Solar Rooftop Subsidy Scheme Yojana: केंद्र सरकार सौर ऊर्जा (सोलर एनर्जी) ला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे, अक्षय ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना सौर रूफटॉप बसविण्यावर सुबसिडी देण्यासाठी केंद्र सरकारने सौर रूफटॉप सबसिडी योजना सुरू केली आहे.
आज, आपण या आर्टिकल च्या माध्यमातून, सोलर रूफटॉप सबसिडी योजना संबंधित सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहोत. जसे की सोलर लावण्याचे फायदे, सोलर चे वैशिष्ट्ये, सोलर लावण्यासाठी पात्रता, उद्देश, सोलर साठी अर्ज प्रक्रिया, त्यासाठी लागणारे महत्त्वाची कागदपत्रे इ. स्पष्ट करणार आहोत.
या योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी, तुम्हाला हे आर्टिकल शेवटपर्यंत सविस्तर वाचावा लागेल. चला तर बघूया.!
सरकार कडून सौर रूफटॉप सबसिडी योजनेला प्रोत्साहन दिले जात आहे. हे तर आपल्याला माहिती असेलच, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला आपले ऑफिस, कारखाने, आपल्या घरी आदींच्या छतावर सोलर पॅनल बसविण्याची सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही योजना ग्राहकांना सौर रूफटॉप इंस्टॉलेशन वर सबसिडी देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत, कोणताही नागरिक त्यांच्या छतावर सौर पॅनेल बसवू शकतो. या योजनेत 1 kw (किलोवॅट) सोलर पॅनेल बसवण्यासाठी 100 (sq meter) चौरस मीटर जागा आवश्यक आहे. आणि या सोलर पॅनलचा लाभ आपल्याला २५ वर्षांसाठी मिळणार आहे.
म्हणजेच सोलर ची वॉरंटी हि २५ वर्षाची असणार, तसेच सोलर पॅनलची लावल्यानंतर त्याची किंमत सुमारे 5-6 वर्षात वसूल केली जाते. त्यानंतर तुम्ही १९ ते २० वर्षे मोफत वीज घेऊ शकता. हि आपल्यासाठी खूप मोठी बातमी आहे.
सबसिडी योजनेअंतर्गत पात्रता (Solar Rooftop Subsidy Yojana)
ज्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल, तर त्यांना खालील पात्रता पूर्ण करावे लागतील.
इच्छुक लाभार्थी भारताचा कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
सोलर इन्स्टॉलेशनची जागा ग्राहकाच्या मालकीची असावी.
ग्राहकाचे स्वतःचा मालकीचे इलेक्ट्रिक मीटर असावे.
सबसिडी योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करावा? (Required Documents For Solar Rooftop Subsidy Yojana)
या योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी खालील गोष्टींचे पालन करावे
- अर्ज करण्यासाठी, तुम्हाला सोलर रूफटॉप सबसिडी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल.
- होम पेजवर तुम्हाला Apply For Solar Rooftop या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल
- या पृष्ठावर तुम्हाला तुमच्या राज्यानुसार अधिकृत वेबसाइट निवडावी लागेल.
- निवड केल्यानंतर, तुम्हाला ऑनलाइन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- क्लिक केल्यानंतर, नोंदणी फॉर्म तुमच्या समोर उघडेल.
- तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुम्ही सोलर रूफटॉप योजनेत अर्ज पूर्ण करू शकता.
हे वाचलंत का ? –