Breadfruit-in-marathi

Breadfruit in Marathi : निर्फनस हे फणस सारखे दिसणारे छोटे फळ आपल्यातील बऱ्याच लोकांना या बद्दल माहिती नाही. बरेच लोक याला फणस म्हणून सोडून देतात, परंतु हे फणस पासून पूर्ण वेगळं आहे. हे एक फळ असून आपल्या कडे याची भाजी केली जाते. 

हे फळ फणस प्रमाणे भाजी करून खाल्ले जाते. बाकी फळा प्रमाणे आपण या फळाला कच्च खावू शकत नाही. या फळाची शेती मोठ्या प्रमाणात केरळ आणि कोकणात केली जाते. या फळाला लागणारी जमीन ही गरम आणि उष्णकटिबंधीय लागते. 

निर्फनस याचे आरोग्यासाठी फायदे

  • निर्फणस हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
  • निर्फणस आपला बऱ्याच इन्फेक्शन पासून बचाव करते.
  • निर्फनस हे प्रोटीन्स ने भरलेले आहे आणि ते आपल्या पचन क्रियेला सुदृढ बनवण्यात मदत करते.
  • मधुमेह असणाऱ्या लोकांनसाठी खूप लाभकारी आहे, निर्फनस मधुमेह नियंत्रित ठेवते.
  • निर्फणसं खाल्ल्याने त्वचेचे सर्व रोग दूर करण्यास मदत होते.

निर्फणस शेती करिता लागणारी माती व वातावरण

नीर्फणस गरम आणि उष्कटिबंधीय शेत्रात चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते. झाड छोटे असल्यावर त्यांना थोडी कमी उन्हाची गरज राहते, त्यामुळे हे लवकर मोठे होतात. नंतर थोडे मोठे झाले, की उन्हामुळे लवकर वाढ होते.

या झाडासाठी 20° ते 35° तापमान उत्तम मानले जाते. त्याच सोबत पाऊस 150 ते 250 झाल्यास याचे उत्पादन चांगले होते आणि या झाडाला चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते.

नीर्फणस ची लागवड कशी करावी.?

  • निर्फनस ची लागवड करण्यासाठी सर्वात चांगला ऋतु जून आणि सप्टेंबर मानला जातो. याची लागवड करण्यासाठी आपल्याला आधी शेतात 10 ते 12 मीटर या अंतरावर कलम पाहून गढे खोदून घ्यायचे आहे.
  • प्रत्येक कलम लावताना तिच्या सोबत 25 की. ग्राम जैविक खत टाकण्यात येते. या व्यतिरिक्त कोणतेच खत टाकण्याची गरज लागत नाही. हे नैसर्गिक झाड असल्यामुळे जेवढे नैसर्गिक वाढेल तेवढे फळ चांगले येतील.
  • याची कलम ही कटिंग करून तयार केली जाते, या फळा मध्ये कुठल्याच प्रकारची बी नसते. याची लागवड केल्यानंतर लगेच शेतीची आंतरमशागत केली जाते. गर्मी च्या मौसम मध्ये याला जास्त आंतरमशागत करण्याची आवश्यकता असते.
  • खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास शेतात पाणी साठवून न राहण्याची काळजी घ्या.  बाकी फळा प्रमाणे याला सुद्धा पावसाळ्यात सडण्यापासून वाचवण्यासाठी बोर्डो पेस्ट चे मिश्रण लावा.

निर्फनस किती वर्षांनी उत्पादन देते.? 

मातीची गुंधर्मिय क्षमता आणि कलम च्या गुणवत्ते वर या झाडाचे उत्पादन अवलंबून राहते 3 ते 6 वर्षांनी या झाडाला निर्फनस लागण्यास सुरवात होते व हे फळ खाण्यायोग्य झाल्यास याची तोडणी हाताने केली जाते. या झाडाला 600 ते 1500 फळ लागतात. एका फळाचे वजन 1 ते 5 ग्राम असू शकते. 

शेतकरी मित्रांनो आपण याची लागवड करून चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केल्यास ही शेती आपल्या साठी खूप फायद्याची ठरू शकते. पारंपरिक शेती सोडून याचा एक प्रयोग म्हणून ही शेती करू शकता.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Knowledge

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *