फॅशनच्या या जगामध्ये, बर्याच स्त्रियांना बॅक लेस कपडे घालायचे असतात, यासाठी पाठीचे टॅनिंग काढून टाकणे खूप आवश्यक आहे. या आर्टिकल मध्ये आपण तेच बघणार आहोत.

How To Remove Back Tanning : जर तुमच्या पाठीला घाण आणि काळेपणा जमा झाला असेल, तर शरीराच्या एकूण सौंदर्यावर वाईट परिणाम होतो. हिवाळा असो वा उन्हाळा, महिला आणि तरुणींना लग्न किंवा पार्ट्यांमध्ये बॅकलेस ड्रेस किंवा बॅक रिव्हलिंग ड्रेस घालणे आवडते.

जे त्यांच्या सौंदर्यात अजून भर घालते. परंतु जर तुमच्या पाठीत जास्त टॅनिंग किंवा काळेपणा असेल तर, मग या प्रकारचा पोशाख घालण्यात नक्कीच संकोच वाटतो.

पाठीचा काळेपणा कसा दूर करायचा?

१) बेसन आणि हळद पेस्ट लावा.

चेहरा सुंदर ठेवण्यासाठी तुम्ही अनेकदा बेसन आणि हळदीची पेस्ट लावली असेल. हीच टीप तुमच्या पाठीसाठीही उपयुक्त ठरू शकते. यासाठी एका भांड्यात दही आणि बेसन एकत्र करा आणि नंतर अजून त्यात थोडे दही घाला. पेस्ट तयार झाल्यावर 15 ते 20 मिनिटे पाठीवर लावा. जर तुम्ही हे नित्यनियमाने केले, तर त्याचा परिणाम आठवडाभरात तुम्हाला दिसून येईल.

२) ग्लिसरीन आणि दूध

बॉलीवूड सेलिब्रिटींप्रमाणे मऊ आणि चमकदार पणा परत येण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन आणि दुधाची मदत घेऊ शकता. यासाठी एका भांड्यात दूध घाला आणि नंतर त्यात लिंबाचा रस ग्लिसरीन मिसळा. आता पाठीवर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या. नंतर, कोमट पाण्याने धुवा आणि मऊ कापडाने स्वच्छ करा. तुम्हाला मागे नवीन चमक दिसू लागेल.

३) पपईची मदत घ्या

पपई आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते, म्हणूनच अनेक स्किन केअर उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जातो. तुम्ही पपई बारीक करून त्यात दही आणि ओट्स पावडर मिसळा. पेस्ट तयार झाल्यावर हलक्या हातांनी पाठीवर चोळा. काही वेळ ते कोरडे राहू द्या आणि शेवटी स्वच्छ पाण्याने पाठ धुऊन घ्या. असे काही दिवस केले, तर पाठीचा काळेपणा निघून जाईल.

सूचना – इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद…😊


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *