PM Kisan लाभार्थ्यांसाठी महत्वाची सूचना, अन्यथा शासनाच्या या कारवाईमुळे तुमचेही नुकसान होईल.!
PM Kisan 14th Instalment : शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत शासनाकडून अपात्र लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. परिणामी लाभार्थींच्या संख्येत घट झालेली दिसत आहे.
आकडेवारीवर बघितल्या असता, गेल्या तीन वर्षांत पंजाबमध्ये पीएम किसान योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत ६३ % मोठी घट झाली आहे.
हि परिस्थिती काही दिवसान मध्ये महाराष्ट्रामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० मध्ये शेतकऱ्यांची संख्या हि २३,०१,३१३ वरून घटून एप्रिल-जुलै महिन्याच्या 2023 मध्ये फक्त ८,५३,९६० वर आलेली आहे.
लाभार्थींची संख्या कमी होण्यामागील सर्वात मोठे कारण कि, योजने करीत नियमांचे पालन न करणे तसेच त्यांचे केवायसी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पूर्ण न करणे हे आहे.
हि समस्या का उद्भवली?
शेतकऱ्यांना सरकारकडून वार्षिक 6,000 रुपयांची मदत नाकारण्यात आली. कारण योजनेत निश्चित केलेल्या नियमानुसार त्यांना अटींची पूर्तता करता न आल्याने हा प्रकार घडला. याशिवाय शेतकऱ्यांच्या शासनाकडे मागितलेली माहिती कॉम्पुटर वर अपलोड करता येत नसल्यानेही ही समस्या तयार झालेली आहे.
हे वाचलंत का ? –