पायाची पोटरी दुखणे उपाय
Image source – choa.org
Cramp in Marathi : जेव्हा एकापेक्षा जास्त स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि कडक होतात. त्या परिस्थितीला क्रॅम्प होणे असे म्हणतात. जेव्हा असे होते. तेव्हा त्या ठिकाणी तीव्र वेदना जाणवते, चालल्यानंतरही वेदना जाणवते. तसेच, ही वेदना आणि पेटके काही मिनिटांत बरे सुद्धा होतात. चला तर क्रॅम्प बद्दल या आर्टिकल मध्ये सविस्तर समजून घेऊया.!
अनेकदा रात्री झोपताना पायांच्या स्नायूंमध्ये (पोटऱ्या मध्ये ) किंवा कमरेच्या आजूबाजूच्या स्नायूंमध्ये क्रॅम्पची समस्या उध्दभवते. त्यालाच Muscles Cramp असे सुद्धा म्हणतात. मराठी मध्ये यालाच वात होणे असे सुद्धा म्हणतात
काही लोकांना पोटामध्ये, हात, पायाच्या तळव्यामध्ये क्रॅम्प्सची समस्या देखील असते. या वेळेला, खूप जास्त वेदना होतात, परंतु स्वतःच ते हळूहळू ठीक देखील होतात.
क्रॅम्प होण्याची कारणे
1) कमी पाणी पिल्यामुळे
जर तुमचे शरीर हायड्रेटेड असेल, म्हणजेच तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल, तर तुमचे स्नायू क्रॅम्प होऊ लागतात. जेव्हा शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते, तेव्हा स्नायू आणि शरीराच्या अवयवांना कार्य करण्यासाठी द्रव मिळत नाही, अशा परिस्थितीत वेदना आणि पेटके येतात.
2) पोटॅशियम ची कमी पातळी
पोटॅशियम प्रामुख्याने स्नायू पेशी आणि नर्वस सिस्टम नियंत्रित करते. स्नायूंच्या आकुंचन-विस्तारात आणि नर्वस सिस्टमधून मेंदूला सिग्नल पाठवण्याच्या प्रक्रियेत पोटॅशियम महत्त्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत जेव्हा शरीरात पोटॅशियमची कमतरता असते, तेव्हा स्नायूंमध्ये क्रॅम्प्स सुरू होतात. या स्थितीला ‘हायपोकॅलेमिया’ असे म्हणतात.
3) औषधांचे दुष्परिणाम
अशी काही औषधे असतात, ज्यांचे साइड इफेक्ट्स मुळे स्नायूंना क्रॅम्प्स येते. हे टाळण्यासाठी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.
4) घट्ट शूज घालणे
चुकीच्या आकाराचे किंवा घट्ट शूज किंवा चप्पल घातल्यामुळे त्यामुळे पायात योग्य रक्ताभिसरण न झाल्यामुळेही पेटके येऊ शकतात. पायात पेटके (क्रॅम्प्स) आल्यानंतर लगेच पायांना मसाज करा. समस्या जास्त असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
क्रॅम्प वर घरगुती उपाय
- तुम्ही व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेऊन स्नायूंना होणारा त्रास टाळू शकता. याशिवाय पायांच्या क्रॅम्पसाठी स्ट्रेचिंग देखील करू शकता.
- तुमच्या आहारात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण वाढवा. असे पदार्थ खा. ज्यामध्ये हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
- स्नायू मऊ ठेवण्यासाठी, थंड्या वस्तू किंवा बर्फचा वापरा करा. बर्फने ती जागा शेका.
- क्रॅम्प येताच, तुम्ही त्या अवयवाचे स्नायू ताणा, स्नायूंची उबळ दूर होईपर्यंत तुम्हाला हे करत राहावे लागते.
- क्रॅम्प चा त्रास जास्त असल्यास, फुल गोबी, ग्रीन कॉलर्ड्स, पालक, भोपळ्याच्या बिया आणि बटाटे यांचे सेवन वाढवा.
- जर तुम्हाला या उपायांनी आराम मिळत नसेल आणि तुम्हाला वारंवार पेटके येत असतील, तर लवकरच डॉक्टरांना भेटा.
हे वाचलंत का ? –