जेव्हा हवेचा बबल नसानं मध्ये प्रवेश करतो, तेव्हा काय घडत?

air embolism in marathi

जेव्हा हवेचा बबल नसानं मध्ये प्रवेश करतो, तेव्हा काय घडत?

तुम्ही या गोष्टीचा कधी विचार केला आहे का? जेव्हा हवेचा बबल म्हणजेच बुडबुडा नसानं मध्ये प्रवेश करतो. तेव्हा नेमका काय होत? त्यामुळं शरीरावर नेमका कुठला प्रभाव पडतो? आजच्या या विडिओ च्या माध्यमातून आपण जाणून घेऊया!  

इंजेक्शन किव्हा सलाईन मध्ये तयार झालेला बबल ला एअर एम्बोलिझम असे म्हणतात. त्याचा शरीरावर होणार वाईट परिणाम हा नेमका हवेच्या बबलच्या आकारावर आणि रक्तप्रवाहात बबल कुठे अडकतो, यावर अवलंबून असतो.

एअर एम्बोलिझम धोकादायक आणि प्राणघातक देखील असू शकतो. लहान हवेच्या बुडबुड्यांमुळे कोणतीही  लक्षणे दिसू शकत नाहीत. परंतु जेव्हा मोठे बबल रक्तात प्रवेश करतात. तेव्हा ते प्रवाह रोखू शकतात आणि गंभीर दुखापत करू शकतात.

जेव्हा लहान हवेचा बुडबुडा नसानं मध्ये प्रवेश करतो, तेव्हा तो रक्तप्रवाहातून इजा न करता सहज प्रवास करू शकतो. 

कारण कि, शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणाच बबलला मेंदू, फुफ्फुस किंवा हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचण्यापासून प्रतिबंधित करतात, ज्या ठिकाणचे ते गंभीर नुकसान करू शकतात.

त्यावेतिरिक्त, हवेचा बबल पुरेसा मोठा असल्यास,  ते शिरामध्ये अडकून महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा रोखू शकतात. 

जेव्हा असे होते तेव्हा रुग्णाला छातीत दुखणे, धाप लागणे, गोंधळने किंवा चेतना कमी होणे यासारखी लक्षणे जाणवू शकतात.

जर हवेचा तोच बबल फुफ्फुसात गेला. तर त्यामुळे फुफ्फुसातील एम्बोलिझम होऊ शकतो, यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. छातीत दुखू शकते आणि उपचार न केल्यास मृत्यू देखील होऊ शकतो.

दुर्मिळ प्रकरणांमध्ये जर बघतले तर, एअर एम्बोलिझम मेंदूपर्यंत जाऊ शकतो आणि ब्रेन स्ट्रोक देखील होऊ शकतो.

यामध्ये अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात. जसे कि, शरीराच्या एका भागात अशक्तपणा, सुन्नपणा, किंवा अस्पष्ट बोलणे यांचा समावेश होतो.

यावर प्रतिबंध काय असू शकतात?

इंजेक्शन दरम्यानच एअर एम्बोलिझम रोखणे तुलनेने सोपे आहे. डॉक्टरांना इंजेक्शन देण्यापूर्वी सिरिंजमधून कोणतेही हवेचे बुडबुडे काढून टाकण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

हवेतील बुडबुडे रक्तप्रवाहात जाण्यापासून रोखण्यासाठी ते फिल्टर सारखी विशेष उपकरणे देखील वापरू शकतात.

जर एअर एम्बोलिझम उद्भवलाच, तर पहिली स्टेप म्हणजे इंजेक्शन ताबडतोब थांबवणे. जर हवेचा बुडबुडा मोठ्या प्रमाणात शरीरात गेलेला असेल, तर रुग्णाला अतिरिक्त उपचारांची आवश्यकता असू शकते. 

यामध्ये ऑक्सिजन थेरपी, रक्तदाब स्थिर करण्यासाठी औषधांचा समावेश असतो. किंवा बबल काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया देखील आहेत.

तसे घाबरण्याचे काही एक कारण नाही, शक्यतो असा प्रकार घडतच नाही, कारण तुमच्या वर ट्रेंटमेन्ट करणारा एक डॉक्टर असतो.! 

हि माहिती तुम्हाला कशी वाटली. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.!


  • सागर राऊत

हे वाचलंत का ? –

Leave a Comment