आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग चा विस्तार हा खूप वेगाने होत आहे, यामुळे आज मोठ्या कंपन्या आपले उत्पादन व सर्विस Promote करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग चा उपयोग करीत आहेत.
हा एक मार्केटिंग चा आधुनिक प्रकार आहे. आपल्या व्यवसायाला मोठे करण्याचा आणि आपल्या प्रॉडक्ट ची brand Value वाढवण्याचा. याकरिता आज बरेच व्यवसाय त्यांच्या व्यवसायची वेबसाईट तयार करतात.
जेव्हा कोणतीही कंपनी कोणते नवीन प्रोडक्ट बाजारात आणते, त्यानंतर त्या प्रोडक्ट ला यशस्वी करण्यासाठी महत्वाची राहते, ते त्या प्रोडक्ट ची मार्केटिंग; कारण मार्केटिंग एकमेव गोष्ट आहे. ज्यामुळे तुमचे प्रोडक्ट हे जास्तीत जास्त ग्राहका पर्यंत खूप कमी वेळेत पोहचवू शकतो.
हे वाचलंत का? – * फ्रीलांसिंग म्हणजे काय? फ्रीलांसिंग मधून पैसे कसे कमवायचे? * ॲमेझॉन वर आपले प्रॉडक्ट कसे विकायचे? |
आधी काही मोठ्या कंपनी आपल्या प्रोडक्ट ची मार्केटिंग करण्याकरिता TV, Newspaper, Radio, Poster, यासारख्या माध्यमांचा वापर करीत होत्या. आणि काही कंपनी त्यांच्या प्रोडक्ट ची माहिती ही घरी जाऊन पण करत होत्या, (सध्या पण हि पद्दत आहेच) पण आजकाल खूप मोठे बदल झाल्यामुळे जाहिरातीचे माध्यम सुध्दा बदलले आहे.
तंत्रज्ञानाच्या या जगात मार्केटिंग करण्यासाठी इंटरनेट हे खूप मोठे माध्यम झाले आहे. छोट्या व मोठ्या कंपनी आता मार्केटिंग करण्याकरिता इंटरनेट चा वापर करत आहेत. ज्याला आपण Digital marketing असे म्हणतो.
google adwords in digital marketing
Digital Marketing in Marathi
आज खूप मोठ्या प्रमाणात लोक इंटरनेट चा वापर करीत आहेत आणि हा आकडा दिवसेन दिवस वाढत चाललेला आहे. याचमुळे आज डिजिटल मार्केटिंग चा सुद्धा विस्तार होत आहे.
आपल्या देशात सुद्धा डिजिटल मार्केटिंग खूप वेगाने पुढे जात आहे. ज्यावेळी आपल्या देशात इंटरनेट हे स्वस्त झाले, तेव्हा पासून इंटरनेट वापरणारे लोक वाढले आहेत. जगामध्ये सर्वात जास्त इंटरनेट वापरण्यात भारताचा दुसऱ्या क्रमांकावर येतो. चला तर बघूया डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?- Digital Marketing in Marathi
Digital marketing हा दोन शब्दांनी तयार झालेला शब्द आहे. डिजिटल म्हणजे इंटरनेट आणि मार्केटिंग म्हटलं म्हणचे बाजार.
आपण कोणत्याही सर्विस किंवा प्रोडक्ट ला डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये विकण्याचा प्रयत्न करतो व त्याची जाहिरात करतो. याच प्रक्रियेला डिजिटल मार्केटिंग तसेच ऑनलाईन मार्केटिंग असे म्हणतात.
ऑनलाइन मार्केटिंग करण्याचे खूप प्रकार आहेत आणि हे प्रकार वेळेनुसार वाढत जात आहेत. ऑफलाईन मार्केटिंग आणि ऑनलाईन मार्केटिंग मध्ये खूप फरक आहे.
कारण ऑनलाईन मार्केटिंग मध्ये तुम्हाला ज्या ग्राहक वर्गाला आपली जाहिरात दाखवायची आहे, त्यांना तुम्ही टार्गेट करू शकता. डिजिटल मार्केटिंग हा खूप वेगवान रस्ता आहे. जो कोणत्याही प्रोडक्ट किंवा सर्विस ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा.
मोठ्या मोठ्या कंपन्या आज आपल्या उत्पादनाला ऑनलाइन प्रोमोट करीत आहेत, त्याकरीता या कंपन्या लाखो रुपये खर्च करीत आहेत आणि त्यांना याचा फायदा सुद्धा होत आहे. याचे एकमेव कारण आहे इंटरनेट वर लोक घालवत असलेला वेळ.
आज एक सामान्य व्यक्ती इंटरनेट वर दिवसातील कमीत कमी 3 तास घालवत आहे. याचं कारणामूळे इंटरनेट आज खूप मोठे मार्केट प्लेस झाले आहे.
- हे वाचा – शेअर मार्केट म्हणजे काय?
डिजिटल मार्केटिंग महत्वाचे आहे का?
आपल्या सर्वांना माहीत आहे. मार्केटिंग ही कोणत्याही कंपनी साठी किती महत्वाची बाब आहे. तुम्ही तयार केलेले उत्पादन लोकांना माहिती होण्याकरिता त्याची मार्केटिंग करणे खूप आवश्यक आहे. मार्केटिंग करीता कंपनीचे एक वेगळे बजेट राहते. आजच्या काळात ऑफलाइन मार्केटिंग करणे खूप महाग झाले आहे. त्याच तुलनेत ऑनलाइन मार्केटिंग स्वस्त आणि लाभदायक होत आहे.
चला तर बघूया डिजिटल मार्केटिंग का महत्वाचे आहे..!
1) डिजिटल मार्केटिंग हा एक सरळ सोप्पा आणि वेगवान मार्ग आहे कोणत्याही उत्पादनाला किंवा सर्विस ला ग्राहकांना पर्यंत पोहचवण्यासाठी.
2) डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी आपल्या मनाने ठरवता येतात जसे की, आपल्याला कोणत्या वयाचा ग्राहक टार्गेट करायचा आहे.
3) आपल्या उत्पादनाची मार्केटिंग करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग मध्ये आपल्याला खूप मार्ग आहेत
4) तुमच्या व्यवसाय हा डिजिटल प्लॅटफॉर्म वर असेल तर तुमच्या व्यवसायाची brand value वाढण्यास मदत होते.
5) डिजिटल मार्केटिंग हा एक असा मार्ग आहे ज्याने तुम्ही तुमचे उत्पादन जगात कुठेही प्रोमोट करू शकता व विकू शकता.
डिजिटल मार्केटिंग कशी करावी ? how to use digital marketing
Digital Marketing in Marathi
digital marketing information in marathi
डिजिटल मार्केटिंग चे प्रकार – Types of Digital marketing in marathi
Blogger :-
डिजिटल मार्केटिंग मध्ये पाय ठेवण्यासाठी एक खूप चांगला व सोपा मार्ग आहे Blogger.com तुम्ही या वर मोफत काम चालू करू शकता. खूप लोकांनी आधी ब्लॉग चालू करून नंतर ते हळू हळू त्यावर डिजिटल मार्केटिंग करू लागले आणि आज ते डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट झाले आहेत.
Search Engine Optimization (SEO) :-
जर तुम्हाला search engine च्या साहाय्याने तुमच्या ब्लॉग व वेबसाईटवर Traffic म्हणजेच ग्राहक आणायचे असतील, तर तुम्हाला SEO ची माहिती असणे आवश्यक आहे. खूप व्यवसाय त्यांच्या वेबसाईट च्या SEO साठी लाखो रुपये खर्च करतात. तुम्ही जर एक SEO एक्सपर्ट असाल, तर तुम्ही लाखो रुपय कमवू शकता.
YouTube Channel :-
YouTube हे आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचे search engine आहे. याचा अर्थ असा की you tube वर traffic खूप आहे. YouTube हे एक असे माध्यम आहे जिथं तुम्ही विडिओ द्वारे आपले प्रोडक्ट किंवा सर्विस प्रोमोट करू शकता.
आज खूप व्यवसाय त्यांच्या प्रोडक्ट च्या बद्दल माहिती देण्याकरिता मोठ्या मोठ्या youtuber ला पैसे देतात व आपल्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग करून घेतात.
जर तुम्हाला चांगले व्हिडिओ तयार करता येत असतील, तर तुम्ही तुमचे प्रोडक्ट YouTube वर विडिओ द्वारे माहिती देऊन मार्केटिंग करू शकता. किव्हा दुसऱ्याचे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या YouTube चॅनेल वर प्रमोट करू शकता.
Google AdWords :-
तुम्ही जेव्हा कोणत्या वेबसाईटवर काही पाहता किंवा वाचता. तेव्हा तिथं तुम्हाला काही जाहिराती दिसतात. तुम्हाला माहीत आहे? यामधील जास्तीत जास्त जाहिराती ह्या गुगल द्वारे दाखवल्या जातात. या करिता गूगल ची एक सेवा आहे google adword
ज्याचा मदतीने तुम्ही तुमच्या प्रोडक्ट ची मार्केटिंग करू शकता. ही एक Paid सर्विस आहे. याकरिता तुम्हाला पैसे द्यावे लागतात परंतु ते खूप स्वस्त आहे. तुम्ही यावर जाहिरात देऊन आपल्या टार्गेटेड ग्राहकांन पर्यंत पोहचवू शकता.
Google Adwords च्या मदतीने तुम्ही या प्रकारच्या जाहिराती देऊ शकता.
• Display advertising
• Text ads
• Image ads
• Gif ads
• Text and image ads
• Match content ads
• Video ads
• Pop-up ads
• Sponsored search etc
Apps Marketing :-
आज ज्या वेबसाईट आहेत त्यांचे जवळ जवळ सर्वांचे अँप google play store वर उपलब्द्ध आहेत. कारण या डिजिटल युगात सर्वांन जवळ मोबाईल आहेत आणि खूप लोकांना वेबसाईटवर जाण्यापेक्षा अँप वापरने आवडते. खूप लोक Shopping, money transfer, online Booking, news and social media चे अँप वापराने जास्त पसंत करतात. यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायाचे अँप तयार करून तुमचे प्रोडक्ट प्रोमोट करू शकता व डिजिटल मार्केटिंग करू शकता.
Email Marketing :-
सध्याच्या युगात ई-मेल मार्केटिंग खूप महत्वाचे आहे, कारण आपल्या ज्या ऑफर किंवा डिस्काउंट आहेत. ते तुम्ही ग्राहकाला डायरेक्ट मेल करून सांगू शकता आणि मेल द्वारेच तुम्ही ग्राहकांन जवळून feedback सुद्धा घेऊ शकता.
डिजिटल मार्केटिंग करण्याचे खूप प्रकार आहेत. आपल्याला फक्त त्याच प्रकारा वर काम करायचे आहे. ज्यामध्ये ट्रॅफिक जास्त आहे. जिथं जास्त ट्रॅफिक राहणार तिथं जास्त लोक तुमच्या प्रोडक्ट ला पाहणार आणि आपले प्रोडक्ट तितक्याच मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणार.
(डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईट चा सुद्धा वापर करू शकता. तुमचे प्रोडक्ट महिन्याला खूप लोकं पर्यंत कमी दरात पोहचवू शकता. तसेच तुम्ही MahitiLake Magazine चा वापर करून सुद्धा आपल्या प्रोडक्ट ची जाहिरात करू शकता. माहिती लेक च्या माध्यमातून जाहिरात करण्याकरिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.)
- धिरज तायडे
डिजिटल मार्केटिंग बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
Q.1 – डिजिटल मार्केटिंग मध्ये काय करावे लागते?
Ans – डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट च्या साह्याने मोबाईल फोनच्या माध्यमातून, तसेच कोणत्याही डिजिटल माध्यमाच्या साह्याने जाहिराती करणे किव्हा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेटवर उत्पादने किंवा सेवांचे मार्केटिंग करणे होय.
Q.2 – डिजिटल मार्केटिंगचे प्रकार कोणते आहेत?
Ans –
(i) सर्च इंजन औप्टीमाइज़ेषन (SEO )
(ii) सोशल मीडिया (Social Media)
(iii) ईमेल मार्केटिंग (Email Marketing)
(iv) यूट्यूब चेनल (YouTube Channel)
(v) अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)
(vi) पे पर क्लिक ऐडवर्टाइज़िंग किव्हा PPC marketing
Q.3 – 12वी नंतर डिजिटल मार्केटिंग कोर्स करू शकतो का?
Ans – होय, अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये डिजिटल मार्केटिंगचा अभ्यासही सुरू झाला आहे. याद्वारे तुम्हीही 12वी नंतर डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करून चांगले पैसे कमवू शकता.
Q.4 – ऑनलाइन मार्केटिंगमधून पैसे कसे कमवायचे?
Ans – डिजिटल मार्केटिंगमधून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत, जसे की एफिलिएट मार्केटिंग, वेबसाइट आणि अँप डेव्हलपमेंट, फेसबुक, यूट्यूब, Google ads, कंटेंट मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, स्टॉक फोटोग्राफी सेलिंग, लोगो डिझाइनिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन इ. या पद्धतींच्या मदतीने तुम्ही डिजिटल मार्केटिंगमधून सहज पैसे कमवू शकता.
Q.5 – डिजिटल मार्केटिंग कसे सुरू करावे?
Ans – डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी Quality Content महत्त्वाची आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये, ब्रँड अवेरनेस, लीड्स, वेबसाइट ट्रॅफिक आणि कोणत्याही कंपनीची विक्री वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे डिजिटल चॅनेल वापरले जातात. यामध्ये तुम्ही सुरुवात करू शकता.
Q.6 – नेटवर्क मार्केटिंग योग्य आहे का?
Ans – या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही कठोर परिश्रम करून ३ ते ४ वर्षात आर्थिक स्वावलंबन मिळवू शकता. नेटवर्क मार्केटिंग सिस्टीमची जादू अशी आहे की तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे कमवू शकता. ते देखील आपल्या निश्चित वेळेनुसार.
Q.7 – नेटवर्क मार्केटिंगचे तोटे काय आहेत?
Ans – नेटवर्क मार्केटिंगबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रकारची चुकीची माहिती आणि शंका आहेत, ज्यामुळे त्यांना या व्यवसायापासून दूर राहणे आवडते. काही लोक चुकीच्या कंपन्यांच्या चक्रात अडकतात, त्यानंतर ते चांगल्या कंपन्यांना फसवणूक समजतात आणि या व्यवसायापासून दूर जातात. तसेच काही कंपन्या या फ्रॉड असतात. आपण त्यांची योग्य माहिती घेऊनच त्यांचे प्रॉडक्ट प्रमोट केले पाहिजे.
Q.8 – डिजिटल मार्केटिंगचा कोर्स कसा असतो?
Ans – डिजिटल मार्केटिंग कोर्स दरम्यान, तुम्हाला व्हिडिओद्वारे सर्व काही शिकवले जाते. प्रत्येक ट्यूटोरियल संपल्यानंतर, तुम्हाला त्या व्हिडिओमधून काही प्रश्न विचारले जातात. जेव्हा तुम्ही तुमच्या कोर्स पूर्ण करता, तेव्हा तुमची फायनल एक्साम घेतली जाते. ज्यामध्ये तुम्हाला पास व्हायचे असते.
Q.9 – डिजिटल मार्केटिंग मोफत कसे शिकायचे?
Ans – डिजिटल मार्केटिंग हे अभ्यासक्रम जास्तीत जास्त 1 – 40 तासांच्या कालावधीत पूर्ण केले जाऊ शकतात. Google त्याच्या लर्निंग पोर्टल वर डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रम आणि सर्टिफिकेट मोफत देत आहे. या ऑनलाइन कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेऊन तुम्ही फ्री मध्ये ट्यूटोरियल आणि ऑनलाइन क्लासेसमध्ये प्रवेश मिळवू शकता.
Q.10 – डिजिटल मार्केटिंगसाठी कोणती पात्रता आवश्यक आहेत?
Ans – डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करण्यासाठी कोणत्याही विशेष पात्रतेची आवश्यकता नाही. तुम्ही 12वी किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग कोर्ससाठी पात्र आहात. आजकाल अनेक संस्थांमध्ये डिजिटल मार्केटिंगचे अभ्यासक्रम चालवले जात आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर त्या कॉलेजमधून डिजिटल मार्केटिंग कोर्स करू शकता.
🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.