प्रित कळली रे मना (मराठी प्रेम कथा)

marathi story / love in marathi / love story in marathi

marathi-love-story

मराठी कथा

प्रित कळली रे मना…..

फॅशन…….फॅशन म्हटलं की तुमच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी येत असेल जसे की कपड्यांची, केसांची, इत्यादी इत्यादी….

आज काल एक नवीन फॅशन मुलींनी चालवलेली आहे. याच फॅशन बद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. कथा चालू करायच्या आधी सांगू इच्छितो….की ही कथा एक काल्पनिक नसून याचा आपल्या जीवनाशी संबन्ध असू शकतो. आणि नक्की असल्यास याला योगायोग ना समजता सिरीयस घ्यावे…..


जोरदार स्कुटीचा ब्रेक लागल्यामुळे सररर असा आवाज झाला. त्याच आवाजाला का साद देत एक कठोर आवाज ऐकू आला.
” ए……. बावळट तुला दिसत नाही का?”

“ओ……मॅडम हे मी तुम्हाला म्हणायला पाहिजे, आणि हो देवाने डोळे आपल्याला सोमरून दिलेत मागून नाहीत. आम्ही तुमच्या समोर होतो.

आपल्या चेहऱ्यावर चा स्कार्प सांभाळत ती हळूच गुणगुणली. “नालायक कुठला..”

“ओ…..नालायक म्हणायचं काम नाही! तुझ्या मैत्रिणीला समजत नाही का? गाडी आहे म्हणून किती पण तीचा कान पिरगळायचा का? काही स्पीड लिमिट आहे की नाही. पायदळी लोकांना तुम्ही का अस तुडवणार?”

“तू शहाणपण नको शिकू आम्हाला…!”

गाडी चालवणारी ती तर गाडीच्यामध्ये येणार तो शांत. गाडीच्या मागे बसणारी आणि त्याचा सोबती हे दोघेच जास्त वाजत होते. या दोघांचे दूरवर काही संबंध नसतांना, यांचे भांडण चालूच होते. तर गुन्हा असणारे ते दोघे शांत उभे होते.

ती तिच्या मैत्रिणीला सांभाळत होती, तर हा त्याच्या मित्राला.बऱ्याच वेळ पासून चालू असलेल्या भांडणाचा एकदाचा शेवट झाला.


“शीट यार…..” कंटाळलेल्या स्नेहाने आपल्याच कपाळाला पेन मारत म्हणाली.

“काय झालं……?” मृणाल ने विचारले.

“काय करू यार…..सबमिशन जवळ आलंय. एक्साम ची तयारी पण करायची आहे. हे प्रॅक्टिकल आणि असायमेन्ट कधी लिहू?” स्नेहा कंटाळवाण्या स्वरात म्हणाली.

“ह…..आत्ता कस….? माझं सर्व प्रॅक्टिकल आणि असायमेन्ट पूर्ण झालं.” मृणाल थोडी गुर्मीतच बोलली.

लगेचच कोड पडल्यासारखी स्नेहा म्हणाली. “ते कसं?”

“अरे…मी कामावर माणूस ठेवलाय….तुला म्हणत होते, पण तू नाही ऐकलस आत्ता भोग तुझ्या कर्माची फळं.”

“तुला सरळ सांगायचं असेल तर सांग, नाहीतर राहूच दे.” स्नेहा चिडत म्हणाली.

“अग…. मी प्रदीप बद्दल बोलतेय. मी त्याच्या सोबत थोडं जरी प्रेमानं बोललेना तर तो काही पण करायला तयार होतो. माझं प्रॅक्टिकल, असायमेन्ट तोच पूर्ण करतो, तेच काय तर माझ्या मोबाईल रीचार्जे पण तोच करतो.” मृणाल आत्मविश्वासाने स्नेहाला सांगत होती.

“तुला तर म्हटलं, की एखादा नोकर ठेव म्हणून. एखादा मुलगा बघून त्याच्या सोबत थोडं जरी गोड बोललीस की झालंच समज तुझं काम!”

“नको ग बाई….मला अशातला काही नाही जमत.” स्नेहा थोडी संकोचात्मक च बोलली.

“यात नाही जमायसारखं काय आहे? वेडे तुझं सर्व काम करेल तो. आणि तुला भरपूर वेळ मिळेल अभ्यासाला!’ मृणालचे गुरू ज्ञान देने चालूच होते.

आणि तिच्या हितुपदेशचा हळूहळू फरक स्नेहावर जाणू लागला. न राहून थोड्या वेळाने स्नेहाने मृणाल ला विचारले.
“आणि तो मुलगा माझ्या बद्दल सिरीयस झाला तर….?”

“सिरीयस वेरीयस काही नाही ग….फक्त शिकार बघून करायची!”

“म्हणजे मी समजली नाही?” स्नेहाने संशयास्पद विचारणा केली.

“तू ना…..तुझं कस व्हायचं देवच जाणे…. अग माझी आई….शिकार म्हणजे साधा सरळ मुलगा…..प्रदीप सारखा बघायचा एखादा. आणि मी तुझ्यासाठी एक मुलगा बघून पण ठेवलाय….”
डोळे मोठे करत स्नेहाने विचारले. ” कोणता मुलगा?”

“अग….तो त्या दिवशी तू त्याला स्कुटी ने धडक देणार होतीस तो.”

“आ…. तो का?” स्नेहा भूतकाळात डोकावून पाहत होती.

“आ…. तो का? ते जाऊ देत, तो बेस्ट आहे तुझ्यासाठी. तो खूप साधा पण आहे. तुला त्याच्यापासून काही धोका पण नाही.”

“धोका नाही म्हणजे…?” स्नेहाने प्रश्नार्थक विचारले.

“तुना येडी आहेस….अग मला म्हणायचं आहे….की तो तुला…………कस समजावून सांगू तुला…. अ…..
अ……..”

“काय अ……अ…. जरा स्पष्ट सांग.”

“म्हणजे जे प्रेमी कपल करतात त्यातलं काही….ते तुझ्या सोबत होण्याची शक्यता नाही.”मृणाल ने एका दमात सर्व सांगून मोकळी झाली.”

“म्हणजे मी का इतकी वाईट आहे…?” स्नेहा रागात म्हणाली.

मृणाल स्वतःच्या डोक्यावर हात मारत म्हणाली.” वाईट चा प्रश्न नाही. मला म्हणायचं आहे की तो मुलगा शांत स्वभावाचा आणि गरीब आहे.

राहाला तुझा प्रश्न तर त्याला आहे तुझा धोका…..” मृणाल मस्करी करत म्हणाली.

“झालं का तुझं आत्ता चालू…. ?” स्नेहा रागात बोलत होती.
“आणि शांत आहे म्हणजे? तूला कस माहीत की तो शांत आहे?” परत स्नेहाने प्रश्न केला.

“अग… त्या दिवशी तो आपल्या स्कुटीच्या सामोर आला तसा गुन्हा तुझाच होता. तू सरळ त्याच्या अंगावर नेणार होतीस पण थोडक्यात वाचलो आपण …..पण त्या दिवशी तो काही एक नाही म्हणाला पण त्याचा मित्र जरा जास्तच वाजत होता.

मनात आलं की त्याचे एक पंच मध्ये दातच पडायचे.” मृणाल राग कंट्रोल करत म्हणाली. मृणालचे वाक्य ऐकताच स्नेहा हळूच गालात हसली.

मृणाल परत मुद्यावर येत म्हणाली.” ते जाऊ दे,तर तू तयार आहेस ना? मृणाल एक्साईट होऊन म्हणाली.

“मृणाल तू खरच बरोबर बोललीस…..माझं कस होणार ? तुझ्या सारखी मैत्रीण मिळाली. आत्ता भोगते कर्माची फळं.” अस म्हणत स्नेहाने मृणालच्या पाठीवर चापट मारली. दोघी पण एकदम हसल्या.


“मला ना खूप भीती वाटतेय… मी जाते घरी….” स्नेहा घाबरतच म्हणाली.

“ए… थांब…..यात भ्यायच काय? मी आहे ना डोन्ट वारी!”

“याचीच तर भीती आहे!” स्नेहा परत थट्टाच्या भावात बोलली.

“बर ….माझी आई…आत्ता इकडे लक्ष दे… तो याच रस्त्याने येईल. लक्ष ठेव म्हणजे झालं!” मृणाल इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाली.

“तो आला तर काय करायचं?” तिने प्रश्नार्थक मृणाल ला विचारले.

“परवा सारखी स्कुटी सरळ त्याच्या अंगावर न्यायची, आणि त्याला उडवून पळून जायचं. माझी आई……!” स्वतःच डोकं बडवत मृणाल म्हणाली.

“अग तो आला तर काय करू इतकंच विचारलं ना……,नाहीतर जाऊ देत……”अस म्हणत स्नेहा तेथून निघाली. मृणाल तिचा हात खेचत म्हणाली. ” अग सॉरी…..मी सांगते….! तो आला की त्याच्याकडे जायचं आणि त्या दिवशी झालेल्या प्रकारा बद्दल सॉरी म्हणायचं.”

रस्त्याच्या कडेला स्कुटी लावून बऱ्याच वेळ पासून या दोघी त्या मुलाची वाट पाहत होत्या. तो भेटल्यावर काय बोलायचं व त्याला आपल्याकडं कस आकर्षीत करायचं हे मृणाल स्नेहाला पटवून सांगत होती. मैत्रीचं नेमक असच असत.

खड्यात उतरायला हात असतो की खड्यातून बाहेर खेचायला हे नक्की कळत नाही….पण हात नेमका असतो.

“बघ तो आला…..!”

“ए बावळट जरा हळू बोल….!” स्नेहा रागाने मृणाल ला म्हणाली.

स्वतःच्या विचारात तो एक एक पाऊल पुढं टाकत येतांना त्यांना तो दिसला. ठरल्या प्रमाणे सर्व काही कृती घडायला लागली. आणि स्नेहा त्याच्या पुढ्यात येऊन उभी झाली.

“हाय….”

चालणाऱ्या पावलांनी आत्ता विराम घेतला व तो तिच्याकडे संशयास्पद नजरेने पाहू लागला. परत न राहून स्नेहाने त्याला “हाय…” म्हटले. पण त्याचा काहीच प्रतिसाद न पाहून ती पुढे म्हणाली.

“परवा झालेल्या प्रकाराबद्दल सॉरी… म्हणायचं होत. चूक माझीच आहे, पण तुझा फ्रेंड आणि माझी फ्रेंड मध्येच वाद झाल्याने मला त्या दिवशी काही सुचलं नाही. म्हणून आज सॉरी….म्हणायला आली मी तुला.”

ती बोलत होती, पण तिचे शब्द अडखडत होते. जणू काही मोठा गुन्हाच केला किंवा करणार…… तिचे अडखडलेले बोलणे दुरून पाहत मृणाल स्वतःचेच डोके हातानी बडवून घेत होती.

पण तो “बर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही.”अस म्हणून निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एक टक पाहत ती उभी होती. आणि अचानक मागून तिला आवाज आला.

“ए मॅडम झालं काय पाहून?”
भानावर येत स्नेहा फिरली तर तिला तो नेहमीचा चेहरा सामोर दिसला. सामोर मृणाल उभी होती आणि तिची चौकशी करत होती.

“काय ग….झालं का काम..?”

“हो झालं की.”

“काय म्हणाला तो…?”

“काही नाही….ठीक आहे म्हणाला तो, त्याच्या मनात त्या दिवसा बद्दल राग नाहीय.”

“अजून काही बोलला का..?”

“नाही…”

“सत्यानाश….सर्व प्लॅन फसला आपला….तू ना पक्की येडी आहेस. मलाच यायला पाहिजे होत सोबत तुझ्या…!”जाऊ दे आत्ता..चाल लवकर त्याचा पाठलाग कर काय करतो ..?, कुठे राहतो…? सर्व बघव लागेल.”

त्याची पायदळ वारी तर यांची स्कुटी सारख्या घोड्यावरण. तो पुढे तर या मागे असा सर्व प्रकार चालू आणि अचानक स्कुटी चे ब्रेक लागले. दोघी एकमेकींना बघत सोबतच पुटपुटल्या.

“मेलो आत्ता…..”

तो नेमका त्याच ट्युशन क्लास चा विध्यार्थी होता, जेथे या दोघींना शेवटचे जाऊन सहा ते सात दिवस झाले होते. नाईलाजाने त्या दोघी पण त्याच्या मागोमाग क्लास मध्ये गेल्यात. क्लास मध्ये जाताच सरांनी या दोघींचे स्वागत केले.

“या….या…. पाहुणे आज वाट कशी चुकलात. आज दिवस कोणी कळून उजाडला….आज बरी आठवण झाली क्लास ची.! या आत दरवाज्यात उभ्या राहून काय आरतीच्या थाळीची वाट पाहताय काय… बसा जाऊन..!”

या वाक्यांनी सर्व क्लास खो खो हसायला लागला. सर परत मुद्यावर येत म्हणाले. “बास….. तर कुठे होतो आपण….?”

परत एकदाच क्लास सुरू झाला. या दोघी मुद्दाम त्याच्याच मागे जाऊन बसल्या.
प्रश्नाचा सडा तर उत्तरांचा वर्षाव क्लास मध्ये होत होता. दोघींना कळून चुकले.

“इतक्या दिवसापासन आपण पुढे बसायचो, तर बॅक साईड कळून उत्तर हा द्यायचा तर…..स्नेहा तुझी तर लॉटरी लागली.!”

दोघीच्या पण चेहऱ्यावर समाधान होते…म्हणजे शिकार काँफॉर्म झाली होती, फक्त ती कधी करायची प्लॅंनिंग मृणालच्या डोक्यात चालू झाली होती.

एक एक दिवस लोटत गेला. एके दिवशी स्नेहा किंचाळी फोडतच मृणालच्या घरी आली.

“शंतनू……” स्नेहा धापा टाकत म्हणाली.

“काय…?” प्रश्नार्थक चेहरा करत मृणालने विचारलं.

“अग….. त्याच नाव शंतनू आहे …..आणि आमच्यात मैत्री पण झाली.

” हे कधी घडलं…..?”

“आत्ता आठवडा झाला असेन.”

“आणि तू मला आत्ता सांगतेस…?”

“अग तोच म्हणाला कुणाला आपण फ्रेंड आहे म्हणून सांगू नकोस.” स्नेहा स्पष्टीकरण देत होती.

“वा…. मैत्रीचे चांगले पांग फेडलेस….! त्याच्या सांगण्यावरून आपली जुनी फ्रेंडशिप विसरलीस तू….काय एक एक नवीनच चालायला तुझं तर….पाहशील नाहीतर प्रेमात पडशील त्याच्या!” मृणाल खांदे उडवत म्हणाली.

“आत्ता झालं का तुझं लेक्चर चालू……?”

“बर जाऊ दे… आणि हो मला आधीच तुझ्यावर संशय आला. क्लास टेस्ट मध्ये तो फर्स्ट तर तू सेकंड कशी आलीस..तेव्हाच माझा लाईट लागला..काय ग मला विसरलीस वाटत, मला फक्त तीन मार्क्स…..बर ते जाऊ दे अजून काय म्हणतो तो…?

“अस विशेष काही नाही, तो मला म्याथ मध्ये अडचण आल्यास क्लिअर करतो, शान आहे ग तो…!”

“पाहशील जरा जपून, फक्त कामाशी काम ठेवायच.” मृणाल डोळे मोठे करत म्हणाली.

“हो ग माझी आई….” या वाक्याने दोघी पण हसायला लागल्या.


एक्साम चे दिवस जवळ आल्यामुळे विनय आणि अजय जोरात अभ्यासाला लागले होते तर त्यांचा तिसरा रूम मेट त्यांच्याच बाजूला झोपा काढतांना पाहून विनय पुटपुटला.

“बघ ना किती शांत झोपला…..! याच नेहमी असच असत, हा डेली अभ्यास करतो आणि एक्साम ला झोपा काढतो, आपण बघा सेमिस्टर भर झोपा आणि एक्सामच्या वेळेला अख्खी रात्र जागतो.

त्यालाच साद देत अजय पण म्हणाला. ” हो ना राव याचा एक्साम च्या आधीच सर्व अभ्यास करून झालेला असतो.

बोलता बोलता अजय च लक्ष शंतनू च्या डोक्याजवड ठेवलेल्या डायरी वरती गेल. त्याने हळूच ती डायरी घेतली व विनय च्या म्हटल्यावरून अजय डायरी चे एक एक पान वाचू लागला.

सर्व पान वाचून झाल्यावर ….विनय उठला आणि झोपलेल्या शंतनू च्या एक कंबरीत लात घातली.

“उठ साल्या….. तुला तर चौकात नेऊन हाणला पाहिजे. नाटक करतोस …..? आमच्या समोर भोळा बनतोय? हरामखोर….. मित्राच्या नावाखाली कलंक आहेस तू…..इतकं सर्व झालं तरी तू आम्हाला थोडा पण सुगावा नाही लागू दिलास.”

त्यालाच सोबत म्हणून अजय म्हणाला. “अजून एक लात हान त्याच्या!”

हा नेमका काय प्रकार चाललाय हे शंतनू च्या लक्षात येत नव्हता. तो चुपचाप बेड वर बसून एका गुन्हेगार प्रमाणे दोघांचं ऐकत होता.

तोच तितक्यात त्याच लक्ष अजय च्या हाती असलेल्या डायरीवर गेलं. तशीच त्याची नजर जमिनीला खिळली. त्याच्या सर्व प्रकार लक्षात आला.

डायरी मध्ये लिहिले होते की……………………

तो दिवस अजून पण मला जसाच्या तसा आठवतो जेव्हा मी तिला फर्स्ट टाइम बघतील. तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो.

AK-47 च्या फायरिंग ( विनय आणि मृणालच्या चालू असलेल्या भांडणाला शंतनू ने AK-47 ची उपमा दिली.) मध्ये पण तिच्या गुलाबाच्या पाकळी सारख्या ओठांतून ते नाजूक शब्द मला अजून पण आठवतात.
“जाऊ देना आपलीच चूक आहे….मृणाल जाऊ दे…..ना…!”

एखाद्या अभिनेत्रीला पण लाजवेल असा तिचा शरीरबाधा.
बऱ्याच मुली बघितल्या पण कधी अस काही जाणवलं नाही…..

त्या प्रत्येक क्षणाला मी तिच्या कडे आकर्षीत होत होतो.
मन म्हणत होत. “हीच ती ज्याची तु वाट पाहत होतास.

तर बुद्धी म्हणत होती. नको…. हे फक्त एक आकर्षण आहे, दुसर काही नाही. प्रेम नेहमी मनावर करायच. सुंदरतेवर नाही.

सुंदरता आज आहे, उद्या नाही. सुंदरता ही पाहुण्यासारखी असते, चार दिवसाची.
माझे आदर्श घेऊन चाललो तर मन म्हणत होत की तिला आपलसं करून घ्याव. तर बुद्धी म्हणत होती, की नाही सध्या तिची पारख कर नंतरच पुढं काही…..

मनावर बुद्धीने विजय मिळवला होता. सध्या आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. पण तिला या नात्याला काही तर नाव द्यायचं आहे, हे मी जाणतो म्हणून मी इच्छा नसतांना मी तिला टाळतो. का तर ती माझ्या बुद्धीच्या परीक्षेत अजून पास नाही झाली.

तीच पण प्रेम माझ्या बद्दलच एक आकर्षण च असेल.एक एक दिवस मी खुंटमळात जगतो. कारण माझी बुद्धी मला तस करावयास भाग पाडते.

कारण माझ्या मनात एक भीती आहे…आज काल एक फॅशन झाली….बॉयफ्रेंड बदलायची त्यात माझा नंबर नको.

शेवटी तिने एक दिवस मला प्रपोस केलं. आत्ता तर माझं पार संतुलनच हलल . आत्ता मी तिला आधी पेक्षा जास्त टाळायला लागलो…….

विनय परत ओरडला. “माझ्या आणि तिच्या खडूस मैत्रिणीच्या भांडणाला तू AK-47 फायरिंग लिहिलंस.”

अजय आणि शंतनू जोरात असायला लागले. विषय बदलावतच अजय म्हणाला. “अरे…पण तिच्या प्रपोस चा रिप्लाय कधी देणार आहेस तू?”

“बघू माझ्या परीक्षेत पास झाली ती तर देणार…..देव करो हे सर्व लवकर होवो.

विनयनी शनकात्मक एकदम विचारले. ” आणि नाही झाली तर…?”

“मग कधीच नाही…..!” शंतनू आत्मविश्वासाने म्हणाला.

विनय आता परत रागात ओरडला. ” तुझ्या तर तू लय शहाणा झालास वाटत….अजय हान त्याला एक अजून….!”


त्याच्या रूम मध्ये हसणे, खेळणे, दंगा, मस्ती चालू होती तर इकडे स्नेहा च्या पार आयुष्यात बदल झाला होता. शंतनू ने तिला नकार दिल्याने तिचे कशातच लक्ष लागत नव्हते.

सर्व काही तिला चुकल्या चुकल्या सारख भासत होत.आपल्याच जाळ्यात आपण अडकत चाललोय, हे तिला नेहमी भासत होते.

असेच काही दिवसा मागून दिवस गेलेत. स्नेहात झालेला बदल हळूहळू मृणालच्या लक्षात यायला लागला, न राहून मृणालने एक दिवस तिला विचारले.

“काय ग….मी काही दिवसांपासून बघतेय की तुझं कशातच लक्ष लागत नाही, काय…..? नक्की मॅटर काय आहे…?”

“अस काही नाही….!” आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवत स्नेहा म्हणाली.

“अस काही नाही म्हणजे…, लहानपणापासून ओळखतेय मी तुला…काही तरी नक्की भिनसलंय! तू सांगते की जाऊ विचारायला तुझ्या बेस्टफ्रेंड ला, आत्ता तू मला कशी ओळखशील!”

“तुला सांगितलं ना काही नाही म्हणून….!” आपण रागाच्या भरात बोलून गेलोय हे स्नेहाचा लक्षात यायला जास्त वेळ नाही लागला.
“बर जाऊ दे” म्हणत मृणालने स्नेहाच्या घरातून पळता पाय काळला, आणि अचानक स्नेहाने हाक दिली.

” मृणाल….. सॉरी…..काय करू मी तूच सांग आत्ता?”

“म्हणजे” मृणाल तिच्याकडे फिरून म्हणाली.
स्नेहाने मान खाली घातली होती….

मृणाल ने परत तिला विचारले “म्हणजे…? नक्की तू शंतनू च्या प्रेमात वैगरे तर नाही पळलीस ना?

स्नेहाने होकारार्थी मान हलवली. तसाच मृणालले डोक्यावर हात मारला. “तू नक्की पागल तर नाहीयना? तुला फक्त प्रेमाचं नाटक करायचं होतं….तर….तर…तू डायरेक्ट भूमिकेतच प्रवेश केलाय.” मृणाल स्नेहा च्या दोन्ही खाद्याना हलवून हलवून बोलत होती.

“आपलं काय ठरलेलं विसरलीस का तू?” मृणाल चा आत्ता आवाज चढत होता.
“तुला त्याला फक्त नोकरा सारखा वापर करून घ्यायचा होता…आणि तू काय करून बसलीस….माझंच चुकलं तुला असा सल्ला द्यायलाच नको होता. बर प्रपोस त्यांनी केला की तू…..?

” मीच केला…..” स्नेहा घाबरतच म्हणाली.

“म्हणजे त्यात पण पुढाकार तुझाच तर….. अरे देवा….”
बर तो काय म्हणाला?”

“नाही म्हणाला तो…..” बोलता बोलता स्नेहाचे डोळे पाणावले होते. तिच्या शरीरात एक कंप निर्माण झाला होता.

“धन्य….. म्हणजे बरा तो तितका हुशार निघाला ते….! नाहीतर झालंच असत तुझं कल्याण ….तुला समजत आहे ना मी काय बोलत आहे.” क्षणा क्षणाला मृणाल चा आवाज कठोर होत गेला.

“मृणाल तू तरी समजून घे मला…..माझं खर प्रेम आहे ग त्याच्यावर, मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय.

तो माझ्या सोबत एक दिवस जरी नाही बोलाल तर मला चुकल्या चुकल्या सारख वाटत.” स्नेहा मृणाल ला पटवून देण्याचा प्रयत्न करत होती.

“हे प्रेम बीम काही नसतं ग…..हे निव्वळ…..” इतकं बोलून मृणाल च्या शब्दाला विराम लागला. दोघीचे पण लक्ष दाराकडे केलं. दारात शंतनू उभा होता. त्या दोघींचे सर्व संभाषण त्यांनी ऐकले होते.

तो दारात तसाच खिळून उभा होता. इतक्या वेळपासून स्नेहाच्या डोळ्यात साठलेल्या पाण्याचा बांध आता फुटला होता. अश्रू आपले मार्ग काळत तिच्या गालावरून रुळत होते.

ती धावतच शंतनू जवळ गेली. व त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागली.
“तू जे ऐकलस ते खोट आहे….मी तुझा वापर नाही करून घेणार होती….माझं खरच तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे….” बोलता बोलता स्नेहा आता हुंदके द्यायला लागली होती.

शंतनू नावाचं रडार आता मृणाल कडे वळलं होत.
” वा….. मृणाल छान आहे तुझी कल्पना…. प्रेमाबद्दलची.

काय ग….मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायच आणि वाट्टेल ते काम त्याच्या कडून करून घ्यायचे….तुला काय वाटत मुलगा आहे म्हणून त्याला भावना नसता….अस कोठे लिहिलं आहे का?

तुम्ही मुली जरा काही झालं तर रडून देता…..
ते पण आम्ही करू शकत नाही….कारण कोणी तरी लिहून ठेवलं आहे. मर्द को कभी दर्द नही होता. इत्यादी इत्यादी..

त्या मुळेच का तर आपचा फायदा घेता तुम्ही…कारण आमच्या भावना व्यक्त करायला आमच्या कडे तुमच्या सारख साधन (रडणे)नाहीय ना.

आणि हा मृणाल तू प्रेमाबद्दल काय म्हणालीस….तुला प्रेमाबद्दल माहीत आहे का? कधी केलं का कुणावर? सोड एखाद्या दगडाला जरी इतकं बोललो तर त्याला पाजर फुटेल पण तू……” मृणालची लाजेने पार मान खाली गेली होती.

परत तो स्नेहाकडे वळला. उन्हात एखादी थंड हवेची झुळूक यावी तसे शंतनू चे शब्द स्नेहाच्या कानावर पडले.

“आय….लव्ह….यू…..माझं पण तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. सॉरी मी तुला खूप त्रास दिला. स्नेहा त्याच्याकडे आ…वासून बघत होती.

त्याने तिला लगेच आपल्या मिठीत घेतले. ती आत्ता पुरती घाबरली होती. भीती आणि आनंद या मिश्रणात ती नाहून निघाली.

ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोरझोरात हुंदके द्यायला लागली. आणि तो तिच्या कानात हळूच पुटपुटला. “तुझी फ्रेंड बघत आहे…!’

“बघू दे तिला दुसर कामच काय?” अस म्हणत तिने परत मिठी गच्च केली. त्यांचं प्रेम पाहून मृणाल च्या पण डोळ्यात पाणी आलं.
आणि शंतनू मनातल्या मनात पुटपुटला. “माझ्या परीक्षेत तू पासच नाही तर पहिला नंबर मारलास……!”


  • सागर राऊत

हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment