आर्यन खानच्या डेब्यू वेब सीरिज ‘स्टारडम’ मध्ये हे दोन स्टार्स

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची डेब्यू वेब सीरिज ‘स्टारडम’ मधून बॉलिवूड इंडस्ट्रीतील दोन मोठे स्टार्स डेब्यू करताना दिसणार आहेत. त्याचे नाव काय आहे ते या आर्टिकल च्या माध्यमातून जाणून घेऊया.!

Aryan Khan Debut Web Series Stardom

Image Source – Times of India

Aryan Khan Debut Web Series Stardom:- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत मध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. हे तर आपल्या पासून नक्कीच लपलेले नाही. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच acting filed मध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अभिनयात रस नाही.

खरंतर आर्यन खानला लेखन आणि दिग्दर्शनात (डायरेक्शन) मध्ये आपलं करिअर घडवायचं आहे. आर्यन खान अनेक दिवसांपासून वेब सीरिज वर काम करत आहे. आता मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे, की आर्यन खानच्या डेब्यू वेब सीरिज ‘स्टारडम’मध्ये दोन मोठे स्टार कैमियो करताना दिसणार आहेत.

फॅन्स ला या दोन स्टार्सची नावे कळताच, ते वेब सीरिजच्या रिलीजची वाट पाहू लागले.

आर्यन खानच्या वेब सीरिजमध्ये शाहरुख आणि रणवीरचा कैमियो असणार

आर्यन खानची डेब्यू वेब सिरीज ‘स्टारडम’ मध्ये त्याचे वडील शाहरुख खान आणि अभिनेता रणवीर सिंग हे कैमियो दिसणार आहेत, असे ‘पीपिंग मून’ च्या न्युज मध्ये म्हटले आहे. शाहरुख खान आणि रणवीर सिंग वेब सीरिजच्या वेगवेगळ्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत.

ही पहिली वेब सीरिज असेल, ज्यामध्ये शाहरुख खान आणि रणवीर सिंग कैमियो करणार आहेत. आर्यन खानच्या वेब सीरिजमध्ये अनेक नवे चेहरे दिसणार असून, राम कपूरची पत्नी गौतमी कपूरही दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आर्यन खानच्या वेब सीरिजचे नाव नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

‘स्टारडम’ या वेबसिरीजचे सहा भाग असतील आणि ही वेब सिरीज आर्यन खानने बिलाल सिद्दीकी यांच्या सहकार्याने लिहिली आहे.


News Source – bollywoodlife

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment