अडला हरी गाढवाचे पाय धरी | |
एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. | |
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा | |
जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही. | |
अंगावरचे लेणे, जन्मभर देणे | |
दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे. | |
असतील शिते तर जमतील भूते | |
एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात. | |
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ | |
दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. | |
अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज | |
गरजवंताला अक्कल नसते. | |
अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे | |
दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे. | |
अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण | |
मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. | |
अंधारात केले, पण उजेडात आले | |
कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच. | |
अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे | |
नाव मोठे लक्षण खोटे | |
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था | |
अशक्यकोटीतील गोष्टी | |
अती झाले अन आसू आले | |
एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते | |
अतिपरिचयात अवज्ञा | |
जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो. | |
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे | |
कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच | |
अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास | |
अन्न न खाणे, पण त्यात मन असणे. | |
अपापाचा माल गपापा | |
लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. | |
अर्थी दान महापुण्य | |
गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. | |
आईची माया अन् पोर जाईल वाया | |
फार लाड केले तर मुले बिघडतात. | |
आधी पोटोबा मग विठोबा | |
प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देव – धर्म करणे. | |
आपलेच दात आपलेच ओठ | |
आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. | |
आयत्या बिळावर नागोबा | |
एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. | |
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे | |
अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे | |
आपण हसे लोळायला, शेंबूड आपल्या नाकाला | |
ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो, तो दोष आपल्या अंगी असणे | |
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास | |
मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे. | |
आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं | |
एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. | |
आंधळ्या बहिर्यांची गाठ | |
एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणार्या दोन माणसांची गाठ पडणे. | |
अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी ? | |
चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही, उलटी ती दुसऱ्याच्या माथी मारून मारून मोकळे व्हायचे. | |
अडली गाय फटके खाय | |
एखादा माणूस अडचणीत सापडला, की त्याला हैराण केले जाते. | |
आपला हात जगन्नाथ | |
आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. | |
असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा | |
अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. | |
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? | |
कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. | |
अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप | |
अतिशय उतावळेपणाची कृती. | |
अती खाणे मसणात जाणे | |
अति खाणे नुकसानकारक असते. | |
अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी | |
मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. | |
अवचित पडे, नि दंडवत घडे | |
स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. | |
अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे | |
एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू. | |
अंथरूण पाहून पाय पसरावे | |
आपली ऐपत, वकूब पाहून वागावे. | |
अंगापेक्षा बोंगा मोठा | |
मूळ गोष्टींपेक्षा अनुषांगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. | |
आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे | |
स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे. | |
आपली पाठ आपणास दिसत नाही | |
स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत. | |
आजा मेला नातू झाला | |
एखादे नुकसान झाले असता, त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे. | |
आत्याबाईला जर मिशा असत्या तर | |
नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे. | |
आपल्याच पोळीवर तूप ओढणे | |
फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. | |
आलिया भोगासी असावे सादर | |
तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. | |
आवळा देऊन कोहळा काढणे | |
आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे. | |
आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही | |
अनुभवाशिवाय शहाणपण नसते. | |
आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन | |
दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. | |
आधीच तारे, त्यात गेले वारे | |
विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. | |
आधीच मर्कट तशातही मद्य प्याला | |
आधीच करामती व त्यात मद्य प्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते. | |
अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा | |
मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचाच खर्च जास्त असणे. | |
आग रामेश्वरी, बंब सोमेश्वर | |
रोग एकीकडे, उपाय भलतीकडे. | |
आयजीच्या जीवावर बायजी उदार | |
दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. | |
आग खाईल तो कोळसे ओकेल | |
जशी करणी तसे फळ | |
आठ पूरभय्ये नऊ चौबे | |
खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे. | |
आधणातले रडतात व सुपातले हसतात | |
संंकटात असतानाही दुसर्याचे दुःख पाहून हसू येते. | |
इन मीन साडेतीन | |
एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. | |
इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते | |
इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. | |
इच्छा परा ते येई घरा | |
आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे. | |
इकडे आड तिकडे विहीर | |
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. | |
ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो | |
जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच. | |
उथळ पाण्याला खळखळाट फार | |
अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. | |
उंदराला मांजर साक्ष | |
ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. | |
उचलली जीभ लावली टाळ्याला | |
दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे | |
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग | |
अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे. | |
उठता लाथ बसता बुक्की | |
प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हापुन्हा शिक्षा करणे. | |
उडत्या पाखराची पिसे मोजणे | |
अगदी सहज चालता – चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. | |
उतावळी बावरी (नवरी) म्हातार्याची नवरी | |
अति उतावळेपणा नुकसान कारक असतो. | |
उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरी | |
जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. | |
उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले | |
फायद्याची वेळी येणे; पण लाभ न घेता येणे. | |
ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे | |
अतिशय हलाखीची स्थिती. | |
उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी | |
प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. | |
उकराल माती तर पिकतील मोती | |
मशागत केल्यास चांगले पीक येते. | |
उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला? | |
एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. | |
उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती? | |
जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे. | |
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक | |
एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते. | |
उधारीची पोते, सव्वा हात रिते | |
उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. | |
उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे | |
श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच. | |
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे | |
येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे. | |
उसाच्या पोटी कापूस | |
सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती. | |
ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये | |
कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. | |
एका माळेचे मणी | |
सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे. | |
एका हाताने टाळी वाजत नाही | |
दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही. | |
एक ना धड भाराभर चिंध्या | |
एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. | |
एकावे जनाचे करावे मनाचे | |
लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे. | |
एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी | |
दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. | |
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये | |
दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. | |
एका पिसाने मोर होत नाही | |
थोड्याश्या यशाने हुरळून जाणे | |
एका खांबावर द्वारका | |
एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. | |
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला | |
एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. | |
एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी | |
बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य | |
एका मान्यात दोन तलवारी राहात नाहीत | |
दोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत. | |
ऐंशी तेथे पंचाऐंशी | |
अतिशय उधळेपणाची कृती. | |
ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार | |
मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्यात असतात. | |
ओळखीचा चोर जीवे न सोडली | |
ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. | |
ओढ फुटो (तुटो) किंवा खोकाळ फुटो/ शेंडी तुटो की तारंबी तुटो | |
कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे. | |
ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे? | |
सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे. | |
औटघटकेचे राज्य | |
अल्पकाळ टिकणारी गोष्ट. | |
करावे तसे भरावे | |
जशी कृती केली असेल त्याप्रमाणे फळ मिळणे. | |
कर नाही त्याला डर कशाला ? | |
ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही, त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे ? | |
करीन ते पूर्व | |
मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे. | |
करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते | |
काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते. | |
करुन करुन भागला, देवध्यानी लागला | |
भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपुजेला लागणे. | |
कणगीत दाणा तर भिल उताणा | |
गरजेपुरते जवळ असले, कि लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत. | |
कधी तुपाशी तर कधी उपाशी | |
सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही. | |
कशात-काय-अन-फाटक्यात-पाय | |
वाईटात आणखी वाईट घडणे | |
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही | |
रक्ताचे नाते मोडू तोडू म्हणता तुटत नाही. | |
काडीचोर तो माडीचोर | |
एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाची संबंध जोडणे | |
काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती | |
गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो. | |
का ग बाई रोड (तर म्हणे) गावाची ओढ | |
निरर्थक गोष्टींची काळजी करणे. | |
कानात बुगडी, गावात फुगडी | |
आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. | |
काल महिला आणि आज पितर झाला | |
अतिशय उतावळेपणाची वृत्ती | |
काकडीची चोरी फाशीची शिक्षा | |
अपराध खूप लहान; पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे. | |
काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही | |
जे काम भरपूर पैसा आणि होत नाही, ते थोड्याश्या अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते. | |
कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते | |
पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे. | |
मल्हारी माहात्म्य | |
नको तिथे नको ती गोष्ट करणे. | |
काना मागुन आली आणि तिखट झाली | |
श्रेष्ठ पेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. | |
कामापुरता मामा | |
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. | |
कावळा बसला आणि फांदी तुटली | |
परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे | |
काखेत कळसा गावाला वळसा | |
जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे. | |
काप गेले नी भोके राहिली | |
वैभव गेली अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या | |
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही | |
शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते. | |
काळ आला, पण वेळ आली नव्हती | |
नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. | |
कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात | |
चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. | |
कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा | |
दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो; आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. | |
कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे | |
मूळचा स्वभाव बदलत नाही. | |
कुडी तशी फोडी | |
देहा प्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. | |
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ | |
स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. | |
केळीला नारळी अन घर चंद्रमौळी | |
अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे. | |
केस उपटल्याने का मढे हलके होते ? | |
जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही. | |
केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले | |
एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो. | |
कोळसा उगाळावा तितका काळाच | |
वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते. | |
कोल्हा काकडीला राजी | |
लहान लहान गोष्टींनी खुश होतात. | |
कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी | |
चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला | |
कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी | |
महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे. | |
खऱ्याला मरण नाही | |
खरे कधीच लपत नाही. | |
खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते | |
खर्च करणार्याचा खर्च होतो; तो त्याला मान्य ही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो. | |
खाऊ जाणे तो पचवू जाणे | |
एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास ही समर्थ असतो. | |
खान तशी माती | |
आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे. | |
खायला काळ भुईला भार | |
निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो | |
खाई त्याला खवखवे | |
जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. | |
खाऊन माजावे टाकून माजू नये | |
पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये. | |
खोट्याच्या कपाळी गोटा | |
खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. | |
गरज सरो, वैद्य मरो | |
एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे. | |
गळ्यात पडले झुंड हसून केले गोड | |
गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागते. | |
ग ची बाधा झाली | |
गर्व चढणे | |
गरजेल तो पडेल काय | |
केवळ बडबडणार्या माणसाकडून काही घडत नाही. | |
गरजवंताला अक्कल नसते | |
गरजेमुळे अडणार्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते. | |
गर्वाचे घर खाली | |
गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. | |
गळ्यातले तुटले ओटीत पडले | |
नुकसान होता होता टळणे. | |
गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता | |
मुर्खाला कितीही उद्देश केला तरी त्याचा उपयोग नसतो. | |
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा | |
मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. | |
गाढवाला गुळाची चव काय ? | |
ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. | |
गाढवाच्या पाठीवर गोणी | |
एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा. | |
गाव करी ते राव न करी | |
श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. | |
गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ | |
मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो. | |
गाय व्याली, शिंगी झाली | |
अघटित घटना घडणे. | |
जळे आणि हनुमान बेंबी चोळे | |
दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे | |
गोगलगाय न पोटात पाय | |
बाहेरून दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती. | |
घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे | |
अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे | |
घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात | |
एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. | |
घरोघरी मातीच्या चुली | |
एखाद्या बाबतीत सामान्यता सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. | |
घर ना दार देवळी बिर्हाड | |
शिरावर कोणती जबाबदारी नसलेली व्यक्ती. | |
घडाई परिस मडाई जास्त | |
मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे. | |
घेता दिवाळी देता शिमगा | |
घ्यायला आनंद वाटतो तर द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब. | |
घोडे कमावते आणि गाढव खाते | |
एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैर फायदा घ्यावा. | |
चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ | |
मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे. | |
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे | |
प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच. | |
चार जणांची आई बाजेवर जीव जाई | |
जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही. | |
चिंता परा येई घरा | |
दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले, कि ते आपल्यावरच उलटते. | |
चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला | |
स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे. | |
चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई | |
घरात तेवढा शूर पणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे. | |
चोर सोडून संन्याशालाच फाशी | |
खर्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे. | |
चोराच्या उलट्या बोंबा | |
स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. | |
चोरावर मोर | |
एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. | |
चोरांच्या हातची लंगोटी | |
ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेतरी मिळणे. | |
चोराची पावली चोराला ठाऊक | |
वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. | |
चोराच्या मनात चांदणे | |
वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते. | |
चालत्या गाडीला खीळ | |
व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे. | |
जशी देणावळ तशी धुणावळ | |
मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. | |
जलात राहून माशाशी वैर करू नये | |
ज्यांच्या सहवासात रहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये. | |
जळतं घर भाड्याने कोण घेणार ? | |
नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार ? बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार ? | |
जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही | |
बाह्य देखाव्याने माणूस ज्ञान होत नाही. | |
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे | |
दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते. | |
जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले | |
जितेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोड कौतुक करायचे. | |
जेवेण तर तुपाशी नाही तर उपाशी | |
अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाची वागणे. | |
जे न देखे रवि ते देखे कवी | |
जे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो. | |
जो गुळाने मरतो त्याला विष कशास ? | |
जिथे गोड बोलून काम होते तिथे जालीम उपायांची गरज नसते. | |
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी | |
एकच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणची असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. | |
ज्याच्या हाती ससा, तो पारधी | |
ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. | |
ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे | |
एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो. | |
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी | |
जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे. | |
झाकली मूठ सव्वा लाखाची | |
व्यंग नेहमी झाकून ठेवावे. | |
टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाही | |
कष्ट सोसल्याशिवाय मोठेपण येत नाही. | |
डोळ्यात केर आणि कानात फुंकर | |
रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी. | |
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही, पण गुण लागला | |
वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. | |
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा | |
वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात. | |
तळे राखील तो पाणी चाखील | |
ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यापासून काहीतरी फायदा करून घेणारच. | |
तरण्याचे कोळसे, म्हातार्याला बाळसे | |
अगदी उलट गुणधर्म दिसणे. | |
तट्टाला टूमणी, तेजीला इशारत | |
जी गोष्ट मूर्खाला शिक्षेने ही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते. | |
ताकापुरते रामायण | |
एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे. | |
तीन दगडात त्रिभुवन आठवते | |
संसार केल्यावरच खरे मर्म कळते. | |
तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही | |
चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत. | |
तुकारामबुवांची मेख | |
न सुटणारी गोष्ट | |
तू दळ माझे आणि मी दळण गावच्या पाटलाचे | |
आपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात. | |
तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले | |
मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. | |
तेरड्याचा रंग तीन दिवस | |
कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते. | |
तोंड दाबून बुक्क्यांचा मार | |
एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे. | |
तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे | |
खायला पुढे कामाला मागे. | |
थेंबे थेंबे तळे साचे | |
दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो. | |
थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान | |
मोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. | |
दगडापेक्षा वीट मऊ | |
मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो. | |
दस की लकडी एक्का बोजा | |
प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते. | |
दहा गेले, पाच उरले | |
आयुष्य कमी उरणे. | |
दात कोरून पोट भरत नाही | |
मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही. | |
दाम करी काम, बिवी करी सलाम | |
पैसे खर्च केले की कोणतेही काम होते. | |
दाखविलं सोनं हसे मुल तान्हं | |
पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात. | |
दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत | |
एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूलन नसणे. | |
दिल चंगा तो कथौटी में गंगा | |
आपले अंतःकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याजवळ असते. | |
दिव्याखाली अंधार | |
मोठ्या माणसातदेखील दोष असतो. | |
दिल्ली तो बहुत दूर है | |
झालेल्या कामाचा मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे. | |
दिवस बुडाला मजूर उडाला | |
रोजाने व मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार ? त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार. | |
दुरून डोंगर साजरेदुरून डोंगर साजरे | |
कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते. | |
दुभत्या गाईच्या लाथा गोड | |
ज्याच्या पासून काही लाभ होतो, त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो. | |
दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही | |
दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष जात नाही. | |
दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागते | |
एखाद्या बाबतीत अद्दल घडली, की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे. | |
देश तसा वेश | |
परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन. | |
देव तारी त्याला कोण मारी ? | |
देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही. | |
देखल्या देवा दंडवत | |
सहज दिसले म्हणून चौकशी करणे. | |
देणे कुसळांचे घेणे मुसळाचे | |
पैसे कमी आणि काम जास्त. | |
देवा दंडवत | |
एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे. | |
दैव देते आणि कर्म नेते | |
नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते. | |
दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी | |
नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते. | |
दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला | |
नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे | |
दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई | |
नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात. | |
दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी | |
दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या चे काम होत नाही. | |
दृष्टीआड सृष्टी | |
आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. | |
धर्म करता कर्म उभे राहते | |
एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते. | |
धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी | |
कोणत्याच कामाचे नसणे. | |
धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा | |
छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठी कडे दुर्लक्ष करणे. | |
धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या | |
गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते. | |
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने | |
दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात | |
नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये | |
नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच. | |
न कर्त्याचा वार शनिवार | |
एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो. | |
नऊ दिवस | |
कोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे. | |
नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे | |
केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार. उपदेशाचा शून्य परिणाम होणे. | |
नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे | |
एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे | |
नाकापेक्षा मोती जड | |
मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे | |
नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा | |
नाव मोठे लक्षण खोटे. | |
नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे | |
देवाच्या नावाने स्वार्थ जपणे. | |
नाक दाबले, की तोंड उघडते | |
एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला, की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते. | |