startup business ideas in marathi

startup business ideas in marathi

Business Idea: लाखोंची कमाई करणारी ही बिझनेस आयडिया जाणून घ्या, आजचे तरुण शिक्षण घेऊन सुशिक्षित झाल्यावर चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, पण सध्याची परिस्थिती अशी आहे, की सुशिक्षित तरुणांनाही भजे टाळावे लागत आहे. नोकरीच्या शोधात त्यांना दुसऱ्या राज्यात जावे लागत आहे. नाईलाजाने तेथे जाऊन 15,000 ते 18,000 रुपयांच्या नोकरी करावी लागत आहे.

या तरुणांना आपला स्वतःचा काही व्यवसाय करायचा असला, तरी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. बेरोजगारी दिवसेन दिवस गतीने वाढत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कमी भांडवली (गुंतवणुकीत) तुमचा स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, ज्यामध्ये तुम्ही लाखांत कमवू शकता, तर ही व्यवसाय कल्पना (Business Idea) तुमच्यासाठी मनी मेकिंग आयडिया (Money Making Idea) ठरू शकते, म्हणजेच तुम्ही यातून भरपूर कमाई करू शकता.

लाखोंची कमाई करणाऱ्या या बिझनेस आयडियाबद्दल जाणून घ्या..!

लाखोंची कमाई करण्यासाठी जास्त भांडवल लागेल, हे उघड आहे, परंतु, कमी गुंतवणुकीत तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकाल. तुम्ही आमचे नियमित वाचक असाल, तर तुम्हाला माहिती असेलच की, आमच्या साइटवर अशा प्रकारच्या बऱ्याच व्यवसाय आयडिया आम्ही पोस्ट केल्या आहेत, जेणेकरून तुम्ही कमी खर्चात महिन्याला जास्त कमाई करू शकता.

जसे की तुम्ही ऑनलाईन बिझनेस आयडियाबद्दल वाचू शकता, तसेच तुम्ही एखादी गृहिणी असाल, तर तुमच्या साठी काही घरगुती व्यवसाय आम्ही दिलेले आहेत. तुम्ही ते देखील करू शकता. तुम्ही गुगल वरून सुद्धा लाखोंची कमाई करू शकता, ते देखील अवघ्या पाच ते सात महिन्यांत, चला तर मग, लाखो कमावणार्‍या बिझनेस आयडियाबद्दल जाणून घेऊया, जर तुम्ही हा व्यववसाय सुरू केला, तर तुम्हाला नक्कीच भरपूर नफा कमावता येईल.

ऑटो मोबाईल रिपेअरिंग व्यवसाय

सध्या वाहनांच्या किमती किंवा पेट्रोल-डिझेलच्या किमती ज्या वेगाने वाढत आहेत. त्याच वेगाने मोटारसायकल, कार, चारचाकी, तसेच इतर दुचाकी, वाहनांची खरेदीही बिनदिक्कतपणे होत आहे, हे स्पष्ट झाले आहे. या आधुनिक युगात वाहतुकीशी संबंधित वाहनांचा वेग झपाट्याने वाढत राहील.

यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, ऑटो मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय केल्यास तुम्ही श्रीमंत होऊ शकता. कारण आपल्या देशात एवढी वाहने धावत असताना, या रिपेअरिंग व्यवसायाचा स्कोप दिवसेन दिवस वाढतच चालणार हे नक्की आहे. जर तुम्ही या व्यवसायाला व्यवस्थित सुरुवात केलीत, तर तुम्ही या व्यवसायात यशस्वी व्हाल, यात काही शंका नाही.

वाहन दुरुस्ती व्यवसायात किती खर्च येईल?

जेव्हा ऑटो रिपेअरिंग व्यवसायाचा विचार केला जातो, तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागतो, की हा व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल किती लागेल? अर्थातच हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. खरे तर तुम्ही हा ऑटो मोबाईल रिपेअरिंग व्यवसाय (Auto Mobile Repairing Business) सुरू करणार असाल, तर फक्त 20 हजार ते 25 हजार रुपये खर्च करून तुमचा हा व्यवसाय सुरू होतो.

तुम्हाला वाटेल कि, हा काही पण सांगत आहे. परंतु आम्ही केलेल्या सर्वे अनुसार आम्हाला हे आढळून आले कि, हा व्यवसाय खूप कमी भांडवली पासून सुरु करून जस जसा तुमचा व्यवसाय वाढत जातो. तस तसे तुम्ही यात अजून पैसे गुंतवून व्यवसाय मोठा करू शकता. यासाठी रस्त्याच्या कडेला वाहनांची जास्त वर्दळ असणारी चांगली जागा निवडावी लागेल किंवा वाहने जास्त प्रमाणात थांबतील अशी जागा निवडावी लागेल. आपले दुकान लोकांना दिसेल अशा ठिकाणी असावे.

या व्यवसायात यश मिळण्याची शक्यता

जर तुम्ही या रिपेअरिंग व्यवसायात कुशल कारागिरांसह चांगला व्यवसाय स्वीकारलात तर तुम्हाला या व्यवसायात नक्कीच यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या ग्राहकांसाठी चांगले काम कराल, तेव्हा तुम्हाला ग्राहकांची संख्या वाढलेली दिसेल. जेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकांचे समाधान करता, तेव्हा तुम्हाला या व्यवसायात यशस्वी होण्यापासून काहीही रोखू शकत नाही कारण व्यवसायात ग्राहकांचे समाधान करणे म्हणजे ग्राहक पुन्हा तुमच्याकडे येतील आणि तुमच्याकडून काम करून घेतील.

तसेच, वाहनांच्या दुरुस्तीची मागणी खूप वाढली आहे, कारण या व्यवसायात कमी वेळेत चांगला नफा कमावता येतो. ज्या मार्केटमध्ये वाहने दुरुस्त केली जातात तेथे मी सर्वे केला. मोठ्या संख्येने लोक वाहने दुरुस्तीच्या प्रतीक्षेत (waiting) मध्ये असतात. जर तुम्ही या व्यवसायात नवीन असाल, तर मग तुम्ही किमान दोन लोकांसह हा व्यवसाय सुरू करू शकता. त्यानंतर, तुमच्या व्यवसायाची वाढ लक्षात घेऊन, तुम्ही कुशल कारागीर ठेऊ शकता.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *