शासनाची नवीन योजना गाय म्हशी साठी मिळणार अनुदान, लवकर करा अर्ज

गाय पालन कर्ज योजना

Pashupalan Yojana Maharashtra

पशुसंवर्धन विभाग योजना

Pashupalan Yojana Maharashtra : शेतकरी मित्रांनो, आज बऱ्याच नैसर्गिक संकटांमुळे शेती करणे व पिकाला जगवून त्यामधून आपला वर्षाचा आर्थिक गाडा चालवणे खूप कठीण होत आहे. काही शेतकरी या अश्या संकटांमुळे आज शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याकरिता त्यांचे पाय सरसावत आहेत.

याच गोष्टीला लक्षात घेवून पशु सवर्धनविभाग दरवर्षी गाई व म्हशी वाटप करतात व या खरेदी करण्यावर अनुदान देतात.

शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही. त्यात दरवर्षी या दुग्ध जनावरांच्या किमतीत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे.

यांची वाढलेली किंमत ही लहान सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आर्थिक चौकटी बाहेर जात आहे. त्यामुळे त्यांना गाय म्हैस खरेदी करणे खूप महाग पडत आहे.

येवढे उच्च भाव बघता. आपल्या महाराष्ट्र शासनाने गाय खरेदी वर 70 हजार तर म्हैस खरेदी वर 80 हजार इतके अनुदान देण्याचे ठरवले आहे.

सरकार च्या या निर्णयामुळे छोटे व गरीब शेतकरी आपला दुधाचा व्यवसाय करून त्याच्या परिवाराला व त्या जनावरांना पोसू शकणार आहे. यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न सुद्धा वाढेल अशी आशा शासनाने केली आहे.

ही योजना लवकरच सुरू होणार आहे. ही माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवून आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून गाय म्हशी घ्याव्या असे आवाहन सरकार करत आहे.

या योजने मध्ये आधी गाई करिता 40 व म्हशी करिता 40 हजार दिले जात होते. आज सर्व वस्तूच्या किमती ह्या आकाशाला भिडत आहेत. अश्यात गाई म्हंशीच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत.

यामुळे या वरील अनुदान वाढवून 70 गाई ला व 80 म्हशी करिता देण्यात येत आहे.

या योजने करिता दर वर्षी लोक मोठ्या प्रमाणात अर्ज करतात व त्यांना शासनाकडून गाय म्हशी दिल्या जातात. यावर्षी सुद्धा या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा व गाई म्हशी खरेदी कराव्या.

महागाई लक्षात घेता या वर्षी शासनाने अनुदान वाढवून दिले आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मित्र घेवू शकतात.

पशुपालन लोन ऑनलाइन अप्लाई

या योजने ल अर्ज करण्यासाठी तुमच्या कडे पुढील कागद पत्र असणे गरजेचे आहे. 

  • आधार कार्ड 
  • पासपोर्ट फोटो
  • बँक पासबुक 
  • जातीचा दाखला
  • घोषणापत्र व आपत्य दाखला 

या संकेस्थळावर जावून आपण अर्ज करू शकता.

ही सर्व कागदपत्र आपल्याला आपला नंबर लागल्यास जोडावी लागतील.

शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्या करिता अशी खूप माहिती भविष्यात घेवून येणार आहोत. ती माहिती आपल्या व्हॉट्स ॲप वर मिळवण्याकरिता आमचा ग्रूप जॉईन करा.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Schemes

3 Comments

Ashok narwade · 16/08/2023 at 9:29 pm

व्यवसाय करण्यासाठी कर्ज पाहिजे

रणछोड नानसिंग वळवी, · 23/08/2023 at 10:05 pm

दुग्ध व्यवसाय साठी शासकीय योजना/कर्ज पाहिजे

Khushal vijay koli · 02/09/2023 at 10:14 am

पशु पालन साठी कर्ज पाहिजे

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *