वडील म्हणजे एक अशी व्यक्ती..!

Baba Quotes In Marathi

Baba Quotes In Marathi

बाप, वडील, बाबा ही देवाने आपल्याला दिलेली पृथ्वी वरील एक अनमोल देणगी आहे. वडील हे आपल्या मुलांचे जन्मदाते आणि भाग्य निर्माता आहेत. वडील हे मुलांसोबत गुरू, भाऊ आणि मित्राची भूमिका बजावतात.

कुटुंबासाठी वडील हा एक खरा हिरो असतो, काही अपवादजनक वडील सोडली तर, बाकीच्यांचे वडील हे आपल्या मुलांसाठी एक हिरो पेक्षा कमी नसतात. जीवनात संघर्ष करून कुटुंबाला आनंद वाटण्याचे काम फक्त बापच करू शकतो.

अश्याच या वडिलाबद्दल आज दोन शब्द बोलू इच्छितो..!

हा व्यक्ती समाजाला दिसून पडत नाही, कारण हा वडील नावाचा व्यक्ती, मुकाट पणे संसाराचा गाळा खेचत असतो. आई वर बरेचसे लेखक आणि कवी यांनी भरपूर साहित्य, पुस्तके आणि कविता लिहून ठेवल्या, परंतु हेच कवी, लेखक स्वतः एक वडील असून देखील या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे अस्तित्व लिहायला विसरून गेला.

आर्थिक दृष्ट्या गरीब असेल, तर स्वतःच्या फाटलेल्या कापडाची पर्वा न करता, कुटुंबाची लाज झाकणारा आणि श्रीमंत असेल, तर वाया गेलेल्या मुलं, मुलींची आब्रू लपवणार हा प्राणीच खूप निराळा.!

स्वतःचा आवश्यक गरजा पूर्ण न करता, गरजा पूर्ण झालेल्या कुटूंबाची अनावश्यक गरजा पूर्ण करणारा, हा एक वेडा वडीलच असतो.

वडिलांचे कुटुंबासाठी असे कार्य असते, जसे चित्रपटातील कॅरेक्टर जे सोमोर असतात, तेच आपल्याला दिसतात परंतु एक चित्रपट बनवनासाठी खूप मोठी टीम त्यासाठी काम करत असते. हे आपल्या कधी लक्षातच येत नाही. त्याच प्रकारे आपल्या कुटुंबासाठी बापाची परिस्तिथी झालेली असते.

एखादी ठेच लागली असता, बाबा..! असे उद्गार मी तरी कोणाच्या तोंडातून ऐकलेले नाही. कारण त्याने लावलेली माया आपल्याला कधी कळतच नाही.

खिसा रिकामा असला, तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही.!

याच बापाला आमच्या टीम तर्फे शत शत नमन..!


  • सागर राऊत

हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻