३०+ व्यवसाय आयडिया
आपण सर्वांनीच व्यवसाय कसा करायचा हे मागच्या ब्लॉगला पाहिलंच आहे. आता आपण कमीत कमी भांडवलातून कोणता व्यवसाय करता येईल हे पाहणार आहोत..! कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त नफा कोणत्या उद्योगातून भेटेल ते पाहू,
आपल्या सर्वांनाच इन्स्टंट सक्सेस पाहिजे असतं. त्यात काही चुक पण नाही आहे कोणालाही आपल्याला सध्याच्या काळात जबाबदारी नको असते. आपणा सर्वांनाच हा गैरसमज असतो की, व्यवसाय करायला लाखो करोडो पैसे असणे गरजेचे असते, परंतु असं नाहीच आहे मुळी. हो, पैसा असणं गरजेचा आहे, परंतु तुम्ही व्यवसाय कोणता करत आहात यावर ते अवलंबून आहे.
लघु उद्योग / Laghu Udyog / Business idea
business ideas in marathi
लघु उद्योग हा असा एक उद्योग आहे, ज्यात कमी खर्चात जास्तीत जास्त नफा तुम्ही काढू शकता. लघु उद्योग सुरू करण्याची तीव्र इच्छा असणे गरजेचे असते. तसेच मार्केटमधून माहितीचा अनुभव घेणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. व्यवसाय करायची आग मनात असेल तर तुम्ही धाडसी ने गुंतवणूक न करताही व्यवसाय सुरू करू शकता.
मारवाडी, पंजाबी, जैन, लोक नेहमी व्यवसायात पुढे असतात. परंतु मराठी लोक लवकर यात उतरत नाही. व्यवसायात उतरतांना पॉझिटिव अप्रोच (दृष्टिकोन) महत्त्वाचा असतो. मारवाडी, पंजाबी या लोकांकडे तो नेहमीच असतो.
मराठी माणसाने त्या म्हणीप्रमाणे जगलं पाहिजे “जिथे लाथ मारेल तिथे पाणी काढेल” कारण व्यवसाय हा असाच केला गेला पाहिजे. व्यवसायात स्वतः लक्ष देणे खूप गरजेचे असते.
हे वाचलंत का? – * व्यवसाय कसा सुरू करावा? * कमी भांडवल मध्ये सुरु करण्यासारखे व्यवसाय |
लघुउद्योग कोणते ते पाहू – small business ideas in marathi
१) चहा कॉफी स्टॉल –
आपण सर्वोच चहा, कॉफी, ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी, या युगातले आहोत. त्यामुळे चहा आणि कॉफी ला बरीच पसंती आपल्याकडे आहे. कॉफी बनवून देण्याचा व्यवसाय आपण करू शकतो. कमी भांडवल व जास्त नफा ह्या व्यवसायात असतो.
हा व्यवसाय सर्वात जास्त कोर्ट, कॉलेज, शाळा, अनेक प्रायव्हेट ऑफिस किंवा हॉस्पिटल यांच्या समोर जास्त प्रमाणात चालू शकतो. सुरुवातीला जर गुंतवणूक करायला पैसे नसतील तर थोडे कष्ट करून आपण पैसे मिळवून मग भांडवल घेऊ शकतो.
२) घरगुती भोजन –
आपण घरगुती भोजन जॉब, शिक्षण यासाठी घरापासून लांब आलेल्या विद्यार्थी वर्गासाठी, किंवा घरापासून लांब काम करत असलेल्या कामगार वर्गांसाठी, ही सुविधा देऊ शकतो. आपण आपल्या घरातून घरगुती डबे बनवून ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो.
टिफिन मध्ये स्पेसिफिक एक भाजी, दोन पोळ्या, वाटीभर भात, वरण आणि एक गोड पदार्थ अशाप्रकारे टिफिन ठेवून त्यावरून त्याचे रेट ठरवू शकतो.
- हे वाचा – ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग
३) फ्लोअर मिल (गिरणी) –
आपल्याला नेहमी दर महिन्याला लागणारी गोष्ट म्हणजे गव्हाचे पीठ, थालीपीठ पीठ, इत्यादी दळण बनवण्यासाठी गिरणी असते. गिरणी ही आता विविध प्रकारे आली आहे, गरम मसाल्याची गिरणी, धान्याची गिरणी, ओले दळण दळण्याची गिरणी, हळदीची गिरणी, मिरचीची गिरणी, अशा अनेक छोट्या गिरण्या आल्या आहेत.
सर्व एकत्र दळले जाते अशा अनेक मोठ्या गिरण्या आहेत, तसेच आता नवीन छोट्या घेण्यात आले आहेत. त्याच्या चाळण्या बदलून आपण त्यात अनेक प्रकारचे दळण करू शकतो. ज्याचा वापर आपण घरगुती ही करू शकतो.
४) घरगुती पापड, सांडगे व्यवसाय –
यात आपण विविध प्रकारचे पापड सांडगे कुरडई बनवून देऊ शकतो. साहित्य ग्राहकांकडून घेऊन प्रति किलो प्रमाणे मजुरी आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो, किंवा साहित्य आणून देणे. फक्त मजुरी घेऊन त्यांना आपण घरगुती पापड कुरडई बनवून देऊ शकतो.
पापड, कुरडई, सांडगे, यांचा जास्त सीजन हा उन्हाळ्यात आणि लग्नाच्या काळात असतो.
५) होममेड चॉकलेट केक आणि आईस्क्रीम –
new business ideas in marathi
आपण घरगुती चॉकलेट केक आणि आईस्क्रीम बनवू शकतो आणि ते विकू शकतो. त्यांच्या रेसिपीस आपल्याला ऑनलाइन यूट्यूब वरून आरामात भेटतात. त्या विविध प्रकाराने बनवून आपण त्या करून हा व्यवसाय करू शकतो. यात चॉकलेट बॉल्स, चॉकलेट मेलडी, डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, चॉकलेट केक, इ. घरगुती आपण बनवू शकतो.
एवढंच काय तर आपण याचे क्लासेस पण घेऊ शकतो. त्या क्लासेस मधून आपण प्रति केक नुसार शिकवून त्यानुसार पैसे घेऊ शकतो.
६) डेअरी –
आपण घरगुती डेअरी ही सुरू करू शकतो. जात आपण विविध दुग्धजन्य पदार्थ ठेवू शकतो, यात आईस्क्रीम, चॉकलेट, केक, थंडगार लस्सी, थंडपेय तसेच फास्ट फूडला लागणारे सॉस आणि इतर साहित्य ही आपण ठेवू शकतो.
या व्यवसायाला भांडवल आणि जागा चांगली लागते, परंतु सर्वात जास्त चालणारा हा व्यवसाय आहे. यात तुम्ही विविध खाण्याचे पदार्थ ठेवू शकता, आणि दुग्धजन्य गोड पदार्थ ही ठेवता येतात.
७) जाम, लोणचे, सॉस –
हा लघुउद्योग अगदी सोपा असा घरगुती व्यवसाय आहे. अनेक बचत गटातील महिला हा व्यवसाय करतात. ब्रेडवर जाम सर्वांचा लहान, म्हातारांचा आवडता प्रकार आहे. त्यामुळे जाम, लोणचे, सॉस हा व्यवसाय सुरू करणे अगदी फायदेशीर ठरते.
जाम सॉस लोणच्याचा उपयोग आपण नेहमीच करतो. ब्रेड जाम, सॉस ब्रेड, समोसा सॉस,पोळी लोणच, घरात एखाद्यावेळेस भाजी नसेल तर या पदार्थांनी आपण त्या भाजीची जागा भरून काढतो.
low budget business ideas in marathi
८) बिस्किट, पाव, नमकीन (बेकरी) –
हा व्यवसाय आपण एखाद्या छोट्या युनिटमध्ये ही करू शकतो, तसेच घरी सुद्धा आपण ह्या गोष्टी बनवू शकतो. या बनवण्याचा अनेक पद्धती आहेत, या पद्धती आपल्याला युट्युब किंवा पुस्तकातून शिकायला मिळतात.
चहाचा साथीदार बिस्किट, दुपारचा नाष्टा नमकीन, बटाटा वडा, मिसळ चा जोडीदार पाव अशीही मैफिल एकत्र बसते या व्यवसायातून अनेकांना रोजगाराची संधीही प्राप्त होते.
९) फास्ट फूड शॉपी –
सध्याच्या काळात वेळेचे बंधन नसते किंवा ही कुठेही पिझ्झा-बर्गर, मॅगी, रस्सा वडा, फिंगर चिप्स, चायनीज, पनीर पकोडा, अशा विविध फास्ट फूडचे दिवाने आपण झालेलो आहोत. त्यामुळे सर्वात जास्त चालणारा व्यवसाय म्हणजे फास्ट फूड शॉपी.
हि शॉपी जास्तीत जास्त कॉलेजेस, स्कूल च्या बाहेर असेल तर जास्त प्रमाणात चालते. यात आपण एखाद्या शॉपी ची फ्रेंचायसी सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे आपण ऐकतच असाल छोटू, कृष्णा, गोली, कोल्हापुरी वडापाव हा वडापाव यांची फ्रेंचायसी आपण आपल्या गावात घेऊ शकतो.
१०) किराणा दुकान –
या व्यवसाया ची सुरुवात आपण छोट्या जागेतून आणि कमी भांडवलातून करू शकतो. आपल्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांच्या नेहमीत वापरायच्या काही गोष्टी आपण या दुकानात ठेवून हळूहळू आपण आपला व्यवसाय वाढू शकतो.
यात सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुकानदाराचा ग्राहकांशी असलेलं नातं या व्यवसायात ग्राहकाशी जोडलं जाणं फार महत्त्वाचं आहे.
११) गिफ्ट शॉपी –
small investment business
laghu udyog ideas in marathi
आपण प्रत्येकाच्या वाढदिवसाला, पार्टीला, फंक्शनला काही न काही गिफ्ट घेऊन जातो. व्यवसायासाठी तुम्हाला थोडा जास्त प्रमाणात खर्च येण्याची शक्यता असते. परंतु त्या प्रमाणात व्यवसायातून उत्पादन ही घेतली जाते. यात आपण विविध घराला शोभा येईल अशा वस्तू ठेवू शकतो.
तसेच घरात वापरल्या जाणारे प्लास्टिक च्या गोष्टी यात आपण ठेवू शकतो. हे शॉप खोलण्यासाठी लोकल अथोरिटी घेऊन आपण खोलू शकतो. यात आपण डिनर सेट, ज्यूस ग्लासेस, फ्रिज कव्हर, टीव्ही कव्हर, बेडशीट, फ्रेम्स, पडदे, खेळणे, इत्यादी घेऊ शकतो. माल होलसेल रेट ने कमीत कमी दरात जास्तीत नसत वरायटी घेऊन जास्तीत जास्त नफा आपण कमवू शकतो.
१२) मनी ब्रोकर (आडत्या) –
पैसे कमावण्याचा सर्वात सोप्पा उपाय म्हणजे मनी ब्रोकर, यात कोणत्याही प्रकारचे आर्थिक भांडवल लागत नाही. यात फक्त ओळखी असणे महत्त्वाचे असते आणि ब्रोकर कोणाला म्हणतात? तर असा व्यक्ती जो पैशांचा व्यवहार यात मध्यस्थी असतो.
एखादा जागेचा किंवा प्लॉट च्या विक्री च्या वेळी त्यामध्ये असतो. तो उदाहरण ती विक्री करताना भाव ठरवून सर्व कागद पत्र व्यवहार नीट पार करून देणारा व्यक्ती म्हणजे मनी ब्रोकर.
१३) बाग काम (गार्डनिंग) –
गार्डनिंग हा ही एक व्यवसाय आहे. यात विविध गोष्टींचा झाडांचा, औषधांचा अभ्यास केला जातो आणि गार्डनिंग हिरवीगार राहावी म्हणून विविध प्रकारे कटिंग आणि औषधे मारून ती मोठी केली जातात. अगदी व्यवस्थित रित्या त्यांच्याकडे लक्ष देऊन ते आकर्षित करून गार्डनिंग केले जाते. गार्डनिंग चे काम करणाऱ्याला “गार्डनर” असे संबोधले जाते .
शोभादायक फुलबाग निर्माण करणे आणि दुसरा व्यक्तिगत उपभोगासाठी फुल फळ भाजी त्या सर्वांसाठी लागणारे जागेची जमिनीची पाण्याचे हवामानाची सूर्यप्रकाशाची काळजी घेणे, त्याकडे लक्ष देणे, कोणत्या हंगामात कोणते झाडेझुडपे लावणे. हे निश्चित करण्याचे काम “गार्डनर” करतात.
१४) पाळीव प्राणी सांभाळणे व काळजी घेणे –
हा ही एक प्रकारचा व्यवसाय आहे. घरात पाळले जाणारे प्राणी त्यांची काळजी घेण्यासाठी ही लोक ठेवली जातात. त्यांच्या अन्नपाणी याकडे लक्ष देणे, त्यांच्या वेळेनुसार त्यांना सर्व गोष्टी मिळणे, त्यांची काळजी घेणे, त्यांच्याकडे लक्ष देणे.
ग्राहकांनी प्रभारी म्हणून त्या कामगाराला पाहिलेच पाहिजे, आपण त्यांना दिलेली पहिली छाप निश्चित जनावरांची काळजी घेण्याची वेळ आपल्यावर ते आपल्यावर विश्वास ठेवतील की नाही. हे ती छाप सांगून जाते. एकदा की ग्राहकांचा विश्वास बसला तर ते त्यांचे पाळीव प्राणीही तुम्हाला सोपवतात.
१५) इलेक्ट्रिकल सर्विस –
हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक वस्तूंची माहिती असणे गरजेचे असते. तसेच विविध लाईट फिटिंग किंवा इलेक्ट्रिक घरगुती वस्तूंची रिपेरिंग येणे देखील महत्वाचे असते. येत नसल्यास आपण त्यासाठी एखादी व्यक्ती ठेवू शकतो.
या इलेक्ट्रिक वस्तू होलसेल रेट मध्ये ही आपण विकू शकतो यात आपण सीसीटीव्ही सर्विस, एसी, कुलर, फॅन, मिक्सर, फ्रिज अशा अनेक गोष्टी. तसेच वायर, ट्यूबलाइट, इत्यादी वस्तू ठेवू शकतो. यात आपण सोलर हिटर, वॉटर प्युरिफायर ही सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो.
बिजनेस प्लान मराठी
१६) कॉम्प्युटर, लॅपटॉप, व्यवसाय –
या व्यवसायात आपण विविध गोष्टी करू शकतो. तुम्हाला कॉम्प्युटर रिटेलिंग किंवा होलसेलींग पाहिजेल असल्यास ते काम तुम्ही करू शकता किंवा साईड बाय साईड तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कॉम्प्युटर काम देखील तुम्ही करू शकता.
त्याच बरोबर तुम्ही कम्प्युटर रिपेरिंग ची सुविधा ही ग्राहकांना देऊ शकता, तसेच विविध कम्प्युटर रिलेटेड सर्विस तुम्ही ग्राहकांना देऊ शकतात. यात तुम्ही वापरलेल्या कम्प्युटर योग्य दारात घेऊन त्याची विक्री करू शकता. अशा विविध गोष्टी तुम्ही यात ग्राहकांना देऊ शकता.
१७) मोबाईल शॉपी –
यात तुम्ही विविध नवीन मोबाईल ठेवू शकता, मोबाईलचा एखाद्या कंपनीची फ्रेंचायसी तुम्ही घेऊ शकता, एवढेच काय तर तुम्ही यात मोबाईल रिचार्ज, टीव्ही रिचार्ज, डिश टीव्ही रिचार्ज, डिश टीव्ही मोबाईल रिपेरिंग आणि मोबाईलचा रिलेटेड सर्विसेस ग्राहकांना पुरवू शकता.
मोबाईल रिलेटेड वस्तूंची खरेदी विक्री ची सुविधा देखील तुम्ही ग्राहकांना देऊ शकतात. मोबाईल संबंधित विविध स्कीम तुम्ही काढू शकता.
१८) मिनी-बँक व्यवसाय-
मिनी बँक व्यवसाय म्हणजेच ग्राहक सेवा केंद्र सीएससी कम्प्युटर सर्विस पॉईंट म्हणजेच आपण आपल्या आवडत्या बँक सोबत कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलून हा व्यवसाय सुरू करू शकतो. यात आपण बँक ट्रांजेक्शन ची सुविधा तसेच बँकेने काम करायला परवानगी दिलेल्या विविध सुविधा ग्राहकांना देऊ शकतो.
१९) इव्हेंट मॅनेजमेंट –
Laghu Udyog ideas / business ideas marathi
Laghu Udyog ideas
सर्वात जबाबदारीच्या व्यवसायां मधला व्यवसाय, या आपल्या युगात लग्न, रिटायरमेंट, बारसे, विविध पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, इ. सर्व कार्यक्रमाच्या तयारीसाठी किंवा ती तयारी कशी करायची त्यासाठी काही व्यक्ती निवडले जातात ते व्यवसाय करत असतात, ते काम त्या व्यक्ती वर सोपवले जाते.
यात ती व्यक्ती कार्यक्रमाचे थीम ठरवते, त्याचे प्लॅनिंग करणे, डेकोरेशन, फर्निचर, डिजाईन, निमंत्रणपत्रिका, खानपान सेवा, मनोरंजन, कार्यक्रम, गेम्स, इ. कार्यक्रमाचे नियोजन बघणे ही सर्व जबाबदारीचे काम त्या व्यक्ती वर असते. त्या व्यक्तीला मॅनेजर असे संभोदले जाते.
त्यामुळे मॅनेजर म्हणजे व्यवसाय सुरु करणारी व्यक्ती. ही व्यक्ती कशी असते तर कल्पकता असणारी, नियोजन कौशल्य असणारी, चिकाटी, संयम सहनशीलता या गुणांनी संपन्न असणारी असते.
२०) मसाले उद्योग –
मोठ्या प्रमाणावर चालणारा लघु उद्योग म्हणजे मसाले उद्योग. मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले असल्यास आपण विविध लागणारे मसाल्यांचे प्रकार करून विकू शकतो, त्याच बरोबर त्या मसाल्यांना लागणारे साहित्य आपण विकू शकतो.
२१) कागदी पिशव्या –
पॉलिथिन चा कॅरीबॅग पूर्णपणे बंद असल्यामुळे, कागदी पिशव्या जास्त प्रमाणावर वापरला जात आहे. त्यामुळे आपण कागदी पिशव्यांचा व्यवसाय करू शकतो, कागदी पिशव्या बनवण्यासाठी एक व्हाईट पेपर लागतो आणि कलर पेपर लागतो.
बॅग बनवण्यासाठी मशीनच पाहिजे असतं असं काही नाही. आपण यूट्यूब च्या सहाय्याने विविध प्रकारच्या डिझाईन कागदी पिशव्या अगदी सहज रित्या बनवू शकतो.
२२) कापडी पिशव्या –
शिवणकाम करून घरच्याघरी शिवणाऱ्या मशीन वर आपण या पिशव्या बनवु शकतो. आज मार्केटला पिशव्यांची जास्त प्रमाणावर मागणी आहे, त्यामुळे कट पीस मध्ये स्वस्त मिळणारे जाड कापड आणून या पिशव्या आपण बनवू शकतो.
विविध रंगाने, डिझाईनने, सजलेली, कापडी पिशव्या पाहिजे व गोलाकार, आयतीकार, तसेच बॉक्स अश्या विविध आकारांनी शोभणाऱ्या पिशव्या आपण बनवू शकतो.
२३) द्रोण आणि पत्रावळ्या –
द्रोण आणि पत्रावळ्या ही अशी एक गोष्ट आहे, जी नेहमी कार्यक्रमाला लागत असते. कुठे बाहेर फिरायला जायला, ही आपण ती सोबत घेऊन जाऊ शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी या व्यवसायाची परिपूर्ण माहिती घेऊन मग त्याच्या पेपर चे रेट काढून घेऊन बाजारपेठेतील त्याची किंमत जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते.
त्याचे मशीनही असते त्याचे रेट घेऊन आपण त्याच्या साह्याने हा उद्योग सुरू करू शकतो. तसेच पळसाच्या पानापासून ही या बनवल्या जातात ते शिकून घरी आपण बनवू शकतो.
laghu udyog information in marathi
घरी बसून इंटरनेटद्वारे कसे पैसे कमवू शकतो.
कोणते कोणते व्यवसाय किंवा काम आपण इंटरनेट द्वारे करू शकतो..? यासाठी विविध वेबसाइट ही आहेत. ज्यातून आपल्या कलेचा वापर करून आपण पैसे कमवू शकतो.
१) आर्टिकल (लेख) लिहिणे –
आर्टिकल लिहणे, कंटेंट राईटनिंग, न्यूज राईटनिंग, हे काम आपण घरी बसून ऑनलाईन करू शकतो. स्वतःचे भांडवल न गुंतवता करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे. ज्यामधून आपल्याला बर्यापैकी व उत्तम उत्पादन मिळू शकते यात विविध प्रकार आहेत.
लेखनाचे ते लिहून आपण त्या वेबसाईट्स चायनल बघणारे वाचणार्यांच्या संख्या वाढवू शकतो. चांगली लेखनशैली अवगत असणे, हे फार महत्वाच आहे. लेखनातून चांगल्या विचारांची प्राप्तीची देवाणघेवाण झाली पाहिजे.
२) शैक्षणिक वर्ग –
एखादा विषय शिकवण्याची ईच्छा असलेल्या शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाचे यूट्यूब चैनल खोलून किंवा एखादी वेबसाईट बनवून विविध क्लासेस संदर्भात माहिती देवून अनेकांना मदत करू शकतो. तसेच यूट्यूब चैनल वर विविध विषय आपण सहज रित्या शिकवू शकतो. लाखो, करडो लोकांना पर्यंत आपण माहितीचा साठा देऊ शकतो.
३) लोगो बनवणे –
विविध वेबसाइट्स, ॲप्स, हॉस्पिटल, इ. अशा अनेक लोकांना त्यांच्या कंपनीसाठी, वेबसाईटसाठी, हॉस्पिटलसाठी, लोगो पाहिजे असतात. ते लोगो बनवून द्यायचं काम विविध वेबसाईटच्या माध्यमातून डिझाईन करून ते बनवून आपण त्यांना देऊ शकतो. हे काम आपण ऑनलाईन मोबाईल आणि लॅपटॉप द्वारे करू शकतो.
४) ब्लॉगर –
laghu udyog list in marathi
ब्लॉगर या वेबसाईटवर जाऊन आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो, या वेबसाईट वरून आपण अनेक वाचकांपर्यंत आपले लेख पाठवू शकतो. जास्तीत जास्त माहिती ज्ञान-विज्ञान, इत्यादी गोष्टी आपण लिहू शकतो व अनेक लोकांपर्यंत ते लिखाण पोचवू शकतो. ज्यातून आपल्या कलेलावाव मिळेल व त्यातूनच घर बसल्या आपण पैसे कमवू शकतो.
५) विविध मीडिया प्लॅटफॉर्म –
विविध अशा वेबसाईट्स ॲप्स आहे त्यातून आपण अनेक प्रकारचे काम ऑनलाईन रित्या करन पैसे कमवू शकतो. विविध छंद जोपासले जाणाऱ्या या वेबसाईटवर त्यानुसार काम असतात. यात स्क्रिप्ट रायटिंग, कॉपी रायटिंग, लोगो डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, म्युझिक, व्हिडिओ, ग्राफिक, अशे इ. काम आपण करू शकतो.
तर हे काम आपल्याला वेबसाईट्सवर मिळतात वेबसाईट कोणतातरी फ्रीलान्स, फीवर, लिंकडीन, इ. या ठिकाणी आपण काम देऊन करून घेऊ शकतो किंवा काम घेऊन करून शकतो.
६) स्वातंत्ररित्या काम करण्याचा व्यवसाय (freelancing) –
हा व्यवसाय एखाद्या व्यक्ती करत असतो. विशिष्ट लेखन करून वेबसाईटची करार करून तसेच स्वातंत्र्य रित्या काम करून अशा अनेक मार्गांनी हा व्यवसाय स्थापित केला जातो. कागद पत्र लिहिण्यासाठी किंवा इतर भाषिक ऐतिहासिक अनेक प्रकारचे लेखन व संपादन कार्य करण्यासाठी हा व्यवसाय केला जातो.
यासाठी अनेक व्यावसायिक संस्था विकसित केल्या जातात. स्वतंत्ररित्या काम करणारा व्यक्ती त्या व्यवसायवर इतर लोकांनाही कामावर ठेवू शकतो आणि त्यांना प्रकल्पावर काम करायला देऊ शकतो.
७) नेटवर्क मार्केटिंग –
हा व्यवसाय म्हणजे एखाद्या प्रोडक्टच जाळे निर्माण करणे, म्हणजेच तुम्ही एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्ट ची माहिती घेऊन त्यानंतर तुम्हला फायदा वाटत असल्यास त्या कंपनीला तुम्ही जॉईन करू शकता. त्याच बरोबर त्या प्रॉडक्टची माहिती देऊन तुम्ही तुमच्या अजून सदस्यांना त्यात जोडू शकता. प्रॉडक्ट विकून आणि सदस्यांना जोडून त्यातून तुम्ही उत्पादन घेऊ शकता.
अशी अनेक लघुउद्योग आपण करून व्यवसाय सुरू करू शकतो. तुम्हाला marathi udyog mahithi / business ideas in marathi कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा..!
– मधुरा जोशी
हे वाचलंत का? –
🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.