विषारी साप चावल्यानंतर ही वनस्पती उतारा म्हणूनही वापरली जाते. त्याच्या नैसर्गिक गुणधर्मांमध्ये विष निष्क्रिय करण्याची क्षमता आहे. तसेच साप पळवून लावण्यासाठी हि झाडे शेतात लावा, जाणून घ्या सविस्तर

Snake Bite Treatment

Snake Information In Marathi

Snake Bite Treatment : शेतकऱ्यांना शेतामध्ये सिंचन करतांना सापाने चावण्याची भीती खूप असते. त्यामुळे ही रोपे शेताच्या बांधावर लावा, साप शेत सोडून पळून जातील.

सर्पगंधा नावाची वनस्पती हि सापांना पळवून लावण्यासाठी नैसर्गिक मार्ग आहे. या आर्टिकल मध्ये, आपण या वनस्पतीबद्दल सविस्तर जाणून घेऊया, तसेच सापांच्या बाबतीत त्याचे गुणधर्म कसे वापरले जाऊ शकतात. ते बघूया.!

घरांमध्ये आणि विशेषत: शेतात सापांचा वावर अधिक असतो, कारण उंदीर आणि बेडूक याचे प्रमाण खूप असते. तसेच शेतामध्ये पाणी देताना शेतकऱ्यांना त्याचा चावा होण्याची भीती असते. लाकूड किंवा कोणत्याही प्रकारचा कचरा एकाच ठिकाणी जमा केल्यावर साप जन्माला येण्याची शक्यता वाढते.

तश्यातच वारूळ, सिंचनादरम्यान ते पाण्याने भरले जातात, त्यामुळे त्यामध्ये लपलेले साप बाहेर येतात, परंतु जर तुम्ही सर्पगंधाची रोपे शेताच्या कड्यांवर लावली, तर तुम्हाला सापांला सामोरे जाणे जवळजवळ अशक्य असेल.

सर्पगंधा, ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या रौवोल्फिया सर्पेन्टिना असे देखील म्हणतात. ही एक नैसर्गिक वनस्पती आहे. ज्याचा वास सापांना पळवून लावतो. त्याची पाने हिरवी व चमकदार असतात. तर मुळाचा रंग पिवळा व तपकिरी असतो. त्याचा वास इतका विचित्र असतो, की साप तो वास सहन करू शकत नाहीत आणि ते पळून जातात.

सर्पगंधाचे गुणधर्म

विषारी साप चावल्यानंतर या वनस्पतीचा उपयोग उतारा म्हणूनही केला जातो. त्याच्या नैसर्गिक गुणधर्मांमध्ये विष निष्क्रिय करण्याची क्षमता आहे. ज्यामुळे विषबाधा झालेल्या प्राण्यांचे परिणाम कमी होतात. विषाला कमी करण्यासाठी हा एक नैसर्गिक मार्ग असू शकतो.

आयुर्वेदातील सर्पगंधा

सर्पगंधा आयुर्वेदात विषारी प्राण्यांच्या उपचारासाठी वापरली जाते. चरक संहितेत या वनस्पतीचा उल्लेख विषारी प्राण्यांच्या चाव्यावर उपाय म्हणून केला आहे. त्याची पाने आणि मुळे विषारी जागेवर लावल्याने विषाचा प्रभाव कमी करता येतो.

सावधगिरी आणि सुरक्षितता

सर्पगंधा हा सापांना पळवून लावण्याचा नैसर्गिक मार्ग असला, तरी त्याचा जास्त वापर करण्यापूर्वी तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काही परिस्थितीत, या वनस्पतीची पाने आणि झाडाची साल देखील विंचू आणि कोळ्याच्या विषावर उपचार करण्यासाठी वापरली जाऊ शकते,

परंतु सर्पगंधा ही नैसर्गिक वनस्पती पावसाळ्यात सापांना पळवून लावण्यासाठी एक विशेष मार्ग मानल्या जाते. त्याचा वास सापांना दूर ठेवतो आणि त्याचे गुणधर्म विषाची प्रतिक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात.

सूचना – या वासनापतीचा वापर करण्यासाठी तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे. याची जबाबदारी माहिती लेक टीम घेत नाही. हे आर्टिकल तुम्हाला माहिती पुरवण्यासाठी आहे.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *