झुरळ मारण्यासाठी घरगुती उपाय

झुरळ मारण्यासाठी घरगुती उपाय

झुरळांमुळे जवळपास घरात सर्वच लोक त्रस्त झालेले असतात, उन्हाळ्यात त्यांची तर दहशत आणखीच वाढलेली असते. झुरळांना पळवून लावण्यासाठी लोक विविध उपाय करतात, परंतु त्यापैकी बहुतेक उपाय निरर्थ ठरतात.

अश्यातच, बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक औषधांचा वापर करणे देखील आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध झालेले आहे.

त्यामुळेच आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही झुरळांपासून कायमची मुक्ती मिळवू शकता. चला तर त्याबद्दल जाणून घेऊया.!

१) तमालपत्राचा वापर करा.

झुरळांना घराबाहेर काढण्यासाठी तमालपत्र म्हणजेच तेजपत्याचा वापर करा. हे खूप प्रभावी मानले जाते. वास्तविक, बघता झुरळांना तमालपत्राचा वास आवडत नाही. म्हणूनच काही तमालपत्र चिरून टाका आणि जिथे झुरळे असतील तिथे ठेवा. तीव्र वासामुळे झुरळ तिथून पळ काढतील.

२) कडुलिंबाच्या पानांचा वापर करा.

कडुलिंबाचे अनेक फायदे तुम्ही ऐकलेच असतीलच यात काही शंका नाही. परंतु याचा वापर कीटक मारण्यासाठी आणि त्यांना पळवून लावण्यासाठी देखील केला जातो. कारण कि, कडुलिंबाच्या पानांमध्ये वोलेटाइल घटक असतात, ज्यामुळे कीटक पळून जातात. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून झुरळांच्या जागेवर त्या पाण्याला शिंपडा, त्यामुळे झुरळे नक्की पळून जातील.

३) लवंग चा वापर करा.

लवंगाचा वापर प्रत्येक स्वयंपाकघरात चव वाढवण्यासाठी केला जात असला, तरी लवंगाचा वास झुरळांना घालवण्यासाठीही खूप प्रभावी मानला जातो. ३ ते ४ लवंगा घराच्या कानाकोपऱ्यात, फ्रीज, किचन अलमिरा अशा ठिकाणी ठेवा, झुरळ त्यांच्या जवळ फिरकणार सुद्धा नाहीत.

४) बेकिंग सोडा वापरा.

जर घरात झुरळे जास्त झालेले असतील, तर त्यांना दूर पळवून लावण्यासाठी किचनमध्ये ठेवलेला बेकिंग सोडा तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. याकरिता, एक चमचा बेकिंग सोडामध्ये अर्धा चमचा साखर मिसळून झुरळ ज्या जमिनीच्या भेगेतून आत येतात त्याच्या आत टाका. असे केल्याने सर्व झुरळे साखरेकडे आकर्षित होतील आणि बेकिंग सोडा खाल्ल्यानंतर मरतील.


हे वाचलंत का ? –

Share