सुकन्या समृद्धी योजना
Small Savings Schemes
Sukanya Samriddhi Yojana: जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत तुमच्या मुलीचे खाते उघडले असेल, तर त्याबद्दलची एक सर्वात मोठी बातमी आहे. केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत मोठे बदल करण्यात आला असून, त्याचा थेट परिणाम खातेदारांवर होणार आहे. जाणून घ्या त्याबद्दलचे अपडेट.!
ही योजना मोदी सरकारने 2015 मध्ये सुरू केली हे तुम्हाला माहिती असेलच. माहिती नसेल तर येथे त्याबद्दल आम्ही थोडक्यात सांगू इच्छितो कि, या योजनेत खाते उघडून तुम्ही तुमच्या मुलीसाठी मोठा निधी बनवू शकता आणि हे पैसे तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी खर्च करू शकता. आता केंद्र सरकारने या योजनेत मोठा बदल केला आहे. तो बदल जाणून घेऊया.!
सरकारने बदललेला नियम
चालू आर्थिक वर्षात भारत सरकारने सुकन्या योजनेशी संबंधित एक महत्त्वाचा नियम बदलला आहे. सध्या पर्यंत सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पॅन आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आतापासून ही दोन्ही कार्डे अनिवार्य करण्यात आली आहेत.
खाते उघडण्यासाठी हा क्रमांक आवश्यक आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी फॉर्म असणे आवश्यक महत्वाचे झालेले आहे. खाते उघडताना तुमच्याकडे हा एनरोलमेंट फॉर्म किंवा आधार क्रमांक नसेल तर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडण्यात अडचणीत येऊ शकते.
सहा महिन्यांच्या आत आधार नंबर द्यावा लागेल.
यापूर्वी या योजनेत आधारशिवाय गुंतवणूक केली जात होती, परंतु सध्या सरकारने असेही सांगितले आहे की, खाते उघडल्या नंतर 6 महिन्यांच्या आत तुम्हाला आधार क्रमांकाची माहिती द्यावी लागेल.
अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली.
वित्त मंत्रालयाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सुकन्या समृद्धी सारख्या पोस्ट ऑफिस योजनांमध्ये खाते उघडताना, तुम्हाला पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 सबमिट करावा लागेल. जर तुम्ही त्या वेळी पॅन सबमिट केला नसेल, तर तुम्ही 2 महिन्यांच्या आत सबमिट करू शकता.
खाते उघडण्यासाठी लागणारे कागतपत्रे
तुमच्याकडे आधार क्रमांक किंवा आधार नावनोंदणी पावती असणे आवश्यक आहे.
पासपोर्ट आकाराचा फोटो असावा.
महत्वाची सूचना
पॅन क्रमांक, विद्यमान गुंतवणूकदारांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर न केल्यास, त्यांचे खाते 1 ऑक्टोबर 2023 पासून बंद केले जाईल.
हे वाचलंत का ? –