PM Kisan Samman Nidhi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची रक्कम बँक अकाउंट मध्ये आलेली आहे. मात्र असे अनेक शेतकरी 14 व्या हप्त्याबाबत काळजीत आहेत. कारण कि, सात दिवस उलटून गेलेले असता, अजून सुद्धा चौदाव्या हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यात आली नसल्याचे त्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
परंतु, शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची काही गरज नाही. कारण आत्ता 14व्या हप्त्याची स्थिती शेतकरी घरी बसून तपासू शकतात. याकरिता त्यांना आधी pmkisan.gov.in या PM किसानच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
यानंतर Know Your Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.
यानंतर, गेट डेटा या पर्यायावर क्लिक करताच, तुम्हाला हप्त्याशी संबंधित सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. त्याजागी तुम्ही तपशील तपासू शकता. त्यात काही तफावत आढळल्यास त्वरित दुरुस्त करा.
जर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव आणि बँक खात्याचा तपशील चुकीचा भरला असेल, तर यामुळे 14 व्या हप्त्याची रक्कमही आलेली नसेल. त्याकरिता जवळील सेतू वर जाऊन सर्व तपशील त्वरित दुरुस्त करून घ्या.
तसेच, सरकारने पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी आणि जमीन सत्यापन अनिवार्य केले आहे. जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला 14व्या हप्त्याच्या रक्कम मिळणार नाही.
जर तुम्ही या चुका दुरुस्त केल्यात, तर पुढच्या हप्त्यासोबत तुमच्या खात्यात 14 व्या हप्त्याची रक्कम नक्की येईल.
हे वाचलंत का ? –