या सर्वांगीण तंदुरुस्तीला चालना मिळते आणि निरोगी राहण्यास आणि वजन कमी ठेवण्यास मदत मिळते. परंतु लक्षात असू द्या मधुमेह असलेल्या रुग्णांना योग्य व्यायामाची योजना बनविणे आवश्यक आहे.

मधुमेह व्यायाम

मधुमेह-व्यायाम-मराठी

1) 30 मिनिट चालणे.

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांना डॉक्टरांकडून आठवड्यातून तीन दिवस तेज चालायला सांगितले जाते. दररोज केवळ 30 मिनिटे चालणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. वेगवान चालण्याद्वारे, आपले वजन देखील नियंत्रणाखाली असते.

2) योग रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रित करते.

योगाचा नियमित सराव केल्याने तुमचे सर्वांगीण आरोग्य सुधारते. आपण बराच काळ तंदुरुस्त राहता. टाइप 2 मधुमेह ग्रस्त लोकांसाठीही योग चांगला आहे. दररोज योगासने केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

योग शरीराच्या चरबी कमी करण्यास आणि वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. इतकेच नाही तर स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी कमी करण्यात मदत होते.

3) पायलेट्स

पायलेट्स बरेच लोकप्रिय झाले आहेत. पायलेट्सचा नियमित सराव केल्यास आपण वजन कमी करू शकता. जर आपल्याला मधुमेह असेल, तर आपण आपले संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी पायलेट्स वापरुन पहा.

4) पोहायला जाणे.

पोहण्याद्वारे, शरीरची पूर्ण हालचाल होते. हे स्नायूंना योग्यरित्या ताणते तसेच वजन कमी करते. पोहण्यामुळंस्नायू बळकट होतात. पोहण्यामुळे सांध्यावर ताण येत नाही जो मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी योग्य आहे. आपण आठवड्यातून किमान तीन वेळा पोहण्याचा सराव करू शकता.

5) डान्स करणे.

डान्स हा आपले शरीर आणि मनाला आराम करण्याचा एक चांगला मार्ग आहे. हे आपल्याला वेळेत आनंदी करू शकते. डांसिंग सेशन ताणतणाव कमी करण्यास मदत करते. तसेच एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न्स करते.

नियमित डान्स चा सराव करून आपण आपल्या रक्तातील साखरेची पातळी आणि वजन कमी करू शकता.

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Health

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *