लवंग औषधी गुणधर्मसाठी आणि मसाल्याच्या पदार्थ म्हणून सर्व परिचित आहे. दातदुखी, तोंडाची दुर्गंधी यासाठी लवंगेचा सर्रास वापर दिसून येतो. यामध्ये लोह, प्रथिने, कॅल्शियम सारखे आवश्यक घटक असतात.

या लेखात, आपण लवंगेचा वापर, फायदे आणि नुकसान बघणार आहोत. चला तर बघूया लवंग म्हणजे काय आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण लवंगेचा चा वापर कसा करू शकतो.

लवंग Clove in marathi

clove-in-marathi

लवंग खाण्याचे फायदे |Clove meaning in marathi

लवंगाचे शास्त्रीय नाव सिजीजियम अरोमॅटिक आहे. लवंग हे Myrtaceae, Syzygium aromaticum कुटुंबातील झाडाच्या सुगंधी फुलांच्या कळ्या आहेत. लवंग मूळचे इंडोनेशियातील मालुकू (किंवा मोलुक्कास) बेटावरचे आहे आणि सामान्यतः मसाला म्हणून वापरले जातात. शिवाय बऱ्याच रोगाचे निवारण करण्यासाठी लवंग औषध म्हणून उपयोगी येते.

लवंगाचा परिचय

लवंगाचे झाड सदाहरित असते. जे 8-12 मीटर (26–39 फूट) उंच वाढते. फुलांच्या कळ्या सुरुवातीला फिकट रंगाची असतात, हळूहळू हिरव्या होतात, नंतर कापणीसाठी तयार झाल्यावर चमकदार लाल रंगात बदलतात. लवंगाची कापणी 1.5-2 सेंटीमीटर (0.59–0.79 इंच) लांबवर केली जाते.

वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कापणीच्या हंगामामुळे लवंगा वर्षभर उपलब्ध असतात. इ.स.च्या पहिल्या शतकापर्यंत लवंग रोमन जगात पोहोचले, जिथे त्यांचे वर्णन प्लिनी द एल्डरने केले. इ.स. 176 पर्यंत लवंगा इजिप्तमध्ये पोहचल्या होत्या.

ओमानी खलाशी आणि व्यापारी यांच्याकडून लवंगाचा व्यापार हिंद महासागराच्या फायदेशीर मध्ययुगात भारतातून आफ्रिकेत केला जात होता.

लवंगचा वापर आशियाई, आफ्रिकन, भूमध्य आणि जवळच्या आणि मध्य पूर्व देशांच्या पाककृतीमध्ये केला जातो, मांस, करी, तसेच फळे (जसे की सफरचंद, नाशपाती) यांना चव देतात. लवंगचा वापर पेयांना सुगंधी आणि चव देण्यासाठी केला जाऊ शकतो.

सहसा लिंबू आणि साखर सारख्या इतर घटकांसह एकत्र केला जातो. मेक्सिकन पाककृतीमध्ये, लवंगाला क्लावोस डी ओलोर म्हणून ओळखले जाते. युजेनॉल असलेले लवंग तेल दातदुखी आणि इतर प्रकारच्या वेदनांसाठी प्रभावी आहे. ताप कमी करण्यासाठी, डास प्रतिबंधक म्हणून लवंगाच्या वापर होतो.


लवंगाचे इतर भाषेतील नाव

  • इंग्लिश : क्लोव्ह (Clove)
  • संस्कृत : देवकुसुम
  • तेलगू : जापत्री
  • हिंदी : लोंग

लवंगाचे प्रकार

१) मदर क्लोव्स

(अँथोफिली): यामध्ये अंडाकृती, तपकिरी, एकपेशीय आणि एक-बीज लवंगाची पिकलेली फळे असतात.

२) ब्लोन क्लोव्स

यामध्ये फुलातून  कोरोला आणि पुंकेसर दोन्ही वेगळे केले गेले असतात.

३) एक्सस्टेड क्लोव्स

यामध्ये  बहुतेक किंवा सर्व तेल काढून टाकले जाते. आणि गडद रंगाचे असतात.

clove meaning in marathi – लवंग

clove-meaning-in-marathi

Indian cloves


लवंग मधील पोषकतत्व

२.१ ग्रॅ लवंगामध्ये खालील प्रमाणे पोषकतत्व असतात.

चरबी (Fat)०.७ ग्रॅ.
तंतू (fiber)०.ग्रॅ.
प्रथिने (Proline)०.३ ग्रॅ.
मॅन्गनिज१.२६ ग्रॅ.

लवंग खाण्याचे फायदे – Cloves benefits in Marathi


१. मौखिक आरोग्य

लवंगामध्ये अँटी बॅक्टरिअल गुणधर्म असतात. हे तोंडातील बॅक्टरीया कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंगाचा फायदा होतो.

२. मधुमेहावर उपयुक्त

लवंगामध्ये आढळणाऱ्या घटकामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. लवंग खाल्याने इन्सुलिन ची निर्मिती होते. म्हणून लवंग मधुमेहींसाठी उपयुक्त ठरते.

३. हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

लवंगा मध्ये आढळणारे मॅगॅनीज शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. तसेच मॅगॅनीजमुळे मेंदूचे कार्य सुधारते.  

४. कर्करोगावर उपयुक्त

लवंगामध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट आणि युजेनॉल अँटी कॅन्सर गुणधर्माचे असते. त्यामुळे कर्करोगापासून बचाव होण्यास मदत होते. लवंग ट्यूमर वाढ थांबविण्यासाठी उपयुक्त ठरते. लवंगमधिल एथिल एसिटेट अर्कामधे अँटिट्यूमर गुण आढळतात. यामुळे कॅन्सरची जोखीम कमी होते.

५. पोटाच्या समस्येवर गुणकारी

लवंगामध्ये असणाऱ्या गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते.

६. पिंपल्सवर गुणकारी

लवंगामध्ये असलेल्या अँटी मायक्रोबीअल गुणधर्ममुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

७. सर्दी – खोकल्यावर गुणकारी

यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. लवंग आतील बरगड्यांपासून तोंडापर्यंत श्वसन तंत्र स्वच्छ करण्याचे काम करते.


लवंग खाल्याने होणारे नुकसान

लवंग खाण्याचे तसे काही फारसे दुष्परिणाम नाहीत.
१. लवंग तेल पिणे हे धोकादायक ठरवू शकते. म्हणून लवंग तेलचा फक्त बाह्य वापर करावा.
२. लवंग तेल त्वचेवर  वापरल्याने काही जणांना जळजळ किंवा रिऍक्शन होऊ शकते.
३. लवंग तेल पिण्यामुळे यकृत निकामी होऊ शकते.


लवंग बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

Q १. लवंग आपण दैनंदिन आहारात कसा वापरू शकतो?
Ans –
 पदार्थामध्ये लवंग स्वादासाठी मसाला म्हणून वापरू शकतो. बिर्याणी मध्ये लवंग सर्रास वापरले जाते. लवंगचा चहा पिल्याने सर्दी खोकला कमी होतो.

Q २. मधुमेहींनी लवंग खाऊ कि नये?
Ans –
 लवंग खाल्ल्यामुळे रक्तातील साखर कमी होते. एकाएकी रक्तातील साखर कमी झाली, तर मधुमेहींसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने लवंग खावा.

Q ३. दिवसातून किती लवंगाचे सेवन करावे?
Ans – दिवसाऊन २-३ लवंग खाणे योग्य. लवंगाच्या अधिक वापराने जळजळ, ऍलर्जी होऊ शकते.

Q ४. लवंग कोणी खाऊ नये?
Ans –
 तुम्ही जर रक्त पातळ होण्याचे औषध घेत असाल, तर लवंगाचे सेवन टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने लवंग खावा.

लवंग खाण्याचे फायदे हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!

  • मृणाली आकोलकर

📢 महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला लवंग बद्दल माहिती देणे असल्याकारणाने लवंग चा वापर आरोग्याच्या हेतूने करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊


हे वाचलंत का? –

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *