वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi

आपल्या आयुष्यात असलेले आपले मित्र असो वा परिवार सदस्य. यांचा वाढदिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो.

त्यांचा तो दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही काही भेटवस्तू देता तर शुभेच्छा…..
अश्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी आम्ही एक संग्रह तयार केलेला आहे.

आमचा हा छोटासा ध्यास तुम्हाला नक्कीच आवडेल!

birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

marathi-birthday-wish

marathi birthday wish

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा उंचच उंच
भरारी घेऊ दे, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊदेत,
मनात आमच्या फक्त एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे. – Happy Birthday


नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. Happy Birthday Bhau


पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा, हीच आमच्या कळून.
।वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।


जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..*


वाढदिवस ही एक नवीन सुरुवात आहे,
आणि नवीन आकांशा, धैर्य, उत्साहासोबत नवीन ध्येय गाठण्याची सुरुवात आहे.
– वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..! ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (नाव) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा


तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा..! ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


आपणास रायगडासारखी श्रीमंती, पुरंदरसारखी दिव्यता,
सिहंगडासारखी शौर्यता व सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपला जन्मदिवस आहे ‘खास’ कारण आपण राहता सर्वांच्या हृदयाच्या ‘पास’. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो, वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा


Marathi birthday wish। birthday wishes in Marathi

happy-birthday-marathi

vadhdivas shubhecha

शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी,
कधी वळून पाहिले असता, आमची शुभेछ्या स्मरावी. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!


आमचे अनेक मित्र आहेत, पण तुम्ही थोडे खास आहे. अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्या. यशस्वी हो, दीर्घायुषी हो, तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।


साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….


आजच्या या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आशा करतो की, आपण आपल्या सकारात्मकतेने, प्रेमाने आणि सुंदरतेणे इतरांचे जीवन बदलत रहाल. मनः पूर्वक शुभेच्छा.


ह्या वाढदिवसाच्या शुभक्षणी आपली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत’ आजचा हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुझ्या आधी, माझे जीवन आनंदी होते आणि जेव्हा तू आलास तेव्हा माझे जीवन अधिक आनंदी झाले….मी भाग्यवान आहे की, माझ्या आयुष्यात आपल्यासारखे एक व्यक्ती आहे. !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


वाढदिवसाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा येणारे वर्ष आपणास आनंदाचे, सुखाचे आणि भरभराटीचे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.


वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
देतो. नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसा निमित्त शुभेच्छा!


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी…
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.


तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो…
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो…
हीच मनस्वी शुभकामना.


वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | birthday wishes for friend in marathi

birthday-wishes-for-friend-in-marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.


देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय. असो…..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी!
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी!
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हाव!
हीच शुभेच्छा!


झेप अशी घ्या की, पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की, पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की, सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की, काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे.
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे.
हॅपी बर्थडे


एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे भाऊ


थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही कारण मित्र नाही तर भाऊ
आहे आपला! रक्ताचा नाही पन जिव
आहे आपला! भाऊ तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.!


बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा.


आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि, आपली सर्व स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.


आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!


प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!


आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील, काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील , तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!


केला तो नाद झाली ती हवा…
कडक रे भावा तुच आहे छावा…
भावाची हवा..आता तर DJ च लावा…


माझ्या कडुन आणि
माझ्या परिवारा कडुन
आपणास
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा!


वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, WhatsApp King. आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे लाखों पोरींच्या दिलांची धडकन… तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईलवर फ़िदा करणारे, प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व असलेल्या या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा… हॅपी बर्थडे कुत्र्या…!


आमचे लाडके भाऊ..… दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


आयुष्यात सगळी सुख तुला मिळो.
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे कुत्र्या…!


मित्रांसाठी कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा

भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes for brother in marathi

birthday-status-in-marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट….
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट….
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आज तुमचा वाढदिवस आहे, आणि आज च्या खास दिवशी, ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही. असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो, मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत, !! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात! बाकी
सारं नश्वर आहे! म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!


नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत..! चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत..!
जसा सूर्य चमकतो, आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


काही माणसं स्वभावाने कशी का असेनात. मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात…! अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!


जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो..!
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.


◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,!!
……आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ…….


नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. आजचा दिवस खूप खास आहे, भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात रहा…! तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात! त्यापैकी तू एक आहेस भावा! अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा…!


वाढदिवस येतो.
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!


आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला. कोणाच्या बापाची हिंमत नाही. वाघासारख्या भावाला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे


बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | sister birthday wishes in marathi

vadhdivas-shubhecha

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई….!


तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस.
तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो.
!!वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!


मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
आणि
आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी,
@ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा@


माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


नातं आपले बहीणभावाचं, सतत एकमेकांची खोडी काढण्याचं, न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं, मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं… असो,
!!!वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!


तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो,
मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय.
उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं.
म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या.
@वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा@


जिला फक्त पागल नाही! तर महा पागल हा शब्द सूट होतो!
@अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा@


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लहानपणी हातात हात घालून वाढवलंस आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
!माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते. पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण. खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे


व्हावीस तू शतायुषी! व्हावीस तू दीर्घायुषी! ही एकच माझी इच्छा! तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!


सर्वात वेगळी आहे माझी बहीण,
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण,
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही,
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही,
हॅपी बर्थडे ताई


सुंदर नातं आहे तुझं माझं, नजर न लागो आपल्या आनंदाला, हॅपी बर्धडे ताई


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आयुष्याच्या या पायरीवर..!
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.


माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दीदी.


मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी!
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी!
!हॅपी बर्थडे क्युट सिस्टर!


नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes for husband in marathi

birthday-wishes-to-friend-in-marathi

नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद रहावं, तुमचं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं, तुम्ही इतके यशस्वी व्हा!कि सर्व जग तुम्हाला सलाम करेल. येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्र्त होवो, ! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !! नवरोबा


तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा. तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा. जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…! वाढदिवसाच्या शुभेच्छा!


उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी, ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


या दिवसाची हाक गेली.
दूर सागरावरती.
अन आज किनारी आली.
शुभेच्छांची भरती…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


काही माणसं स्वभावाने कशी का असेनात.
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!


तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा
मला माहित आहे की,
आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम
आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
आपण मला नेहमीच खास वाटता.
आज मी तुमचा हा गोड दिवस
खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते! वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा!


तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर!


“नवा गंध, नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा.
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!


माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही!
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय
मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही! हॅप्पी बर्थडे डियर!


बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes for wife in marathi

happy-birthday-wishes-in-marathi-

प्राणाहून प्रिय
बायको!
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!


जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.


तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको!


कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा! बायको..!


तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य!
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!


नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे. वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे. वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.


आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..!
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद..!
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


आजचा दिवस खास आहे, ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. कारणच तसं आहे, कारण आज तुझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे सखे.


तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे..!
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे..!
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब.
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे


सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन.
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा… असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या.
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी.
माझी फक्त हीच इच्छा आहे.
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा.
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला


लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…बाळ..!


आयुष्यातील खास शुभेच्छा घे, वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे. तुला स्वीट हॅपी बर्थडे

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं, देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!


तुझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत कायमस्वरूपी राहील,
तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न कळता कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील,
आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया,
!!वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा!!


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी!
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी!
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!


मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes for daughter in marathi

birthday-wishes-for-daughter-in-marathi

birthday wishes for daughter in marathi

जगातील सर्व आनंद तुला मिळो!
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो!
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा! तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!


आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो.
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो.
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो.
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच..!
माझी मुली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


तु आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मम्मी-पप्पाची छोटिशी बाहुली आहेस,
तुच आमचे विश्व आणि तुच आमचा प्राण आहेस
Happy birthday my dear daughter


परी सारखी सुंदर आहेस तू
तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की,
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी..
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


चमचमते तारे आणि वाहणारे वारे
उधळणारे सुगंधी फुले सप्तरंगी इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्या साठी उभे सारे तारे
!!माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे.
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले.
आणि माझं जीवनच बहरून गेले.
ती दूसरी कुणी नसून ती माझी लाडकी
राजकन्या आहे.
!!माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!!


तू नेहमी सुखी रहावीस एवढच मागणे देवाकडे आहे.
म्हणून तुझ्या उज्वल भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणे आहे.
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझं सुख तू आहेस,
माझं आयुष्य तू आहेस,
माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस,
माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस,
@तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुली@


तू मला आई केलंस की मी तुला जन्म दिला हे मला कळत नाही
तुझ्या सोबत खेळता खेळता मी कधी लहान झाले मला कळत नाही
@माझ्या लाडक्या लेकीला तिचा आईकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा@


आजही आठवते मला ज्या वेळी तुझा जन्म झाला होता.
तुला हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता.
त्यानंतर प्रत्येक वेळी मला जाऊ दे फक्त तुझ्यासाठीच धडधडते.
तूच माझा श्वास आणि तूच माझ्या जगण्याचा ध्यास तूच माझा विश्वास
!!!..बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!


मी खरंच खूप भाग्यवान आहे.
मला तुझ्यासारखी सुंदर लेक मिळाली.
@अशा माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा@


प्रत्येक मुलगी ही तिच्या बापासाठी राजकुमारी असते.
माझ्या राजकुमारीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आज तुझ्या बालपणीचे असे काही प्रसंग आठवले
ज्यांना आठवून चेहऱ्यावर हास्य उमटले
तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा@


माझ्या कुशीत झोपण्यासाठी गाल फुगवून बसायची.
वाढदिवशी आणलेला नवा ड्रेस घालून घरभर मिरवायची.
जुन्या आठवणी आठवून हास्य फुलून येते मन तुझ्याच आठवणीत अजूनही रमते.
@माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा@


वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावे.
देवाने मला दिलेली तूच एक अनमोल भेट आहेस.
तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझं मोठे भाग्य आहे.
माझ्या लाडक्या लेकीला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.


जीवनात एक तरी अशी परी असावी
जशी कळी फुलताना पाहता यावी
आपल्या मनातील गुपित हळुवार
तिने माझ्या कानात सांगावी
@माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक@


कधी दुखले काळीज आमचे त्यावर आनंदाचा उपाय माझी लेक
कधी या बापाची माय माझी लाडकी लेक
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


खरच वेळ किती लवकर निघून जातो ना
कालपर्यंत माझं बोट धरून चालणारी माझी मुलगी
आज स्वतःच्या पायावर उभी आहे
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


इवलेसे पाऊल तुझे घरात पडले.
चार भिंतींना ह्या घरपण आले.
देवा माझ्या मुलीला सुखी ठेव एवढीच इच्छा.
!!तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!


आकाशाएवढे सुख काय असते हे मला मुलगी झाल्यावर कळाले
एक वेगळाच आनंद जेव्हा तुझ्या प्रत्येक हास्यातून उधळले
@लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा@


उंच गगनाला गवसणी घालायला निघालेल्या माझ्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या पंखांना बळ मिळो.


आयुष्यात नेहमी आरोग्यदायी राहा जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण कर
सर्व अपयश विसरून भविष्याकडे वाटचाल करीत रहा
!!..तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा पोरी..!!


मुलगी हे असं सुख आहे जे प्रत्येकाला मिळत अस नाही.
पण ते मला मिळाले यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे.
!! लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


माझ्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य आणणाऱ्या माझ्या परीला
@वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा@


जशी मोगऱ्याची उमलती कळी,
सोनचाफ्याची कोमळ पाकळी,
तशीच नाजूक-साजूक रूपाने देखणी माझी लेक सोनकळी,
!!वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा!!


हसणे तिचे जणू बरसणारी पावसाची सर,
चंद्रकोरी समान गोड खळी तिच्या इवल्याशा गालावर,
@माझ्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा@


आजच्याच दिवशी आम्हाला एक अनमोल भेट मिळाली
चिमुकल्या पावलांनी एक छोटीशी परी आमच्या आयुष्यात आली
!!माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Son In Marathi

लखलखते तारे, चमचमते तारे
खुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठीच आज तारे सजले,
माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तू इतका मोठा झालास कधीही विश्वास बसत नाही,
माझ्या हातातील छोट्या बाळाची ती उब अजूनही जात नाही,
मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


दीर्घायुष्य लाभू दे तुला,
आणखी मनी नाही, कोणती आशा
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आमच्या घरी जन्माला आलास हे आहे आमचे भाग्य,
तुझ्या वाढदिवशी आम्हाला होतो हर्ष,
लेकरा तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!


तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या,
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा,
बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


मुलाचा वाढदिवस असतो खास.!
त्या दिवशी पालक असल्याचा होतो एक वेगळा भास.!
लेका वाढदिवस हा तुझा आला.!
हर्ष हा मनी आला.!
प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


नाते प्रेमाचे दिवसेंदिवस असे फुलावे,
वाढदिवशी तू , शुभेच्छांनी न्हाऊन निघावे,
बेटा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुला!


आजचा दिवस तुझ्यासाठी आहे खास,
आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज,
मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


नवा गंध, नवा आनंद निर्माण करत
तुझ्या आयुष्यात यावा प्रत्येक दिवस
मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आज आनंदी आनंद झाला,
माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला,
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझी हीच प्रार्थना आहे की, देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!


व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी
एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


वेळ खूप पटापट जातो,
जेव्हा मी तुझे लहानपणीचे फोटो पाहते
तेव्हा असे मला वाटते तू लहानाचा मोठा कसा झालास,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


मला आनंद झाला की, देवाने मला
तुझ्यासारखा सुंदर मुलगा दिला,
माझ्या देखण्या आणि गोंडस मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


माझ्या चेहऱ्यावर सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या सुंदर मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला


तू कितीती मोठा झालास
तरी देखील आमच्यासाठी तू कायमच लहान बाळ असशील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


उंदड आयुष्य लाभावे तुला,
मनीच्या इच्छा पूर्ण व्हाव्या
मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


बाळा, तुझ्यावर चिडलो असेल
मारलं सुद्धा असेल, पण तु्झ्यावर मनापासून प्रेम करतो
हे विसरु नकोस
तुला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा!


तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा,
तुझं आयुष्य अनमोल आदर्श बनावा,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुझ्यासोबत माझे नाते असले जरी
बाप-लेकाचे,
पण तरी तू आहेस माझा
मित्र
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय मुला!


मुलाचा वाढदिवस असतो खास
त्या दिवशी पालक असल्याचा होतो एक वेगळा भास
लेका वाढदिवस हा तुझा आला
हर्ष हा मनी आला,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा |Aai birthday wishes in marathi

Aai-birthday-wishes-in-marathi

माझ्या जीवनाची सावली,
आई माझी माऊली,
कष्ट करोनी अतोनात,
भरवलास तू मला घास,
केलीस माझ्यावर माया,
जशी वृक्षाची छाया,
माझ्या जीवनाची सावली,
!!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास न घेता बरीच विनाअर्थी बलिदान दिली आहेत.
आई, देव तुम्हाला जगण्याची शंभर वर्षे देवो
!!..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई साहेब..!!


बघते प्रतिंबिब तुझ्यात
मिळतो मला दिलासा,
शोधू कुठे तुझ्यात मला,
मग दिसे मज एक आरसा
आरशात शोधाताना तुला,
आई मज तू जवळ भासे,
तुझ्याविना माझे आयुष्य,
म्हणजे पाण्याविना मासे,
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई साहेब


आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे
तुझे कष्ट अपार आहेत
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा
हेच आता देवाकडे मागणे आहे
!!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


अनेक चेहरे बदलताना पाहिले,
आईला मात्र प्रत्येकवेळी मी
प्रेमच करताना पाहिले,
!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांहूनही श्रेष्ठ मला माझी आई
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई


घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही,
जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात
@वाढदिवसाच्या शुभेच्छा आई@


आई माझी सर्वप्रथम गुरू
तिच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू


स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
!!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


आई माझी मायेचा झरा दिला तिने जीवनाला आधार
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
आई तुला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!!


देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली ‘आई’
@वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई@


आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर
आई म्हणजे घराचा आधार,
आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार
!!..आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!


पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिलं नव्हत तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
@वाढदिवसाच्या शुभेच्छा आई@


आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस..
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई


माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही
तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही
!!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!


एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत.


माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!


मुंबईत घाई
शिडीच्या साई
फुलात जाई
आणि गल्लो गल्लीत भाई
पण या जगात सगळ्यात भारी
आपली आई..!!!


जगात असे एकच न्यायालय आहे..!
जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..!
जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!


प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
!आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!


माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!


आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!


व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
!!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


आईच्या गळ्याभोवती
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी,
हा तिच्याभोवती नेकलेसपेक्षाही
मोठा दागिना असतो, आई तुला माझ्याकडून एक छान मिठी


आई तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू,
असेच काय असू दे,
प्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!


!!लोक!!
आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,
पण मला ‘तु माझी आई आहेस’
असे सांगण्यात
जास्त अभिमान वाटतो!!!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई


कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही,
@आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा@


नाती जपले, तू प्रेम दिलेस,
या कुटुंंबाला तू नेहमी जपलेस,
पूर्ण होवोत तुझ्या इच्छा,
!!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


माझी ह्या जगात खूप प्रसिद्धी आहे ! हे फक्त माझ्या आईमुळे आहे ! अगं, मला आणखी काय द्यायला पाहिजे? आई तूच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे ! तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई


आई तू माझ्या जीवनाचा आधार,
मातीच्या गोळ्याला तूच दिलास आकार,
सांग आई कसे फेडू तुझे थोर उपकार
@आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा@


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
तुमच्यापेक्षा विशेष कोणीही नाही.
माझी आई जिने माझ्या संपर्ण आयुष्यावर प्रेम केले.
त्याबद्दल खूप धन्यवाद


मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
@वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा@


घरात स्वयंपाक कमी असल्यास
ज्या व्यक्तीला भूक नसते
अशा थोर आईस


आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर
!!आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!


कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
!!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आई,
तू माझी शक्ती आहेस,
जी मला माझ्या आयुष्यातील
सर्व संकटांविरुद्ध लढायला
नेहमी मदत करते.
माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे!


जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


लाडाची लेक मी तुमची
झाले कधी माहीत नाही,
अहो आई म्हणताना मैत्री कधी झाली कळली नाही,
आई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


जो आनंद आईची
स्माईल बघून होतो ना,
त्या आनंदापुढे
सर्व जग पण
कमी वाटते


इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तू सदैव आनंदी असावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
@..आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..@

माझ्या देहातील,
श्वास असणाऱ्या
माझ्या आईस,
!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


आई तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू,
असेच काय असू दे,
प्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,
!!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


स्वत:चे डोळे मिटेपर्यंत,
जी प्रेम करते तिला,
‘आई’ म्हणतात,
@आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा@


सर्वांना एकाच
मायेच्या बंधनात बांधून ठेऊन,
सर्वांची काळजी घेणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आयुष्यात त्यांना काहीच कमी पडत नाही,
जे आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


तू माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेस आई! तू माझ्यासाठी सर्वात खास आहेस आई !! तुमच्या ह्या वाढदिवशी मी प्रार्थना करतो !! हा वाढदिवस आनंदाचा खजाना घेऊन येईल!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई..!!!


माझे हात तुझ्या हातात आई,
मी चालतो ठाई ठाई,
अशीच थाप राहु दे राहु दे आई
तुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा


आई दिव्याची ज्योत असते,
आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा,
म्हणून दु:ख सगळे सोसत असते.
@वाढदिवसाच्या शुभेच्छा आई@


आनंद प्रत्येक क्षणाचा तुझ्या वाटेला यावा ! फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा !सुख तुला मिळावे! दु:ख तूझ्या पासून कोसभर दूर जावे! हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा! आणि प्रत्येक क्षण तूझ्या साठी आनंदाचाच यावा ! वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा आई.


माझी अशी प्रार्थना आहे की, तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो. जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं. ते सर्व सुख तुला मिळो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.


जगातील सर्वात प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमचे
जीवन अमर्याद आनंदाने भरु दे!


फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे. सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.


सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ, पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ.


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | father birthday wishes in marathi

father-birthday-wishes-in-marathi

father birthday wishes in marathi

कधीही डोळ्यात न दाखवता
आभाळाएवढे प्रेम करणाऱ्या
वडील रुपी देव माणसाला
!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
!!..Happy Birthday papa..!!


बाबा तुम्हीच आमचे अस्तित्व
तुम्हीच आमच्या जगण्याची आस
तुमच्या शिवाय जीवन आहे उदास
@हॅपी बर्थडे बाबा@


तुमचा काय आणि माझा काय
शेवटी बाप तो बाप असतो
सगळे जणी वरवर असले
तरी हा एकटाच खास असतो
@वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा@


स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला.
!!वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!


बाप नावाचं धरण आयुष्यात असलं
की सुखाचा दुष्काळ कधीही पडत नाही
आणि ते धरण जर फुटलं तर काही खैर नाही.
हॅपी बर्थडे बाबा (पाटील)😃


खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.
!..वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा..!


या जीवनाचा पाया
आहेस तू बाबा,
या रंगमंचावरील पडद्यामागचा
कलाकार आहेस तू बाबा,
तुझ्या शिवाय मी काहीच नाही
तुझ्या नावानेच आहे ओळख माझी
तूच सांग यापेक्षा अधिक मोठी
श्रीमंती काय असेल बाबा ?


तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा..!


परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुमचे येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.


मला सावलीत बसून,
स्वतः जळत राहिले.
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिले.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
!!..वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा..!!


मुलगी असूनही मला
बेटी नव्हे तर बेटा म्हणणाऱ्या
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!


बेफिकीर असतं मन अन् बेभान असतो प्रत्येक श्वास
बापामुळेच पोटात जातो सुखाचा एक एक घास
आईची माया कळते पण बापाच साध प्रेम दिसत नाही
कारण बाप असतो सौख्याचा अथांग सागर ज्याचा तळ सुद्धा दिसत नाही.
हॅपी बर्थडे बाबा
माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आपलं दुःख मनात ठेवुन
कुटुंबाला सुखी ठेवणारा देव माणूस
म्हणजेच ‘वडील’
!!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की, आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात.
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!


चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूला उभे
असणाऱ्या माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा…!


आनंदाचा प्रत्येक क्षण पास असतो
जेव्हा माझ्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
@वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा@


ज्यांच्याकडून मला सर्वकाही मिळाले आहे,
ज्यांनी मला सर्वकाही शिकवले आहे,
कोटी कोटी नमन आहे अश्या वडिलांना
ज्यांनी मला नेहमी आपल्या हृदयात स्थान दिले आहे.
हॅपी बर्थडे पप्पा


संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती आई
अन आयुष्यभरच्या जेवणाची चिंता करतो तो बाप


नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा!
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा!
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा बाबा!!


एकाच व्यक्तीमुळे आज पर्यंत
कुणासमोर झुकायची वेळ आली नाही
माझ्या आयुष्यातील देव माणूस
वडील


कोण म्हणते बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण माय ममतेच्या दुप्पट
तोच प्रेम करतो आपल्यावर..!
!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!!


डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला “मैत्रीण” म्हणतात.
डोळे वटारून जी प्रेम करते तिला “बायको” म्हणतात.
स्वतःचे डोळे बंद होई पर्यंत जी प्रेम करते तिला “आई” म्हणतात.
पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला “बाबा” म्हणतात.
@वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा@


वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा| Shivmay Birthday Wishes in Marathi

वाढदिवस अभिषटचिंतनाच्या
आपणांस
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
||आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ||


शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे,
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे,
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.!


आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता,
आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना,
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो


तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
||शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा||


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात
तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात
बाकी सारं नश्वर आहे.
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी
तुम्हाला शिवमय शुभेच्छा


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा


प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि
आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा
||वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा||


वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुमचा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा


नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
!!शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं.
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं.
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
||वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा||


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.
पण काही क्षण असे असतात.
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे
त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा
!!वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!!


झेप अशी घ्या, की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात.
आकाशाला अशी गवसणी घाला, की पक्ष्यांना प्रश्न पडावा.
ज्ञान असे मिळवा, की सागर अचंबित व्हावा.
इतकी प्रगती करा, की काळही पहात राहावा.
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभकामना
!!आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा!!


आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही. वडील नेहमीच आपली काळजी घेतात आणि निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात. बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आमचा वाढदिवस शुभेच्छा संग्रह तुम्हाला कसा वाटला, आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमच्या कडे काही birthday wishes in marathi असल्यास आम्हाला पाठवा. त्या आम्ही यामध्ये सामायिक करू धन्यवाद.!


हे वाचलंत का? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻