घरकुल चे खात्यात 250000 रुपये जमा, लिस्ट मध्ये 80लाख घरकुल.!

PM Awas Yojna New List 2023

PM Awas Yojna New List 2023 : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरीब रेषेखालील लोक म्हणजेच, ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही. अशा लोकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी मोदी सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे.

जेणेकरून ते लोक आपल्या स्वतःचे घर बांधून स्वप्न साकार करू शकतील. प्रधानमंत्री आवास योजना श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 2015 मध्ये सुरू केली होती. हे बऱ्याच लोकांना माहिती असेलच, ही योजना शहरी आणि ग्रामीण भागातील ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही. अश्या कुटुंबांना दिली जाते. परंतु त्याकरिता त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घर मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

आवास योजने साठी अर्ज केलेल्या अर्जदारांची यादी पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ज्या अर्जदारांची नावे यादीत आले आहेत, त्यांना लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत पाठवली जाईल.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत डोंगराळ भागातील अर्जदारांना २.५ लाख आणि सपाट भागातील अर्जदारांना २.३ लाख रुपयांची आर्थिक मदत केंद्र शासन करणार आहे, जेणेकरून अर्जदारांना स्वतःचे घर बनवता येईल. पीएम आवास योजनेची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे, अशा परिस्थितीत अर्जदारांना त्यांच्या नावाची यादी वेबसाईट ला भेट देऊन चेक करावी लागेल.

तेच लोक अशा योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, तसेच रेशनकार्ड यादीत नाव असले पाहिजे, ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करू शकतात.

  • अर्जदाराचे स्वतःचे पक्के घर नसावे.
  • अर्जदाराचे नाव बीपीईटी यादीत असावे.
  • ग्रामीण भागातील अर्जदाराचे उत्पन्न वर्षाला ₹90000 पेक्षा जास्त नसावे.
  • शहरी भागातील अर्जदाराचे उत्पन्न रु.1.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • राशन कार्ड मध्ये तुमचे नाव असावे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?

  • सर्वात आधी पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला जावे लागेल.
  • त्यानंतर मेन पेज वर, Awaas soft पर्यायाखालील रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमचे जे राज्य असेल, अर्थातच हे आर्टिकल मराठी बांधव वाचत असेल, म्हणून त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य निवडा लागेल.
  • त्यानंतर जिल्हा गट आणि गावाचे नाव निवडा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या गावातील गृहनिर्माण योजनेची यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • आता तुम्ही या यादीत तुमचे नाव तपासू शकता.

अशा प्रकारे तुम्ही पीएम आवास योजनेच्या यादीत तुमचे नाव तपासू शकता.


हे वाचलंत का ? –

Share