respect meaning in marathi

respect meaning in marathi

self respect meaning in marathi

आदर – Respect in marathi

आर्टिकलचे टाईटल बघून तुम्ही आत मध्ये शिरलात म्हणजे, एक तर तुम्हाला लोक किव्हा नातेवाईक तुमची किंमत का करत नाही? ते जाणून घ्यायचे आहे, किव्हा त्यांनी आपला आदर केला पाहिजे या बद्दल आर्टिकल मध्ये काय दिलेले आहे ते समजून घ्यायचे आहे.

नमस्कार मित्रांनो, माहिती लेक मध्ये तुमचे मनपुर्वक स्वागत आहे.

मी या आर्टिकल मध्ये तुम्हाला अश्या काही गोष्टी सांगणार आहे. ज्यामुळे तुमच्या डोक्यातील काही चुकीचे भ्रम बाहेर निघतील. तसेच यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल की, चारचौघात तुम्ही स्वतःची किंमत कशी वाढवू शकता. चला तर मग आपण या विषयी सविस्तर समजून घेऊया!

सर्वात आधी सांगू इच्छितो की, इज्जत, मान, सम्मान, आदर ही फुकट मिळणारी वस्तू नाही किव्हा हे मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे पण खर्च करावे लागणार नाही. ही तर अशी गोष्ट आहे जी कमावली जाते.

तुम्ही तुमच्या वातावरणात बघता की, लोक एखाद्या व्यक्तीला खूप आदर देतात. असा आदर मला का मिळत नाही? मला पण मिळायला हवा! हा विचार तुमचा योग्य आहे, सम्मान, आदर मिळणे कोणाला नको असते. तुम्हाला मिळत असलेल्या अनादरा च्या वागणुकीमुळे तुमच्या मनावर नकळत परिणाम आणि तुमचा अपमान होत असतो.

परंतु त्यामागचा विचार तुम्ही केला का? की त्या व्यक्तीला कशाबद्दल मान, सम्मान मिळत आहे. त्याच्या जवळ असे काय आहे? जे माझ्या जवळ नाही.?

मला तरी वाटते की, माणसाला आदर तीन कारणानमुळे मिळू शकतो.

एक तर तो आदर करणाऱ्या व्यक्तीची पैश्याची भूक भागवत असेल. दुसर म्हणजे त्या व्यक्ती मूळे लोकांचे कांम होत असेल किव्हा तिसरं तो व्यक्ती स्वभावाने चांगला असेल.

तीन गोष्टीपैकी आधीच्या दोन गोष्टी काळाच्या ओखात संपुष्टात येतात, तर तिसरी गोस्ट की दीर्घ काळ चालणारी आहे. दीर्घकाळ यासाठी म्हटले की ती गोष्ट किती काळ टिकवायची ही तुमच्यावर अवलंबुन असते. मान, आदर कमवायला खूप वेळ लागतो, परंतु गमवायला काही मिनिटे देखील पुरेशी असतात.

खरच तुम्हाला वाटत असेल की, आपला कोणी आदर केला पाहिजे. कोणी आपल्याला इग्नोर नाही केले पाहिजे. तर सर्वात आधी हे समजून घ्या. की तुम्ही कुठल्या वातावरणात वावरता. ते म्हणतात ना सोन्याची किंमत सोनारच व्यवस्तीत ठरवू शकतो. त्याच प्रमाणे ही गोष्ट आहे.

आधी तुम्हाला स्वतःला समजून घ्यावे लागेल. तुम्हाला स्वतःला जाणून घ्यावे लागेल. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कुठल्या व्यक्ती कडून मान, आदर हवा.

जुगारी, दारुड्या व्यक्ती कडून आदर हवा की समाजात चांगले व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीकडून हा तुमचा निर्णय.

तुमचे मित्र तसेच नातेवाईक तुम्हाला कुठल्या नजरेने पाहतात त्यावर अवलंबुन आहे. त्यांचा तुमच्या बद्दल चा दृष्टीकोन जसा असेल त्याच प्रमाणे तुम्हाला वागणूक मिळणार हे नक्की.

त्यांचा तुमच्या बद्दल चा दृष्टीकोन तुम्ही कसा बदलू शकता हे आपण आत्ता बघूया…!

1) इंग्रजी मध्ये एक फेमस वाक्य आहे. give respect take respect
याचा अर्थ असा की तू मला आदर दे मी तुला आदर देईल.

म्हणजेच, जर तुम्हीच लोकांना आदराची वागणूक देत नसाल. तर तुमचा काहीच हक्क नाही की पुढल्या व्यक्ती ने तुमचा आदर केला पाहिजे.
तुम्ही लोकांना आदर देऊन तर बघा. ते तुम्हाला त्या बदल्यात आदर नक्की देतील. आदर देने म्हणजे काय तर लोकांनी आपल्याला चांगली वागणूक देने होय.

2) कुठल्याही व्यक्ती सोबत चर्चा किव्हा बोलतांना त्यांचे पूर्ण आणि लक्ष पूर्वक ऐका. त्याच्या बोलण्याचा आदर करा. ते बोलत असताना त्यांचे बोलणे मधातच तोडून तुमचा विषय मांडू नका. बरेचसे लोक सोमोरचा बोलत असताना यानंतर आपण काय बोलायचे याचा विचार करतात. आणि काय बोलायचे हे सुचल्यावर त्या व्यक्तीचे बोलणे मधातच थांबून स्वतःचा विषय सांगण्यास सुरूवात करतात. असे केल्याने उलट तुम्ही त्यावर तुमचे वर्चस्व असल्यासारखे नकळत सिद्ध करता.

३) कुठल्याही व्यक्तीला आनंदित असणारे व्यक्ती आवडतात. तसेच त्यांच्या सोबत राहायला व विचार मांडायला आवडतात. तुम्ही नेहमी आनंदात राहा तसेच सकारात्मक विचार करा. लोक तुमच्या कडे आकर्षित होईल आणि नकळत ते तुम्हाला समानस्पद वागणूक देतील.

४) जीवनात स्वतःच एक धैर्य ठरवा आणि त्यासाठी परिश्रम करा. तुमच्या वैशिष्ट्य धैर्या साठी चालू असलेली धळपड हे नातेवाईकांना पासून लपून राहणार नाही. यामुळे त्यांचा तुमच्या बद्दल चा असलेला दृष्टीकोन बदलेल व त्यांच्या मनात तुमच्या बद्दल एक आदरभाव वाढेल.

५) सतत स्वतःला आपल्या कामात व्यस्त ठेवा. रिकामे लोक या जगाच्या नजरेत खुपतात. कारण तुमचा मित्र सकाळी स्वतःचे हाल करून कामावर जातो आणि तुम्ही त्याला रिकामे आणि मौज माज्या करणारं व्यक्ती दिसता. त्यामुळे त्याला तुमच्या सारखे रिकामं टेकड्या आयुष्य जगण्याची नकळत इच्छा झालेली असते. परंतु तसे करायला मिळत नसल्याकारणाने त्याच्या मनात तुमच्या बद्दल चा द्वेष वाढतो.

६) शक्य असल्यास स्वतःमध्ये असे काही बदल करा. ज्या बदलांचा लोकांना, मित्रांना किव्हा नातेवाईकांना गरज भासेल
म्हणजेच अस काही स्वतःजवळ ज्ञान ठेवा ज्यामुळं लोक तुम्हाला विचारतील, त्यांना तुमची गरज जाणवेल. अशी गरज निर्माण करा आणि ती पूर्ण करा.

७) इतरांशी बोलतांना नम्र पद्धतीने बोला. तुमच्या बोलण्यात त्यांना आदर भासू द्या. त्यांच्या चांगल्या गोष्टीची स्तुती करा. त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन द्या. अडचणीत असल्यांना शक्य असेल तेवढी मदत करा.

८) मित्रांच्या ग्रुप मध्ये संभाषण चालू असल्यास तेथे तुम्ही तुमचा विषय मांडल्यावर ते तुम्हाला इग्नोर करत असल्यास तुमचा विषय मांडण्याची ती योग्य वेळ नाही; ते समजून घ्या!अश्या वेळेस प्रत्येकाच म्हणणे लक्षपूर्वक ऐका आणि त्यावर होकारार्थी प्रतिसाद द्या. किव्हा होकारार्थी मान हलवा जेणे करून गोष्ट सांगणार्याचे लक्ष तुमच्या कडे जाईल आणि योग्य वेळ पाहून तुमचा विषय तेथे मांडा.

सांगितलेल्या गोष्टीवर एकदा विचार करा. त्या आपल्या दैनंदिन जीवनात वापरा. तुम्हाला सांगतो हे नक्की काम करेल. काही दिवस करून तर बघा..! तुम्हाला नक्की फरक जाणवले. लोक नक्की तुमचा आदर करतील. याची हमी मी देतो.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. या माहितीचा इतरांना फायदा व्हावा असे वाटत असल्यास मित्रानं मध्ये नक्की शेअर करायला विसरू नका. तसेच अश्याच प्रकारच्या माहिती वाचण्यासाठी माहिती लेक अवश्य भेट द्या. मी सागर राऊत परत भेटूया एका नवीन विषयावर

धन्यवाद…!

  • सागर राऊत


https://youtu.be/vYROyWMhJTI

हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Motivational

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *