अजीनोमोटो तुम्ही नकळत खाताय? तर सावध व्हा.!

Ajinomoto meaning in marathi

अजिनोमोटो म्हटलं की, आपल्याला काही नवीन ऐकल्या सारख वाटते. तर तुम्ही याच नाव तर खूप जागी ऐकत असाल व तुम्ही याचा स्वाद पण घेतला आहे. पण तुम्हाला हे माहीत नाही, की नेमका हे काय आहे? तर ही सर्व माहिती तुम्हाला या पोस्ट मधून मिळेल.

अजिनोमोटो म्हणजे काय? – Ajinomoto in Marathi

Ajinomoto in Marathi

ajinomoto meaning in marathi

अजिनोमोटो हे एका व्यावहारिक नावाने सुद्धा ओळखले जाते. ते म्हणजे मोनो सोडिअम ग्लुटामेट. अजिनोमोटो या कंपनीचे कार्यालय टोकियो ला आहे. ही कंपनी जगातल्या 26 देशात काम करते.

अजिनोमोटो चा वापर जास्त करून चीन मध्ये तिथल्या खाद्य पदार्थानमध्ये केला जातो. तुम्हाला आता लक्षात आलेच असेल, की हे खाद्य मध्ये वापरतात. आता तुमचा प्रश्न हा असेल की हा मसाला आहे? हा मसाला नाही. हा एक स्वाद आहे. आपण जसे स्वाद म्हणतो ना आंबट, गोड, तिखट, खारट तसाच हा एक पाचवा स्वाद आहे. जो थोडा तुरट वेगळा आहे.

आता जे ही पॅक फूड येतात. त्यात अजिनोमोटो चा वापर केला जातो. कारण ते फूड जास्त काळ टिकाव त्याचा स्वाद जशाच्या तसा राहावा म्हणून, आता तुम्ही जेव्हा पण कोणतं पॅक फूड खाल जसे की चिप्स, Maggie तर त्याचा जो मस्त स्वाद असतो. तो अजिनोमोटो मुळे आहे.

आधी आपण भारतीय लोक घरच खान पसंद करत होतो. आता बदलत्या काळाप्रमाणे आपण बाहेर जास्त खाऊ लागलो. त्यात जास्त फास्ट फूड जसे पिझां, चिप्स, Maggie. हे आपण बाहेर खात आहोत. ज्यात अजिनोमोटो चा वापर केला जातो. म्हणून आपल्याला या गोष्टीचा स्वाद आवडतो. याचा वापर काही टोमॅटो सॉस मध्ये पण केला जातो.


अजिनोमोटो हा स्वाद कोणी शोधला ?

अजिनोमोटो चा शोध 1908 मध्ये एका जपानी वैज्ञानिक (किकुनाय इकेडा) ने लावला. त्यानी याला( umami ) उमामी या नावाने ओळखले. म्हणजे आनंद देणारा स्वाद. तेव्हा पासून हा स्वाद जपानी सुप मध्ये वापरला जातो. नंतर त्याची चव व स्वाद जगात पसरला. अनेक अन्न उत्पादक कंपन्यांनी त्याचा वापर सुरू केला.

भारतात अजिनोमोटो चा प्रवेश १९६१ मध्ये झाला. त्यानंतर २००३ मध्ये अजिनोमोटो इंडिया प्रा. लि म्हणून कंपनी सुरू करण्यात आली. अजिनोमोटो चा स्वाद हा थोडा मीठा सारखा तुरट लागतो. दिसायला हे चमकणाऱ्या खोबर किस सारखे दिसते. यामध्ये अमिनो ऍसिड मोठ्या प्रमाणात आढळते.


अजिनोमोटो चे फायदे – Ajinomoto benefits in Marathi

अजिनोमोटो चे काही दुष्परिणाम आहेत. परंतु याचे काही फायदे सुद्धा आहेत. याचे फायदे हे आपल्या आरोग्यासाठी कमीच आहेत यामुळे तुम्ही याचा वापर कमीच करायचा आहे.

जेव्हा पण आपण काही नवीन खातो. तर त्यामध्ये आपण सर्वात आधी त्या खाण्याची टेस्ट बघतो. तर हेच काम अजिनोमोटो करतो. तो खान्याची टेस्ट वाढवतो. तुम्ही कधी चिनी खाणे खाल्ले असेल, तर त्या खाण्याला जो एक वेगळा स्वाद असतो. तो अजिनोमोटो मुळे असतो.

अजिनोमोटो चा हाच एक फायदा आहे, की ते खाण्याच्या टेस्ट ला वाढवतो, व त्यामुळे तुम्हाला ते खाणे आवडते. आंतरराष्ट्रीय जे पण खाणे आहेत त्यामध्ये MSG चा वापर केला जातो.

नैसर्गिक फळांन मध्ये अजीनोमोटो

अजिनोमोटो म्हणजेच MSG (मोनोसोडियम ग्लुटामेंट) हे तुम्हाला काही फळामधून सुध्दा मिळते. जसे टमाटर, पनीर, मशरूम जर तुम्हाला मोनोसोडियम खायचेच आहे, तर हे फळ खा यामधून तुम्हाला मोनोसोडियम मिळेल.


अजिनोमोटो चे दुष्परिणाम – side effects of ajinomoto

आता गोष्ट येते अजिनोमोटो च्या दुष्परिणामाची, ज्यासाठी हे ओळखले जाते. बघा कोणत्याही गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ली तर तिचे दुष्परिणाम होईलच. आता हे आपल्यालाच ठरवायचं आहे. किती खायचे ते..!

ज्या खाद्यात अजिनोमोटो मोठ्या प्रमाणात वापरले जाते. ते आपण किती खायला पाहिजे? अजिनोमोटो चे काय दुष्परिणाम आहेत? ते खाली दिलेलं आहे.

  • अजिनोमोटो चा स्वाद हा मीठा सारखा लागतो. या कारणामुळे म्हणतात, की ज्यांना BP चा त्रास आहे. त्यांनी याचा उपयोग करू नये.
  • अजिनोमोटो चा जास्त प्रमाणात वापर हा आपल्या डोळ्यानसाठी घातक ठरू शकतो.
  • तुम्ही जे पॅक असलेले फूड घेता. त्यामध्ये अजिनोमोटो चा वापर केला असतो. यामुळे तुम्ही खूप जाड होऊ शकता.
  • अजिनोमोटो ला लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक मानले जाते. तर लक्षात ठेवा तुमचे मूले याला जास्त प्रमाणात खात तर नाही आहेत ना?
  • हृदय विकार असणाऱ्या लोकांनीं अजिनोमोटो खाणे टाळावे.
  • ज्यांना डोकं दुखीचा त्रास आहे, सतत डोकं दुखत राहत, त्यांनी अजिनोमोटो चा वापर करू नये. यामुळे मायग्रेन चा त्रास आणखी वाढू शकतो.

हे सर्व केमिकल पासून तयार केले जाते. जरी कंपनी च म्हणत असेल की हे खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे, तर आज पर्यंत या कंपनीने याचे काही प्रूफ दिलेले नाहीत.


अजिनोमोटो बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

Q. 1) अजिनोमोटो कशा पासून तयार केले जाते?

Ans :- अजिनोमोटो मोनोसोडियम ग्लूटामेट, हे ग्लूटामेट एसिड च मिश्रण आहे. याला नंतर वाळून याच पावडर तयार केलं जाते.

Q. 2) अजीनोमोटो चा वापर का केला जातो ?

Ans :- अजिनोमोटो हे एक प्रकारचे मीठ आहे आणि ह्या कंपनी याचा वापर पण मीठा सारखाच करतात. तसे तर हे आधी चीन मध्ये वापरले जायचे. पण आता आपल्याकडे पण याचा वापर पॅक फूड मध्ये मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. ते फूड त्या पॅकींग मध्ये जास्त दिवस टिकलं पाहिजे, म्हणून अजिनोमोटो चा वापर त्यात केला जातो.

Q. 3) अजिनोमोटो खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे?

Ans :- बघा जी कंपनी हे तयार करते, त्या कँपनी च म्हणणं आहे की, हे आरोग्यासाठी 100% चांगलं आहे. परंतु काही अमेरिकन संशोधना नुसार हे शरीरास हानिकारक आहे. असे सिद्ध झालेले आहे. अमेरिका मध्ये हॉटेल मध्ये याचा वापर करत नाहीत व पॅक फूड मध्ये पण त्यांची एक मात्रा ठरलेली आहे. आता हे आपल्याला ठरवायचं आहे, की आपण कुणावर विश्वास ठेवायचा आहे संशोधना वर की कँपनी वर.

हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा.

  • धिरज तायडे

हे वाचलंत का? –

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment