शेतकरी मित्रांनो शेती विकत घेतांना या गोष्टी लक्षात ठेवा.!

Shet Vikat Ghetana Niyam : शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी हे शेती खरेदी करतात काहीच न बघता ती शेती खरेदी करून घेतात. नंतर त्या शेती मध्ये असलेल्या अडथळ्यान मुळे ती शेती परत विकावी लागते.

shet-vikat-ghetana-niyam

यामुळे शेती काही वेळेला तोट्यात विकावी लागते. याच कारणानं मुळे आज आम्ही तुमच्या करिता काही महत्वाची माहिती घेवून आलो आहे. 

ही माहिती शेती किंवा कोणती जमीन विकत घेतांना किंवा विकतांना लक्षात ठेवल्यास, तुम्ही कधीच जमिनीच्या व्यवहारात फसणार नाही.

मी बरेच वेळा बघितले आहे. जमिनीच्या व्यवहारात खूप लोकांची फसवणूक केली जाते. काही वेळ जमीन कुणाची आणि विकणारा दुसराच असतो. 

चला तर पाहूया त्या गोष्टी कोणत्या आहेत. ज्या जमीन विकत घेतांना लक्षात ठेवाव्या लागतात.

तुम्ही जर शेत विकत घेत असाल, तर सात बारा व उतारा तपासा.!

 • कोणतीही जमीन आपल्याला खरेदी करायची असल्यास, त्या जमिनीचा गट नंबर पाहून महा भूलेख च्या संकेतस्थळावरून सातबारा download करून घ्या. आणि त्याच जमिनीचा आठ सुद्धा याच वेबसाईट वर मिळतो तो सुद्धा काढून घ्या.

सात बारा काढण्यासाठी येथे क्लिक करा.!

 • आपण ज्या व्यक्ती कडून शेत विकत घेता आहे त्या व्यक्तीचे नाव त्या सातबारा मध्ये आहे की नाही ते बघून घ्या.
 •  सर्वात महत्वाचे म्हणजे काही वेळेला शेतकरी आपल्या शेतीवर कर्ज काढून ठेवतात व ते कर्ज खूप वर्ष तसेच राहते व वाढत जाते आणि ते वाढलेले कर्ज भरणे न झाल्यामुळे बरेच शेतकरी शेती विकतात. तर शेती वर कर्ज आहे का याची तपासणी करून घ्या.
 • आणि सोबतच शेती संबंधी काही भानगडी चालू असेल किंवा शेती वर कोणता खटला चालू आहे याची चौकशी करून घ्या. 

जमीन कोणत्या वर्गा मध्ये येते? ते तपासून घ्या.! 

 • आपल्या कडे शेत जमिनीचे काही वर्ग पाडण्यात आले आहेत. तुम्ही विकत घेतलेल्या सातबाऱ्यावर भोगवट दार वर्ग 1 ची जमीन असेल, तर या वर्गा मधील जमिनी विकण्यास कोणतेही निर्बंध शासनाने घातलेले नाहीत.
 • या जमिनीचा मालक ज्याचा नावावर सातबारा असतो. तोच शेतकरी असतो. शेत हे कोणत्या वर्गात मोडते हे सातबारा मध्ये लिहलेले राहते. म्हणून सातबारा व्यवस्थित पाहून घ्या. 
 • याच सोबत जमिनीचा नकाशा download करून तो व्यवस्थित पाहून घ्या व शेत मोजणी ॲप च्या सहायाने जमिनीची मोजणी करून घ्या ही मोजणी तुम्ही घर बसल्या करू शकता.
 • जमिनीचा नकाशा मुळे आपल्याला आपल्या जमिनीची हद्द कळते व बाजूने कोणाचे किती शेत आहे हे समजते. 

शेती करिता किंवा जमिनी करिता रस्ता किती व कुठून आहे.

 • शेती विकत घेत असताना, शेतीला रस्ता असल्याची खात्री करून घ्या. कारण बरेच दा रस्ता हा दुसऱ्याच्या शेतातून असतो. यामुळे त्या शेतकऱ्याची रस्ता करिता काहीच हरकत नाही असे त्याकडून लिहून घ्या.
 • प्रेम संबंध म्हणून आधी रस्ते असायचे, आता नाही आता प्रेम सबंध लोक जपत नाही. लवकरच कोर्टात जातात म्हणून आधीच या वर लक्ष देवून ही गोष्ट ठीक करून घ्या. 
 • खरेदी खत तयार करून घ्या. या करिता तुम्हाला तालुक्यातील निबंधक कार्यालयात जावे लागेल. तिथ जावून काही शुल्क भरून खरेदी खत तयार करून मिळते.
 • खरेदी खत मध्ये ज्या व्यक्ती कडून आपण जमीन विकत घेत आहे. त्याच नाव आणि जमिनीची हद्द व चतू सीमा तपासून घ्या. 

शेतकरी मित्रांनो, या गोष्टी वर लक्ष देवून तुम्ही जमिनीचा व्यवहार अचूक रित्या करू शकता, आपल्याला जमीन व्यवहार मधील काही समजत नसल्यास कुठल्या जाणकार व्यक्ती ला सोबत घेवून हे व्यवहार करावे.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Knowledge

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *