भारतातील सर्वात विषारी साप.! यांच्यामुळं बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो.

सापांची माहिती – Snake Information

साप म्हणताच अंगाला काटा येतो. जेव्हा तो आपल्याला प्रत्येक्षात दिसतो, तेव्हा आपण पळ काढतो.

पण सर्वच साप विषारी असतात का…..?

यांची शहानिशा करण्याआधीच आपण दूरवर पळून गेलेलो असतो. सर्वच साप विषारी नसतात. भारतात अशे काही प्रमानातच साप आहे, की ज्याच्या चावल्याने माणसाचा मृत्यू होतो….तर चला अश्या काही सापांची माहिती घेऊया.

(विषारी सापाची माहिती)

१) इंडियन कोब्रा, स्पेक्ट्रम कोब्रा (Indian cobra)– नाग

भारतातील-सर्वात-विषारी-साप
 • भारतातील सर्वात विषारी साप…! यांच्यामुळं बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो.
 • इंडियन कोब्रा याला आपण नाग म्हणून पण ओळखतो.
 • हा साप भारतात कुठे पण आढळू शकतो. जसे की ग्रामीण भागात, जंगलात, शेतामध्ये व शहरात सुद्धा.
 • तसेच हा साप पाकिस्तान, नेपाळ व बांग्लादेश ला सुध्दा आढळतो.
 • नाज प्रजातीचे हे साप ६ फूट तर कधी कधी यांच्या मध्ये १० फूटा पर्यत पण आढळतात.
 • यांच्या समोर कोणी येताच, हे आपलं शरीर जमिनीपासून थोडं वर घेतात. म्हणजे फना काढून आक्रमक पवित्रा घेतात.
 • हा साप खूप विषारी असून हा जीवघेणा साप म्हणून ओळखला जातो.
 • भारता मधील नागांना फण्याच्या मागील बाजूला १० चा आकडा असतो. तर काही नागांना शून्याचा आकडा असतो.
 • नाग अनेक रंगात आढळतात. काळा रंगचा व तपकिरी रंगाचा नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात. त्या दातांना बारीक शिद्र असतात, त्यामधून ते विष सोडतात.
 • नागाचे बेडूक, उंदीर, सरडे, व इतर छोटे प्राणी व पक्षी हे मुख्य खाद्य आहे.
 • नाग शिकार करताना, आपल्या विषाचा शिकार वर उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बघतो. व भक्ष्य मेल्यानंतर किव्हा अर्धमेले असताना. नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पूर्णपणे गिळंकृत करतो.
 • नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात देतो. व अंड्यातून पिल्ले बाहेर येईपर्यंत तेथे पहारा देतो.

भारतात नागा बद्दल असलेले गैरसमज खालील प्रमाणे:-

 • वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नसल्याकारणाने नाग दूध पीत नाही.
 • सापांना कान नसतात. त्यामुळे गारुडी काय वाजवतोय हे नागाला काहीच कळत नाही. गारुडी पुंगी घेउन स्वतः हालचाल करीत असतो. व त्या हालचालीला नाग फक्त प्रतिसाद देतो. नाग गारुड्याच्या पुंगीपुढे डोलतो हे साफ खोट आहे.
 • नागिणीला किव्हा नागाला मारले तर नाग/ नागीण त्याचा सूड घेतो. हे पण एक गैरसमज आहे.
 • अजून एक गैरसमज जो भारतीय चित्रपटात दाखवला जातो, की नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो.

२) भारतीय क्रेट, कॉमन क्रेट (Common krait)– मण्यार

manyar
 • याला मराठी मध्ये मण्यार असे म्हणतात.
 • हा बंगारस जातीचा विषारी साप आहे. मण्यारच्या काही उपजाती आहेत. जसे की साधा मण्यार (अथवा मण्यार), पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. भारतात या सापाच्या चावल्याने मृत्यू चे प्रमाण जास्त आहे.
 • साधारण याची लांबी ३फूट आहे, परंतु हा ५ फूट पर्यत वाढू शकतो. डोळे लहान असून याचा रंग काळा किंव्हा निळा असतो. तसेच मण्यार चा रंग पोलादी निळा असून त्याच्या अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात.
 • नर प्रजाती खूप लांब असते. या सापांची शेपटी लहान व गोलाकार असते. मण्यार अन्नाच्या व गारव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना आढळतात.
 • मण्यारचे विष हे नागाप्रमाणेच विषारी असते. मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना खूप आढळतात.
 • मण्यार चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक आहे. मण्यार चावल्याचे कधी-कधी लक्षात येत नाही.

मण्यार चवल्यावरची काही लक्षणे खालील प्रमाणे आहे:-

१) खूप तहान लागते.

२) पोटदुखी सुरू होते.

३) श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

 • मण्यारचे खाद्य हे उंदीर, पाली व सरडे तसेच इतर छोटे साप व बेडूक इत्यादी आहेत.
 • हा साप नेपाळ, पाकिस्तान तसेच अफगाणिस्तान या ठिकाणी सुध्दा आढळतो.

३) रसेल वाइपर (Russell’s viper) – घोणस

ghonas

Image Source – fundabook.com

 • भारतातील सर्वात विषारी साप…! यांच्यामुळं बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो.
 • मराठी मध्ये या सापाला घोणस असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव डाबोया (Daboia russelii) आहे.
 • हा साप भारतात तसेच आशिया खंडात बऱ्याच ठिकाणी आढळतो. हा साप पण जास्त विषारी वर्गात वळतो.
 • या सापामुळे पण भरपूर लोकांना आपला जीव गमवावा लागतो. हा पण भारतातील सर्वात विषारी साप आहे.
 • याच्या शरीरावर मोठमोठे ठिपके असतात. याच डोकं सपाट तर मानी पासून अलग असते. या सापाची डोके माने पासून तंतोतंत त्रिकोणी आणि वेगळे आहे.
 • हा साप व्हेंटर पांढरा, तसेच पांढरा, पिवळसर किंवा गुलाबी रंगाचा असतो. आणि त्यावर बर्‍याचदा काळ्या डागांवर अनियमित विखुरलेले असते.
 • याची लांबी साधारण ५ ते ६ फूट असते . हा साप खूप सुस्त असतो.
 • डाबोइया हा एक अति विषारी साप आहे, ज्यामुळे सर्व विषारी सापांपेक्षा सर्वात जास्त लोकांना सर्पदंशाच्या घटना घडतात. आणि लोकांचे मृत्यू पण होतात. याचे कारण की हा सापची जास्त आक्रमक वागणूक आणि अत्यंत लोकसंख्या असलेल्या भागात वावरणे हे होय.
 • हा साप बहुतेक मोकळ्या, गवताळ किंवा झुडुपे असलेल्या भागात आढळतो. रसेली साप हा थंड हवामानात राहतो. आणि हा साप दिवसा अधिक सक्रिय असतो.
 • हा साप चीन, पाकिस्तान, म्यानमार तसेच श्रीलंका येत सुध्दा आढळतो.

४) सॉ स्केल्ड वायपर (Saw-scaled viper)-फुरस

Saw-scaled-viper

Image Source – britannica.com

 • हि एक विषारी सापाची प्रजाती आहे, जी मध्य पूर्व आणि मध्य आशियाच्या भागात काही ठिकाणी आढळते.
 • या सापाला मराठी मध्ये फुरस तर हिंदी मध्ये अफई असे म्हणतात.
 • या सापाच्या चावल्याने पण बरेच लोकांचा मृत्यू होतो.
 • या सापाची लांबी ४० ते ८० सेमी च्या दरम्यात असते. साधारण हा साप ६० सेमी इतकाच आढळतो. आणि याचे डोके गळ्यापासून वेगळे असते.
 • हे साप साधारणता दिवसाला दिसत नाही. रेती असेल तर हा स्वतःला त्यात लपवतो. आणि डोके बाहेर काढून ठेवतो.
 • हा साप सर्वात जास्त रात्रीला दिसतो.

५) किंग कोब्रा (King Cobra)

king-cobra

Image Source – jagaran.com

 • हा साप अति विषारी प्रजातीत वळतो. जगातला हा सर्वात लांब विषारी साप आहे.
 • ईलापिडे कुटुंबातील एक विषारी सर्प असून तो दक्षिणपूर्व आशियाद्वारे भारतातील जंगलांमध्ये स्थानिक आहे.
 • हा साप १० ते १३ फूट लांब असतो.हा साप १००मीटर पर्यंतची शिकार आपल्या रासायनिक व काटेरी जिभिने शोधतो.
 • किंग कोब्राला आक्रमक मानले जात नाही. त्याला त्रास झाल्यावरच तो आक्रमक बनतो, तो जेव्हा भयभीत होतो, तेव्हा तो त्याच्या शरीराचा पुढील भाग वाढवितो. आणि उभा होतो, तसेच तो स्वतःचा फणा वाढवितो, सोबत हिससस असा मोठ्याने आवाज करतो. चावताना त्याची पकड आठ मिनिटांपर्यंत कायम राहते.
 • जवळ येणाऱ्या वस्तू किंवा अचानक हालचालींमुळे हे सहजपणे चिडचिडे होऊ शकतात. त्याचे शरीर वाढवताना, किंग कोब्रा लांब पल्ल्यांसह हल्ला करण्यास पुढे जाऊ शकतो. हा साप एकाच हल्ल्यात एकपेक्षा जास्त चावा घेऊ शकतो.
 • हा पूर्ण शिकार गिळंकृत करतो. हा साप अन्य सापाची तशेच पाल, सरडा व उंदीर याची शिकार करतो.
 • या सापाची माहिती पौराणिक कथा मध्ये पण आढळते.
 • हा साप भारत तसेच श्रीलंकेत आढळतो.

६) मलबार पिट वायपर (Malabar pit viper)

Malabar-Pit-Viper-1

Image Source – sustain.round.glass

 • हा विषारी साप दक्षिण पश्चिम भारतात आढळतो. म्हणजेच गोवा, कर्नाटक या दिशेला.
 • हा साप डोंगर, नाल्यात, तसेच सदाहरित पाने गाळलेल्या जंगलात आढळतो.
 • पिवळा, तपकिरी आणि हिरव्या अश्या भिन्न रंगात हा आढळू शकतो.
 • हा १०३ सेमी लांबीचा आढळून येतो.
 • मलबार पिट व्हाइपर रात्रीचा आणि सामान्यत: दिवसा निष्क्रिय असतो, हा साप कधीकधी ओढ्यांजवळील खडकांवर किंवा झाडांवर टोपली मारताना दिसतो.
 • पावसाळ्याच्या महिन्यात याचा जास्त त्रास होतो. बेडूक, सरडे, पक्षी, कस्तुरी, उंदीर आणि इतर लहान प्राणी शिकार करून हा जगतो.
 • टी. मालाबेरिकस हळू चालणारा साप आहे, परंतु वेगवान स्ट्राइक करण्यास तो सक्षम आहे. त्याच्या विषामुळे मनुष्यांना मध्यम वेदना आणि सूज येते. एक किंवा दोन दिवसात ही लक्षणे कमी होतात.

सापाचे प्रकार

भारतात तसेच महाराष्ट्र राज्यात आढळणारे विषारी साप

 • नाग (The snake)
 • नागराज (King Cobra)
 • मण्यार (Manyar or Maner)
 • घोणस (Daboia)
 • फुरसे (Saw-scaled viper or Leisure)
 • समुद्री साप (The sea snake)
 • पोवळा (Powder)
 • पट्टेरी पोवळा (Patteri cobra)
 • चापडा (Bamboo pit viper)

भारतात तसेच महाराष्ट्र राज्यात आढळणारे बिनविषारी साप

 • अजगर (Rock Python or Dragon)
 • धामण (Common rat snake)
 • तस्कर (trinket)
 • गवत्या (Lead Keelback)
 • पाणसाप (Water snake)
 • वाळा सर्प (hairy snake)
 • हरणटोळ (Green Vine Snake )
 • दिवड (Virola or Irula)
 • नानेटी (striped keelback)
 • मांडोळ (Earth Boa or Red Sand Boa)
 • कवड्या (Common Wolf Snake)
 • खापरखवल्या

सापांची माहिती (snake information in marathi)

snake-information-in-marathi

image source – Wikipedia

(फोटो मध्ये साप चावल्यावर आढळणारे लक्षणे दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सापांकडून चावल्या जाणा-या लक्षणांमधे मोठ्या प्रमाणात फरक आढळतो.)

सापाला त्रास दिल्या शिवाय किंवा जखमी झाल्याशिवाय बहुतेक साप इतरांपासून संपर्क टाळण्यास प्राधान्य देतात आणि साप मानवावर सामान्यपणे हल्ला करत नाही. बिन विषारी (nonvenomous snake) साप हा मानवांसाठी धोका नसतो.

त्यांचे दात खोल जखम किंवा त्रास देण्यासाठी नसतात, तर त्याऐवजी ते आपली शिकार जसे कि बेडूक, उंदीर पकडून आणि धरून ठेवण्या करिता असतात. बिन विषारी सापाच्या चाव्याव्दारे संसर्ग आणि ऊतींचे नुकसान होण्याची शक्यता असली तरीही, विषारी साप मानवांसाठी जास्त धोकादायक असतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) यादी नुसार सापाच्या चाव्याव्दारे होणारे मृत्यू असामान्य आहेत. विषारी सापांकडून चाव्यामुळे एखाद्या अवयवाचे किंवा त्याच्या अवस्थेचे अवयव काढून टाकण्याची गरज भासू शकते.

जगभरातील विषारी सापांच्या अंदाजे 725 प्रजातींपैकी केवळ 250 प्रजातींच अशी आहे जयच्या एक चाव्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

भारतात एकाच वर्षात २,५०,००० सर्पदंशांची नोंद झाली आहे आणि जवळजवळ ५०,००० प्रारंभिक मृत्यूची नोंद झाली आहे. डब्ल्यूएचओचा असा अंदाज आहे, की सापाच्या चाव्याव्दारे दर वर्षी १००,००० लोक मरतात आणि सर्पदंशामुळे वर्षाकाठी जवळपास तीन पट लोकांना सॅप चावल्याने अपंगत्व येते.

सर्पदंश उपचारात सर्वात सामान्य आणि प्रभावी पद्धत म्हणजे अँटीवेनॉम (antivenom) किंवा अँटीवेनिन (antivenin) जो सापाच्या विषापासून बनलेला सीरम आहे.

काही अँटीवेनोम प्रजाती-विशिष्ट (मोनोव्हॅलेंट) असतात तर काही प्रजाती लक्षात घेऊन (पॉलीव्हॅलेंट) वापरण्यासाठी तयार केली जातात. उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये कोरल साप वगळता सर्व प्रकारच्या विषारी साप पिट व्हिपर आहेत.

अँटीवेनॉम तयार करण्यासाठी, रॅटलस्केक्स, कॉपरहेड्स आणि कॉटनमथ्सच्या वेगवेगळ्या प्रजातींच्या विषाणूंचे मिश्रण हे घोडाचे लसीकरण होईपर्यंत डोसमध्ये घोडाच्या शरीरात इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर लसीकरण केलेल्या घोड्यांमधून रक्त काढले जाते. त्यानंतर सीरम वेगळा केला जातो आणि पुढे त्या सीरम ला शुद्ध करून फ्रीज मध्ये गोठविला जातो.

हे निर्जंतुकीकरण पाण्याने पुनर्रचना केली जाते आणि अँटीवेनोम तयार केले जाते. अधिक धोकादायक प्रजातींसाठी अँटिवेनॉम जसे की माम्बास ( mambas), तैपन्स (taipans) आणि कोब्रा (cobras) याच पद्धतीने भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सीरम तयार केले जातात.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत. धन्यवाद..!

 • सागर राऊत

हे वाचलंत का? –

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

2 thoughts on “भारतातील सर्वात विषारी साप.! यांच्यामुळं बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो.”

 1. सुंदर माहिती अशीच माहिती देऊन निसर्गाची ओळख करून द्या दादा उत्तम

  Reply

Leave a Comment